500 KM रेंज देणारी Maruti e-Vitara किती तारखेला लॉन्च होणार? खास असतील फीचर्स, जाणूनघ्या किंमत!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2025 17:14 IST2025-08-13T17:12:46+5:302025-08-13T17:14:08+5:30

मारुती ई-विटारा केवळ भारतातच विक्रीसाठी उपलब्ध नसेल, तर गुजरातमधील सुझुकी मोटर प्लांटमधून ती जपान आणि युरोपसह इतर देशांमध्येही निर्यात केली जाईल.

When will the Maruti e-Vitara with 500 KM range be launched? What will be the special features, know the price! | 500 KM रेंज देणारी Maruti e-Vitara किती तारखेला लॉन्च होणार? खास असतील फीचर्स, जाणूनघ्या किंमत!

500 KM रेंज देणारी Maruti e-Vitara किती तारखेला लॉन्च होणार? खास असतील फीचर्स, जाणूनघ्या किंमत!

मारुती सुझुकीने अलीकडेच आपली पहिली इलेक्ट्रिक कार ई-विटारा लाँच करण्याची घोषणा केली आहे. ही कार इंडिया मोबिलिटी ग्लोबल एक्स्पो २०२५ मध्ये सादर करण्यात आली होती. यानंतर आता ई-विटारा ३ सप्टेंबर २०२५ रोजी लाँच केली जाईल. मारुती ई-विटारा केवळ भारतातच विक्रीसाठी उपलब्ध नसेल, तर गुजरातमधील सुझुकी मोटर प्लांटमधून ती जपान आणि युरोपसह इतर देशांमध्येही निर्यात केली जाईल.

Maruti e-Vitara मध्ये मिळतील हे संभाव्य फीचर्स -
मारुतीची ई-विटारा ही पहिली इलेक्ट्रिक कार प्रीमियम बनवण्यासाठी, कंपनी कारमध्ये एलईडी हेडलाइट्स, डीआरएल आणि टेललॅम्प्स सारखे फीचर्स देऊ शकते. या एसयूव्हीमध्ये १८-इंचांचे व्हिल्स आणि अॅक्टिव्ह एअर व्हेंट ग्रिल दिले जाईल, जे एअरोडायनॅमिक इफिशियन्सी वाढवते.

ई-विटारामध्ये दोन बॅटरी ऑप्शन्स दिले जातील, असे कंपनीने म्हटले आहे. यात एक 48.8 kWh बॅटरी पॅक तर दुसरा 61.1kWh बॅटरी पॅक असेल. याशिवाय, ही कार 500 किमी एवढी रेन्ज देईल, असा दावाही कंपनीने केला आहे. मात्र, खरी रेन्ज ड्रायव्हिंग स्टाइल आणि ट्रॅफिकवर अवलंबून असते.

कारचे इतर फीचर्स - 
मारुती ई-विटारामध्ये पॅनोरॅमिक सनरूफ, मल्टी-कलर अँबियंट लाइटिंग आणि १०.२५-इंच डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर तथा १०.१-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम सारख्या डिजिटल फीचर्सचा समावेश असेल. ही सिस्टीम वायरलेस अँड्रॉइड ऑटो आणि अॅपल कारप्लेलाही सपोर्ट करते.

मारुती ई-विटारामध्ये अनेक सेफ्टी फीचर्स मिळणे अपेक्षित आहे. ज्यात, लेन कीप असिस्ट आणि अ‍ॅडॉप्टिव्ह क्रूझ कंट्रोल सारख्या प्रगत सेफ्टी फीचर्सचा समावेश असेल. एसयूव्हीमध्ये ७ एअरबॅग्जची सुविधा असेल, यामुळे ड्रायव्हर आणि प्रवाशांची सुरक्षा सुनिश्चित होते. याशिवाय इतरही अनेक सेफ्टी फीचर्स या कारमध्ये दिले जाऊ शकतात.

किती असू शकते किंमत? -
मारुती सुझुकी e-Vitara अंदाजे 17 ते 18 लाख रुपयांच्या सुरुवातीच्या एक्स शोरूम किंमतीसह लॉन्च केली जाऊ शकते. तसेच, हिच्या टॉप स्पेक व्हेरिअंटची किंमत 25 लाख रुपयांपर्यंत असू शकते.
 

Web Title: When will the Maruti e-Vitara with 500 KM range be launched? What will be the special features, know the price!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.