शहरं
Join us  
Trending Stories
1
ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा 'पंजा'! या ३ चुकांमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियानं गमावली मोठ्या आघाडीची संधी
2
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
3
CM देवेंद्र फडणवीसांना पाठवली कायदेशीर नोटीस, ७ दिवसांचा दिला अल्टिमेटम; नेमके प्रकरण काय?
4
Ashadhi Wari : दिवे घाटाची अवघड वाट पार करीत माउलींचा पालखी सोहळा कऱ्हेकाठी विसावला
5
"...इराणला आपली अण्वस्त्रे देण्यास तयार!"; रशियाच्या माजी राष्ट्रपतींचा मोठा दावा; उद्या पुतीन यांची खास बैठक
6
अमेरिकेनं इराणवर चालवलं 'मिडनाइट हॅमर', केला ऑपरेशनच्या नावाचा खुलास; म्हणाले, ट्रम्प बोलें तो...!
7
१२५ लढाऊ विमाने, त्यात ७ बी२ बॉम्बर...! इराणला फसविले, पेंटागॉनने सांगितले अणुकेंद्रांवर कसा हल्ला चढविला...
8
ENG vs IND : कायद्यात राहून फायद्यात! जड्डू-साई सुदर्शन जोडीनं रिले कॅचसह लुटली मैफिल (VIDEO)
9
“८ वेळा निवडणुका जिंकलो, आता थांबण्याचा विचार करावासा वाटतो”; भास्कर जाधवांचे सूचक विधान
10
इराण तीन आठवड्यांत ९ अणुबॉम्ब बनवू शकला असता; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डोचा सॅटेलाईट फोटो आला...
11
“वारीमुळे रस्ता जाम होतो, आम्ही तक्रार केली नाही”; अबू आझमींचे विधान, CM फडणवीसांचे उत्तर
12
रोहित-विराट वनडे वर्ल्ड कप खेळणं 'मुश्किल'; गांगुलीनं बोलून दाखवली मनातली गोष्ट
13
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
14
शिंदेंनंतर आता भाजपाने डाव टाकला; शेकडो पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र
15
डेटिंग अ‍ॅपवरून सुंदर तरुणी कॅफेत भेटायला आली, १२००० रुपयांचे बिल केले आणि पळून गेली... तरुण बिचारा...
16
एअर इंडियाच्या आणखी एका विमानाला बॉम्बची धमकी; सौदी अरेबियात आपत्कालीन लँडिंग
17
आता पैसे नसल्यामुळे शिक्षण थांबणार नाही; 'या' योजनेद्वारे घरबसल्या मिळेल बिनव्याजी कर्ज...
18
DSP सिराजनं बेन स्टोक्सला केलं 'अरेस्ट'! विकेट गमावल्यावर कॅप्टननं हवेत भिरकावली बॅट (VIDEO)
19
आता डिप्लोमसीला काहीच अर्थ राहिला नाही; इस्रायलने हल्ला केला तेव्हाच..., इराणी परराष्ट्र मंत्र्यांचा युरोपवर आरोप
20
सोमवारी प्रदोष शिवरात्रि: ‘हे’ प्रभावी शिव मंत्र म्हणा, भाग्याची साथ मिळेल; लाभच लाभ होतील!

समजून घ्या कारमधील विविध कामांसाठीच्या 'स्विचेसच्या कळा', स्विचेच करतात महत्त्वाचे काम

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2017 07:00 IST

कार वा वाहनांचे स्विच हे तसे चांगल्यापैकी टिकण्याच्यादृष्टीने बनवलेले असतात. मात्र त्यांची हाताळणी नीट होणे गरजेचे आहे. एसटी बसचा चालक अप्पर-डिप्पर का देत नाहीत, असा प्रश्न मुंबईच्या बाहेर महामार्गावरून रात्रीच्यावेळी जाताना नेहमी पडायचा. 

