शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारत आणि चीन रशिया-युक्रेन युद्धाला निधी देत ​​आहेत"; तेल खरेदीवरून ट्रम्प यांचा UNGA मध्ये आरोप
2
"भारत-पाकिस्तानसह ७ युद्धे संपवली, पण कोणत्याही पंतप्रधानांनी मदत केली नाही," डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
3
Asia Cup 2025 : टॉपर श्रीलंकेचा सुपर फोरमध्ये फ्लॉप शो! पाक जिंकले तरी OUT होण्याचा धोका; ते कसं?
4
PAK vs SL War of Celebration :पाक गोलंदाजाने कळ काढली; हसरंगानं त्याचा बदला घेतला, पण... (VIDEO)
5
रशिया कसं थांबवेल युक्रेन युद्ध? ट्रम्प यांनी UNGA मध्ये सांगितला अमेरिकेचा प्लॅन; पुतिन यांचं टेन्शन वाढणार!
6
पाक गोलंदाजानं केली हसरंगाची कॉपी! मग IND vs PAK मॅचचा दाखला देत इरफाननं काढली 'लायकी' (VIDEO)
7
वैभव खेडेकरांच्या BJP प्रवेशाचा मुहूर्त मिळेना; कार्यकर्त्यांसह मुंबई गाठली पण पक्षप्रवेश नाही
8
पाकिस्तानच्या जाफर एक्सप्रेसमध्ये स्फोट; ट्रेन रुळावरून घसरुन उलटली, काही तासांपूर्वीच लष्कराला करण्यात आलं होतं लक्ष्य
9
बिग सरप्राइज! थेट टीम इंडियाची कॅप्टन्सी मिळाली अन् दिनेश कार्तिक पुन्हा मैदानात उतरण्यास झाला तयार
10
लग्नानंतर वैवाहिक संबध ठेऊ शकला नाही पती, पत्नीनं नपुंसक असल्याचा आरोप करत केली 2 कोटींची मागणी अन् मग...
11
IND vs PAK: पाकिस्तानच्या 'चिल्लर पार्टी'ला हरभजनचा इशारा, म्हणाला- थोडे मोठे व्हा नि मग...
12
"देशी गाय कोणी विकायला निघालं, तर त्याला फाशी द्या"; सदाभाऊ खोत यांची सरकारकडे मागणी, नेमकं काय म्हणाले?
13
भारताने जिंकलेल्या १९८३ वर्ल्डकप फायनलमधील पंच डिकी बर्ड यांचे ९२व्या वर्षी निधन
14
पावसाने झोडपले, शेतकरी संकटात, सरकार कर्जमाफीचा निर्णय कधी घेणार?; एकनाथ शिंदे म्हणाले...
15
“पंचनामे-सर्वे सोडा, ओला दुष्काळ जाहीर करा अन् सरसकट हेक्टरी ५० हजार रुपये द्या”: सपकाळ
16
GST कपातीनंतर आता एवढी स्वस्त झालीय ५ स्टार रेटिंग असलेली Tata Punch; जाणून घ्या, कोण कोणत्या कारला देते टक्कर?
17
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांमुळे इमॅन्युएल मॅक्रॉन अडकले ट्रॅफिकमध्ये; फ्रान्सच्या प्रमुखांनी थेट लावला ट्रम्प यांनी फोन
18
"कधीतरी जबाबदारी घ्यायला शिका"; भाजपा खासदाराने ममता बॅनर्जींना सुनावले, म्हणाले- "सतत..."
19
"गर्भवती महिलांना पॅरासिटामॉल गोळीने..."; WHO ने फेटाळून लावला डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
20
फ्लिपकार्ट बिग बिलिअन डेजचा मोठा स्कॅम? अनेकांनी आयफोन १६ ऑर्डर केले, कंपनीने अचानक रद्द केले...

कारच्या अंतर्गत कप्प्यांचा बहुमोल उपयोग

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2017 14:02 IST

कारमधील प्लॅस्टिक कप्पे हे खूपत उपयोगी असतात. मात्र त्याचा वापर योग्य पद्धतीने करायला हवा. ते साफही वेळच्यावेळी करायला हवेत, अन्यथा त्यांचा त्रास व कटकटही होऊ शकते.

