शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेची दादागिरी चालणार नाही; भारत रशियाकडून तेल खरेदी करणारच, सरकारचा स्पष्ट संदेश
2
डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी पुन्हा विध्वंसाची भाषा; म्हणाले, "चर्चा यशस्वी झाली नाही, तर आतापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला करू"
3
Fuel Price Hike: मोठी बातमी! पेट्रोल-डिझेल पुन्हा महागले; पाहा मुंबई, पुण्यातील आजचे वाढलेले दर...
4
"माझ्या शांततेला कमजोरी समजू नका, मी लवकरच परतणार!" शेख हसीना यांचा बांगलादेशला थेट इशारा
5
माणुसकी उरली नाही! भररस्त्यात जोडप्याला बांबूने बेदम मारहाण अन् आजूबाजूला बघ्यांची गर्दी, अंगावर काटा आणणारा व्हिडीओ
6
मधुचंद्राच्या रात्री असं काय घडलं की नवरदेवाने दुसऱ्याच दिवशी आयुष्य संपवलं? नवरीसह ४ जणांवर गुन्हा दाखल!
7
२७ एप्रिललाच नीटचा लीक पेपर नाशिकमध्ये पोहोचला, मिळताच शुभम दोन दिवस नाशिकमधून बाहेर
8
San Diego Firing : 'माझा मुलगा...'; आईने पोलिसांना केला होता कॉल, १७ आणि १८ वर्षाच्या मुलांच्या हल्ल्याने मशीद हादरली
9
Video: ‘मी महाराष्ट्र सोडून जाऊ का?’ नाना पाटेकर भावुक
10
शिंदेसेनेच्या बालेकिल्ल्यात भाजप करणार उमेदवारीसाठी दावा; विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचे बिगुल वाजले
11
Vladimir Putin to Visit China: ट्रम्प यांच्यानंतर पुतिन चीनला भेट देणार! शी जिनपिंग यांच्यासोबत 'या' मुद्द्यांवर होणार द्विपक्षीय चर्चा
12
Twisha Sharma : "दीदी, या मला २४ तास कंट्रोल करतात"; मृत्यूच्या अवघ्या १० मिनिटांपूर्वी ट्विशाने पाठवला होता मेसेज!
13
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२६, आर्थिक लाभाची संधी, वाणी वर संयम ठेवावा लागेल
14
१ जूनपासून महिलांच्या खात्यावर येणार ३ हजार ; प. बंगालच्या नव्या सरकारचा आश्वासनपूर्तीचा धडाका
15
अमेरिकेत मशिदीत अंधाधुंद गोळीबार; दोन अल्पवयीन संशयितांसह ५ जणांचा मृत्यू, पोलिसांकडून 'हेट क्राईम' घोषित
16
मोटेगावकरने स्वतःच्या मुलासाठीच फाेडला पेपर? नऊ दिवसांची कोठडी, सीबीआयचा दावा; हस्तलिखित नोट्सच्या माध्यमातून पुरवले प्रश्न व उत्तरे
17
एक हजारावर विद्यार्थ्यांकडून पेपर खरेदी; ‘सीबीआय’ला संशय : नागपूरमधील ‘आलोक’ आता रडारवर
18
साखरपुड्याला जाण्यासाठी ट्रकमध्ये बसले ६० जण; कंटेनरची धडक, १३ ठार
19
सीबीआय पथक लातूर शहरात ठाण मांडून; कोचिंग क्लासेस परिसरात कडेकोट बंदोबस्त तैनात  
20
विधान परिषदेच्या १७ जागांसाठी रणसंग्राम; १८ जूनला निवडणूक होणार
Daily Top 2Weekly Top 5

1 लिटरमध्ये 27.97km चे मायलेज; 'या' SUV वर मिळतोय ₹1 लाखांचा डिस्काउंट

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2026 16:18 IST

Toyota Cars Discount: ग्राहकांना 5 वर्षांची रोडसाइड असिस्टन्स सेवादेखील मिळत आहे.

Toyota Cars Discount: नवीन SUV खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर मार्च महिन्यात चांगली संधी आहे. टोयोटाची लोकप्रिय SUV Toyota Urban Cruiser Hyryder या मॉडेलवर सध्या ₹1 लाखांपर्यंत सूट दिली जात आहे. यासोबतच ग्राहकांना 5 वर्षांची रोडसाइड असिस्टन्स सेवा देखील मिळत आहे.

मायलेज आणि परफॉर्मन्स

कंपनीच्या माहितीनुसार Toyota Urban Cruiser Hyryder ही SUV उत्कृष्ट मायलेज देते. ही कार 1 लिटर पेट्रोलमध्ये 27.97 किलोमीटरपर्यंत मायलेज देऊ शकते. हायब्रिड तंत्रज्ञानामुळे ही गाडी इंधन बचतीसाठीही ओळखली जाते.

इंजिन आणि हायब्रिड टेक्नॉलॉजी

या SUV मध्ये सेल्फ-चार्जिंग स्ट्रॉंग हायब्रिड इलेक्ट्रिक सिस्टम देण्यात आली आहे. यात तुम्हाला 1.5 लिटर पेट्रोल इंजिन, टोयोटा हायब्रिड सिस्टम (THS) आणि इलेक्ट्रिक मोटर मिळते. याशिवाय, गाडीमध्ये 5-स्पीड मॅन्युअल आणि 6-स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशन असे दोन्ही पर्याय उपलब्ध आहेत.

किंमत किती?

भारतामध्ये Toyota Urban Cruiser Hyryder ची एक्स-शोरूम किंमत ₹10.99 लाखांपासून सुरू होते (बेस व्हेरिएंट), तर टॉप व्हेरिएंटची किंमत ₹20.19 लाखांपर्यंत जाते.

प्रमुख फीचर्स

या SUV मध्ये 55 कनेक्टेड कार फीचर्स, Apple CarPlay आणि Android Auto, 6 एअरबॅग्स, 360 डिग्री कॅमेरा, व्हेइकल स्टॅबिलिटी कंट्रोल, हिल होल्ड असिस्ट यांसारखे फीचर्स मिळतात.

कोणत्या गाड्यांशी स्पर्धा?

भारतीय बाजारात या SUV ची थेट स्पर्धा Maruti Suzuki Grand Vitara, Kia Seltos, Hyundai Creta, Skoda Kushaq आणि Volkswagen Taigun शी आहे.

टॅग्स :ToyotaटोयोटाcarकारAutomobileवाहन