Where is the recession? Mercedes sold 200 luxury cars in a single day | कुठे आहे मंदी? मर्सिडीजने एकाच दिवसात विकल्या 200 लक्झरी कार
कुठे आहे मंदी? मर्सिडीजने एकाच दिवसात विकल्या 200 लक्झरी कार

मुंबई : जगभरात मंदीचे वारे वाहू लागले आहेत. उत्सवी काळातही वाहन कंपन्यांच्या विक्रीचे आकडे खाली येत आहेत. मात्र, लक्झरी कार बनविणारी जागतिक ख्यातीची कंपनी मर्सिडीज बेंझने देशभरात एकाच दिवशी तब्बल 200 कार विकल्या आहेत. दसरा आणि नवरात्रीमध्ये या कारचे बुकिंग झाले होते. 


एकट्या मुंबईमध्ये दसऱ्याच्या दिवशी 125 कारची डिलिव्हरी करण्यात आली. ही आतापर्यंतची विक्रमी विक्री आहे. तर गुजरातमध्ये 74 कार डिलिव्हर करण्यात आल्या. कंपनीचे सीईओ मार्टिन श्वेंक यांनी सांगितले की, नवरात्रीच्या काळात मुंबई आणि गुजरातच्या ग्राहकांकडून आम्हाला चांगला प्रतिसाद मिळाला. असाच प्रतिसाद 2018 मध्ये मिऴाला होता. कंपनीने सी आणि ई क्लास सेदान सोबत GLC आणि GLE सारख्या एसयुव्हींची डिलीव्हरी केली आहे. 


आठवड्याला एका लँम्बॉर्गिनीची विक्री
इटलीची सुपरस्पोर्ट्स कार कंपनी लँम्बॉर्गिनीच्या विक्रीमध्ये यंदा 30 टक्क्यांनी वाढ होऊ शकते. 2019 मध्ये कंपनी 65 कारची विक्री करू शकते. यानुसार आठवड्याला एक कार विकली जात आहे. या कारची किंमत 3 कोटी रुपयांपासून सुरू होते. 2018 मध्ये 48 कारची विक्री झाली होती. ही वाढ सुरु राहणार असून पुढील तीन वर्षांत हा आकडा 100 वर जाणार आहे. मुंबईतही प्रभादेवीला उद्या नवीन शोरुमचे उद्घाटन केले जाणार आहे. 


दुसरीकडे वाहन क्षेत्रातील अन्य कंपन्यांना फटका बसला आहे. या कंपन्यांच्या कारची विक्री 30 ते 40 टक्क्यांनी घटली आहे. डीलरवर स्टॉकचे ओझे वाढल्याने काही डीलरशीप बंदही झाल्या आहेत. मारुतीसारख्या आघाडीच्या कंपनीवरही शोरुम बंद करण्याची वेळ आली आहे. मारुतीने तर या महिन्यातही काही दिवस उत्पादन बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. टाटाटी नॅनो कार यंदाच्या वर्षात केवळ एकच विकली गेली आहे. गेल्या 9 महिन्यांपासून या कारचे उत्पादन बंद आहे. 
 

Web Title: Where is the recession? Mercedes sold 200 luxury cars in a single day

Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.