कार वा वाहनांचे स्विच हे तसे चांगल्यापैकी टिकण्याच्या दृष्टीने बनवलेले असतात. मात्र त्यांची हाताळणी नीट होणे गरजेचे आहे. एसटी बसचा चालक अप्पर-डिप्पर का देत नाहीत, असा प्रश्न मुंबईच्या बाहेर महामार्गावरून रात्रीच्यावेळी जाताना नेहमी पडायचा. एकदा प्रत्यक्ष एका ड्रायव्हरशी बोललो तेव्हा त्याने सांगितले की, बसला विविध ड्रायव्हर हाताळतात. प्रत्येकाच्या हाताचे वजन संलग्न स्विचेसवर वेगवेगळे पडत असते, त्याची हाताळणी नीट होत नाही. तसेच हे स्विचेस स्वस्त नाहीत, महाग असतात. त्यामुळे वारंवारही बदलणे शक्य नसते. सांगायचा मुद्दा हा की वाहनाला असणारे विविध प्रकारचे स्विचेस हे नित्यनेमाने हाताळले जातात, कार, बस, ट्रक, स्कूटर अशा सर्व वाहनांना स्विचेच हे खूप महत्त्वाचे काम करीत असतात. त्यांची सुयोग्य हाताळणी करणे हे गरजेचे असते. वायपर व साइड इंडिकेटरचा स्विच साधारण एकाच संलग्न स्विचला असतो. तर हेडलॅम्पचा स्विच, त्यात अप्पर डिप्पर, सिटी लाइट, पासिंग लाइट असे स्विच एकत्रित एकत्रित असतात. फॉग लॅम्पचा स्विच, वा अन्य अतिरिक्त विद्युत साधने बसवलेली असतील तर त्यांचेही स्विच वाहनांमध्ये असतात. सर्वसाधारणपणे स्विचची होणारी हाताळणी लक्षात घेऊन ते टिकावू पद्धतीने वापरले जावेत व अधिक टिकावेत, अशादृष्टीने त्यांची रचना असते. तरीही स्विच खराब होत असतात. यासाठीच स्विचची हाताळणी ही अतिशय योग्य प्रकारे होणे आवश्यक आहे.वैयक्तिक मालकीच्या कारबाबत विचार केला तर प्रामुख्याने ती चालवणारा हा साधारण एकच असतो. फार तर घरातील वा माहितीमधील माणूसही कतार हाताळत असतो. मात्र प्रत्येकाची हाताळणी जरी वेगळी असली तरी स्वतःची कार असल्याने ते स्विच वापरण्यामध्ये फरक असला तरी काही काळजी घेतली जाते. तरीही काही जण स्विचबाबत नीट हाताळणी करीत नाहीत. किंवा त्या स्विचशी खेळ करणारेही कमी नसतात. मुद्दाम करतात असे नाही पण चाळा म्हणूनही सवय लागली जाते. अशा प्रकारच्या सवयीही स्विचचा टिकावूपणा व क्षमता कमी करतात. स्विच वापर करताना तो अतिशय घट्ट हातात धरून जोरात ऑपरेट करणे,अति वजन स्विचच्या क्षमतेपेक्षा त्याच्या हालचाली करताना देणे, अनाहूतपणे वा विनाकारण विरुद्ध बाजूला फिरववा जाणे. काहीवेळा वायपर नीट चालत नसेल वा एखादी विद्युत वायरींगची रचना बिघडली गेली असेल तर त्याचा राग स्विचवर काढला जातो. वास्तविक स्विच अशा प्रकारे वापरून पाहाणेही बरोबर नाही. त्याची पद्धत हलक्या हाताने ऑपरेट करण्याची असते, हे लक्षात घेतले पाहिजे. एखादे साधन म्हणजे वायपर, हेडलॅम्प, पासिंग लाइट चालत नसेल नीट ऑपरेट होत नसेल तर त्यासाठी स्विच जोराने हाताळून उपयोगाचे नाही, तो हळूवार व त्याच्या पद्धतीने व गतीने चालतो. तुम्ही जोरात ऑपरेट केला म्हणून तो ऑपरेट होत नाही, हे लक्षात घ्यावे. साधारणपणे स्विचचे आयुष्य नीट वापरलात तर भरपूर असते. तो लगेच खराब होत नाही. मात्र त्याची हाताळणी नीट झाली पाहिजे. प्रत्येकाने जर त्याची हाताळणी नीट केली तर त्याचे आयुष्यही वाढेल, योग्यवेळी योग्य रीतीने तो काम करील. मग एकापेक्षा जास्त लोकांनीजरी तो हाताळला तरी तो काम चांगले करील. फक्त त्याची हाताळणी नीट हवी. त्यावरच तुमचा होणारा अनावश्यक खर्च वाचू शकेल.

टॅग्स :carकार