Without a helmet, the license will be suspended; 1000 fine, rules apply in Karnataka | हेल्मेट नसल्यास लायसन सस्पेंड होणार, 1000 चा दंड; कर्नाटकमध्ये केंद्राचा नियम लागू

हेल्मेट नसल्यास लायसन सस्पेंड होणार, 1000 चा दंड; कर्नाटकमध्ये केंद्राचा नियम लागू

वाहतुकीच्या नियमांमध्ये काही दिवसांपूर्वी महत्वाचे बदल करण्यात आले आहेत. मात्र, तरीही देशात वाहतुकीच्या नियमांची पायमल्ली केली जाते. तसेच वाहतूक पोलिसांनाही चकविणे हिरोगिरी मानली जाते. दुचाकीस्वाराकडे हेल्मेट नसेल तर तो गुन्हा आहे. अशातच कर्नाटक सरकारने मोठा आदेश जारी केला आहे. बिना हेल्मेट दुचाकी चालविताना आढळल्यास दुचाकीस्वारचे लायसन सस्पेंड केले जाणार आहे. 


देशात सर्वाधिक अपघाती मृत्यू हे दुचाकीस्वारांचे होतात. दुचाकींच्या अपघाताची संख्याही जास्त आहे. यामुळे कर्नाटक वाहतूक प्राधिकरणाने स्पष्ट केले आहे की, चार वर्षांपेक्षा अधिक वयाच्या मुलांनाही हल्मेट सक्तीचे केले जाणार आहे. जर विनाहेल्मेट पकडण्य़ात आले तर तीन महिन्यांसाठी लायसन निलंबित करण्यात येणार आहे. एवढेच नाही तर दंडही भरावा लागणार आहे.


केंद्र सरकारच्या मोटर व्हेईकल अॅक्टच्या सेक्शन 129 नुसार दुचाकी चालविणाऱ्यांसाठी BS स्टँडर्डचे हॅल्मेट घालणे आवश्यक आहे. जर कोणी नियम तोडत असेल तर त्याचे लायसन तीन महिन्यांसाठी सस्पेंड करावे. तसेच 1000 रुपयांचा दंडही आकारण्यात यावा.  


केंद्र सरकारने गेल्या वर्षी हे नवे नियम लागू केले होते. मात्र, कर्नाटक सरकारने ही दंडाची रक्कम घटवून 500 रुपये केली होती. तसेच लायसन सस्पेंड करण्याचा आदेश लागू केला नव्हता. आता दंडाची रक्कम वाढवून लायसन निलंबित करण्याचा आदेशही लागू केला आहे. कर्नाटकमध्ये 1.65 कोटी अधिकृत दुचाकी आहेत. एकट्या बेंगळुरूमध्ये 59.9 लाख दुचाकी आहेत. 

...तर उद्यापासून वाहन चालकांच्या अडचणी वाढणार

कोणत्याही वाहनाला हाय सिक्युरिटी नंबर प्लेट (एचएसआरपी) नसल्यास त्याला फिटनेस सर्टिफिकेट देण्यास आतापर्यंत बंदी होती. पण १५ ऑक्टोबरला परिवहन आयुक्तांनी आदेश जारी करत विना एचएसआरपी वाहनांना आरटीओ (RTO) मध्ये होणाऱ्या काही कामांसाठी मनाई असेल, असे आदेश दिले.  एचएसआरपी एक होलोग्राम स्टिकर असतो. त्यावर वाहनाचं इंजिन आणि चेसीस नंबर असतो. सुरक्षा आणि सुविधा विचारात घेऊन एचएसआरपी तयार करण्यात आली. हा नंबर मशीननं लिहिला जातो. प्लेटवर एक प्रकारची पिन असते, ती वाहनाला जोडलेली असते. 

१९ ऑक्टोबरपासून कोणत्या कामांवर बंदी?
- विना एचएसआरपी वाहनाच्या सर्टिफिकेटची सेकंड कॉपी
- वाहनाचं रजिस्ट्रेशन ट्रान्सफर
- पत्त्यात बदल
- रजिस्ट्रेशनचं नुतनीकरण
- ना हरकत प्रमाणपत्र
- आरटीओ हायपॉथिकेशन कॅन्सलेशन
- हायपऑथिकेशन एन्डॉर्समेंट
- नवीन परवाना
- तात्पुरता परवाना
- विशेष परवाना
- राष्ट्रीय परवाना

असा करता येईल ऑनलाईन अर्ज
हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट आणि कलर कोड स्टिकर लावण्याची प्रक्रिया आता सहजसोपी झाली आहे. एचएसआरपी लावण्यासाठी दोन संकेतस्थळं तयार करण्यात आली आहेत. यासाठी bookmyhsrp.com/index.aspxसंकेतस्थळावर जावं लागेल. त्यानंतर सार्वजनिक किंवा खासगी वाहनाशी जोडलेला एक पर्याय निवडावा लागेल. त्यानंतर काही माहिती द्यावी लागेल. गाडीला रजिस्ट्रेशन प्लेट असेल आणि केवळ स्टिकर लावायचा असल्यास www.bookmyhsrp.com या संकेतस्थळावर जाऊन माहिती भरावी लागेल.

Read in English

Web Title: Without a helmet, the license will be suspended; 1000 fine, rules apply in Karnataka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.