Yamaha ची नवी FZ X बाईक भारतात लाँच होण्याच्या तयारीत; रेट्रो लूकसह मिळणार जबरदस्त फीचर्स
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2021 16:29 IST2021-05-05T16:28:14+5:302021-05-05T16:29:51+5:30
Yamaha FZ X : बाईकला रेट्रो लूक देण्याचा करण्यात आलाय प्रयत्न.

Yamaha ची नवी FZ X बाईक भारतात लाँच होण्याच्या तयारीत; रेट्रो लूकसह मिळणार जबरदस्त फीचर्स
जपानी वाहन उत्पादक कंपनी Yamaha भारतीय बाजारपेठेत आपली नवी बाईक Yamaha FZ X लाँच करण्याच्या तयारीत आहे. नुकतीच एका टीव्ही कमर्शिल शूटदरम्यान या बाईकचा लूक समोर आला. यापूर्वीही अनेकदा ही बाईक समोर आली होती. 150cc सेग्मेंटमध्ये ही बाईक जबरदस्त परफॉर्मन्ससाठी तयार असल्याचं म्हटलं जात आहे.
कंपनीनं ही नवी बाईक FZ V3 प्लॅटफॉर्मवर तयार केली आहे. या बाईकमध्येही त्याच फ्रेमचा, व्हिल्स, सबफ्रेम आणि स्विंगआर्मचा वापर करण्यात आला आहे. परंतु या बाईकचं डिझाईन मात्र निराळं आहे. कंपनीनं यामध्ये एलईडी लाईटचा वापर असलेल्या राऊंड हेडलाईटचा उपयोग केला आहे. याशिवाय निराळ्या डिझाईनचं रेडिएटर गार्ड आणि ब्राऊनी फ्युअल टॅकसोबत सिंगल पीस सीट या बाईकचा लूक अधिक आकर्षक बनवते. या बाईकला थोडा रेट्रो लूक देण्याचाही प्रयत्न करण्यात आला आहे
Safety Tricks For Cars : उन्हाळ्यात 'अशी' घ्या आपल्या कारची काळजी; फॉलो करा 'या' टिप्स
इंजिन क्षमता
इंजिनबद्दल सांगायचं झालं तर या बाईकमध्ये FZ V3 मॉडेलच्या इंजिनचा वापर करण्यात आला आहे. कंपनीनं यात 149cc क्षमतेच्या एअर कुल्ड इंजिनचा वापर केला आहे. हे इंजिन 12.2 bhp पॉवर आणि 13.6Nm चा टॉर्क जनरेट करतं. मीडिया रिपोर्टनुसार यामध्ये LED हेडलँपसह, ब्लूटूथ अनेबल्ड LCD इन्स्ट्र्मेंट क्लस्टरसोबत सिंगल चॅनल अँटी लॉक ब्रेकिंग सिस्टम देण्यात येऊ शकते. तसंच या बाईकची किंमत 1.15 लाखांच्या जवळपास असण्याचीही शक्यता वर्तवण्यात आली आहे.