छोट्या छोट्या वस्तू ठेवण्यासाठी आधुनिक कारमध्ये प्लॅस्टिकचा मोठ्या खुबीने वापर केलेला आढळतो. प्रत्यके कंपनीच्या कारमध्ये असलेल्या अंतर्गत रचनेमध्ये असणारे वैविध्यही खूप नजरेत भरणारे असते. नव्हे ते तसे व्हावे यासाठी मोठी मेहनत कारचा आरेखनकार घेत असतो. प्लॅस्टिक हा आज मोटारीमध्ये वापरण्यात येणारा एक प्रमुख घटक आहे, प्लॅस्टिकचे गुणधर्म या कारच्या अंतर्गत रचनेमध्ये उपयुक्त ठरले आहेत, ते त्याच्या वैशिष्ट्यांमुळेच. दरबाच्यामधील कप्पे, हात ठेवण्यासाठी दरवाज्याच्या आतील बाजूने तयार केलेली रचना, डॅशबोर्डमध्ये अतशिय कल्पकतेने केलेल्या जागेचा वस्तू ठेवण्यासाठी केलेला वापर वा रचना, गीयरच्या पुढे मागे, बाजूलाही प्लॅस्टिकच्या वविधि पद्धतीच्या कप्प्यांची असलेली रचना या सा-या बाबी कारमध्ये लांबवर वा जवळ प्रवास करताना खूप उपयुक्त ठरतात. त्यामध्ये मोबाइल, सुट्टे पैसे, कागदपत्रे, पाण्याच्या बाटल्या, रुमाल, चाव्या, मागील शेल्फवर वस्तुठेवण्यासाठी असलेली ट्रेची सुविधा, डॅशबोर्डमध्ये असलेली सुविधा, त्यात यूसबीसाठी असलेली सोय, पेनड्रईव्ह, सीडी, म्युझिक सिस्टिमचा रिमोट कंट्रोल ठेवण्यासाठी असलेली सोय, इतकेच काय छोटेखानी फ्रिझ सारखा पाण्याच्या वा पेयाच्या बाटल्या थंड करण्यासाठी असणारी कोल्ड स्टोरेजची सुविधा या व अशा विविध प्रकारच्या रचना कारमधील कप्प्याकप्प्यांमध्ये केलेल्या असतात.या कप्प्यांचा उपयोग नक्कीच बहुमोल आहे. मात्र तो करीत असताना, ते स्वच्छ ठेवमे ही देखील प्रत्येक कार मालक, चालकाची जबाबदारी आहे. अन्यथा त्यात खाद्यपदार्थ सांडलेले असणे, चॉकलेट वा तत्सम विरघळणारे वा वितळणारे पदार्थ साचून ते खराब होणे, सुपारी, गोळ्या, आदी पदार्थांच्या साठ्यामुळे कारमध्ये ती बंद असताना असल्याने तापमानाचा परिणाम होऊन त्याचा वास त्रासदायक होणे, अशा विविध प्रकारांना टाळावे लागते. हे प्रत्येक कारबाबत लक्षात ठेवायला हवे. या कप्प्यांना मुळात वापरापासून स्वच्छ ठेवल्यास ते साफ करताना होणारा त्रास टळू शकेल. या प्रमाणेच या कप्प्यांचा वापर हा करायला हवा, मात्र तो करताना काही गोष्टी नक्कीट पाळायला हव्यात. त्यामुळे त्या कप्पे वा खणांचा उपयोग नीटपणे करता येईल.काय कराल, काय टाळालचिकट गोष्टी, पदार्थ त्या कप्प्यांमध्ये ठेवण्याचे टाळातसे पदार्थ ठेवले गेले तर कप्पे वेळीच साफ करापाण्याच्या बाटल्या ठेवताना त्या नीट व झाकण घट्ट लावून ठेवा.पाणी सांडल्यास ते साफ करणे वा काढणे म्हणजे तशी वेळखाऊ व किचकट बाब आहे.चालत्या कारमध्ये कप्प्यातून वस्तू बाहेर येणार नाही, याची खात्री करा.कप्प्यामध्ये वस्तू आदळून त्याचा आवाज होणार नाही, ते ही पाहा.नाणी, गोळ्या, नेलकटर अशा वस्तू ठेवताना त्या आदळून आवाजाचा त्रास होऊ शकतो.वस्तू ठेवताना त्या कप्प्याच्या ताकदीप्रमाणेच ठेवा.प्लॅस्टिकची अंतर्गत रचना तशी कणखर असते म्हणून अवाजवी व अयोग्य हाताळणी टाळादरवाज्यामधील कप्पा पूर्ण मोकळा असताना आतमध्ये आदळणाºया वस्तू टाळादरवाज्यातील जागेचा वापर करताना कापड, डस्टर त्यात ठेवा. म्हणजे जड वस्तुंची आदळआपट होणार नाही.पावसाळ्यात सुगंधी अशा नॅप्थॅलिनच्या गोळ्या ठेवाअनावश्यक प्रकारे कप्प्यांमध्ये वस्तू कोंबू नका

टॅग्स :carकारAutomobileवाहन