शोधाशोध! Tesla ला शोरुमसाठी जागा हवीय; पहिली कार या तीन शहरांत मिळणार

By ऑनलाइन लोकमत | Published: April 8, 2021 07:13 PM2021-04-08T19:13:31+5:302021-04-08T19:14:17+5:30

India Tesla Launch Update, will be Available in Three cities first: टेस्ला तिची पहिली भारतीय कार या वर्षीच्या मध्यावर लाँच करण्याची शक्यता आहे. टेस्लाची कार घेण्याची इच्छा असलेल्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे.

Tesla's first car will be available in Delhi, Mumbai. Bengaluru; Search for properties for showroom started | शोधाशोध! Tesla ला शोरुमसाठी जागा हवीय; पहिली कार या तीन शहरांत मिळणार

शोधाशोध! Tesla ला शोरुमसाठी जागा हवीय; पहिली कार या तीन शहरांत मिळणार

Next

जगातील सर्वात मोठी ईलेक्ट्रीक कार कंपनी टेस्ला (Tesla ) लवकरच भारतीय बाजारात ईलेक्ट्रीक कार लाँच करणार आहे. टेस्लाने टेस्ला इंडिया मोटर्स अँड एनर्जी प्राइवेट लिमिटेड (Tesla India Motors and Energy Pvt Ltd with RoC Bangalore) या नावे रजिस्ट्रेशन केले असून भारतीय बाजारात लक्झरी इलेक्ट्रीक कारचे उत्पादन आणि विक्री करण्यात येणार आहे. कंपनी लवकरच मॉडेल ३ सेदान भारतीय रस्त्यांवर आणणार आहे. (Tesla searching Showroom Space in Delhi, Mumbai, Bengaluru for Electric cars sale.)


टेस्लाची ही कार भारतातील तीन शहरांत पहिल्यांदा उपलब्ध होणार आहे. टेल्सा इंक या शहरांमध्ये शोरुम उघडण्यासाठी जागेच्या शोधात आहे. टेस्लाची कार घेण्याची इच्छा असलेल्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे. टेस्ला तिची पहिली भारतीय कार या वर्षीच्या मध्यावर लाँच करण्याची शक्यता आहे. दिल्लीमध्ये शोरुम उघडण्यासाठी कंपनी जागेच्या शोधात आहे. तर यानंतर भारताची आर्थिक राजधानी मुंबई आणि टेस्ला जिथे आहे ते शहर बेंगळुरुमध्ये शोरुम उघडण्यात येणार आहेत. 


टेस्लाला सध्या दिल्लीत 20 ते 30 हजार चौफुटांच्या व्यापारी मालमत्तेच्या शोधात आहे. मस्क यांनी गेल्या वर्षी ऑक्टाेबरमध्ये ट्विट करून ‘टेस्ला’ २०२१ मध्ये भारतात पदार्पण करणार असल्याचे जाहीर केले हाेते. त्यानंतर काही दिवसांपूर्वी कर्नाटकचे मुख्यमंत्री बी.एस. येदियुरप्पा यांनी ‘टेस्ला’च्या आगमनाची घाेषणा केली. मस्क यांनी ‘टेस्ला इंडिया माेटर्स ॲण्ड एनर्जी प्रा. लिमिटेड’ या नावाने उपकंपनी स्थापन केली आहे. मस्क यांनी कर्नाटकची निवड केल्याने अनेकांना आश्चर्य वाटले हाेते. मात्र, बंगळुरूमध्ये वाहन उद्याेगांसाठी पाेषक वातावरणनिर्मिती झाल्यामुळे ई-वाहनांच्या निर्मितीमध्ये इतरांना मागे टाकले आहे. 


कर्नाटक पहिले राज्य

इलेक्ट्रिक वाहनांसाठी समर्पित असे स्वतंत्र धाेरण तयार करणारे कर्नाटक हे देशातले पहिले राज्य हाेते. ई-वाहनांसाठी आवश्यक असलेली उपकरणे, बॅटरी तसेच सुटे भाग निर्मिती करणाऱ्यांसाठी या  धाेरणातून प्राेत्साहन देण्यात आले. याचा गेल्या काही वर्षांमध्ये माेठा परिणाम झाला आहे. गेल्या वर्षी फेब्रुवारीपर्यंत सुमारे ७२ हजार काेटींची गुंतवणूक करण्याचे प्रस्ताव सरकारला प्राप्त झाले हाेते.


या कारची किंमत 55 लाख रुपये एवढी असेल, ही अफवा - 
असे बोलले जाते, की टेस्ला कारची आयात चीनवरून करण्याची शक्यता आहे आणि त्या ऑनलाईनच विकेल. डिलरशिपच्या माध्यमाने कारची विक्री होणार नाही. या कारची किंमत 55 लाख रुपये एवढी असेल, ही अफवा आहे. या कारमध्ये 500 किलोमीटरपर्यंतची रेंज आणि 162 किमी प्रति तासची टॉप स्पिड असेल. मात्र, यासंदर्भात कंपनीने अधिकृत भाष्य केलेले नाही.
 

Web Title: Tesla's first car will be available in Delhi, Mumbai. Bengaluru; Search for properties for showroom started

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.