शहरं
Join us  
Trending Stories
1
आज बरसणार शब्दबाण! महायुती दाखवेल शिवाजी पार्कवर दम; बीकेसीत ‘इंडिया’ करणार शक्तिप्रदर्शन
2
अखेर भावेश भिंडे जेरबंद, उदयपूरच्या रिसॉर्टमधून घेतले ताब्यात; ६० तासांनंतर बचावकार्य थांबले
3
भावेश भिंडेची १०० कोटींची कमाई? निविदा १० वर्षांसाठी मंजूर, पण दिली ३० वर्षांची परवानगी
4
रेल्वेने मुंबई महापालिकेचे थकविले ५७२ कोटी; २२ वर्षे पाणीपट्टी, मालमत्ता कर भरलाच नाही
5
काँग्रेस आणि आपमध्ये दुरावा वाढला? राहुल गांधीच्या सभेचे केजरीवालांना निमंत्रण नाही
6
ज्यांना ‘नकली भाजप’ मान्य नाही त्यांनी आम्हाला मत द्यावे, हिंमत असेल तर...: उद्धव ठाकरे
7
सत्ता मिळविण्यासाठी उद्धवसेनेने प्रतिष्ठा घालविली; मुख्यमंत्री शिंदेंची घणाघाती टीका
8
बजेट धर्मावर आधारित कधीच नसते, जातींचा विचार करुन देश चालत नाही: शरद पवार
9
शरद पवार गटाच्या नेत्यांना जमावबंदीच्या नोटिसा; १५ ते १९ मे कुठेही फिरु नका, पोलिसांचा आदेश
10
...तर ईडी आरोपीला अटक करू शकत नाही; सुप्रीम कोर्टाचा निकाल, जामिनासाठी अर्ज अनावश्यक 
11
आज पंतप्रधान मोदींची शिवाजी पार्कवर सभा; वाहतूक वळविली, पाहा, महत्त्वाचे बदल
12
कोकण रेल्वेच्या मार्गातील अडथळे होणार दूर, तिन्ही मागण्या पूर्ण करु: रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव
13
काँग्रेसच्या धोरणांनी गरिबी वाढली; नितीन गडकरी यांची टीका
14
शक्तिप्रदर्शनाला महिला बचतगट लाभार्थींची ताकद; खासदारांबरोबरच आमदारांचीही कसोटी
15
निवडून आल्यावर काय करणार? नागरी प्रश्नांना वर्षा गायकवाड यांच्या ‘न्यायपत्रा’ने हमी
16
ढिगाऱ्याखाली कोणी उरले नाही, काम थांबले; महापालिका आयुक्तांची माहिती
17
स्वाती मालीवाल यांच्या तक्रारीनंतर पोलीस अ‍ॅक्शन मोडमध्ये, विभव कुमार यांच्याविरोधात FIR दाखल
18
IPL 2024, QUALIFIER 1 च्या एका जागेसाठी तिरंगी लढत; SRH, RR, CSK यांच्यात मजेशीर चुरस
19
खासदारांच्या दिलदार शत्रूनेच चंद्रहार पाटील यांचा घात केला - विशाल पाटील
20
SRH vs GT सामन्यात पाऊस आला धावून, २ संघ गेले वाहून! आता प्ले ऑफचे एकच स्थान शिल्लक

Ratan Tata Ford : जॅग्वारनंतर रतन टाटांचा Ford वर आणखी एक उपकार, करणार 'ही' मोठी मदत

By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2022 2:54 PM

जग आर्थिक मंदीचा सामना करत असताना दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर असलेल्या फोर्डची 2008 मध्ये टाटानं मदत केली होती. त्यावेळी त्यांनी फोर्डकडून Jaguar Land Rover ब्रान्ड खरेदी केला होता.

2008 मध्ये जॅग्वार लँड रोव्हर (Jaguar Land Rover) विकत घेऊन फोर्डला 'मदत' केल्यानंतर टाटा मोटर्सने (Tata Motors) पुन्हा एकदा फोर्ड मोटर कंपनीला (Ford Motor Company) मदतीचा हात पुढे केला आहे. दोन कंपन्यांमधील हे चढ-उताराचं नातं 1999 पासून आहे. कमी विक्रीमुळे फोर्डने गेल्या वर्षीच भारतीय बाजारातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला.

वृत्तानुसार, गुजरात मंत्रिमंडळाची परवानगी ही या करारासाठी ग्रीन सिग्नल प्रमाणे आहे. प्लांट खरेदीबाबत दोन्ही कंपन्यांमध्ये अनेक मुद्द्यांवर अजूनही चर्चा सुरू आहे. यामध्ये कराराचा आकार, कामगार संबंधित समस्या, आर्थिक स्थिती आणि इतर समस्यांचा समावेश आहे. तथापि, दोन्ही कंपन्या 30 मे रोजी या करारासाठी सामंजस्य करार करतील अशी अपेक्षा आहे.

यापूर्वीही टाटांकडून फोर्डला मदतचदोन्ही कंपन्यांमधील नातं तसं फार जुनं आहे. ही गोष्टही तितकी साधी नाही. रतन टाटा (Ratan Tata Ford Story) यांनी भारताची पहिली संपूर्ण स्वदेशी कार टाटा इंडिका (Tata Indica) लाँच केली. परंतु याला अपेक्षित यश मिळालं नाही. 1999 मध्ये टाटांनी आपल्या कार व्यवसायाची विक्री करण्यासाठी फोर्डशी संपर्क केला. परंतु त्यावेळी फोर्डचे प्रमुख असलेल्या बिल फोर्ड यांनी रतन टाटा यांना कारच्या बाबतीत काही माहितीच नाही, तर कारचं उत्पादन का सुरू केलं असं म्हटलं. टाटांचा कार व्यवसाय खरेदी करून फोर्ड उपकार करत आहे, असंही त्यांनी म्हटलं. परंतु यानंतर टाटांनी आपला व्यवसाय न विकण्याचा निर्णय घेतला.

2008 मध्ये खरेदी केली JaguarLandRover2008 मध्ये जगाला आर्थिक मंदीचा सामना करावा लागला. यावेळी फोर्ड ही कंपनी दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर उभी होती. त्याचवेळी रतन टाटा यांनी फोर्डला मदतीचा हात पुढे करून Jaguar Land Rover हा ब्रँड खरेदी केला. त्यांनी केवळ हा ब्रँड खरेदीच केला नाही, तर तो यशस्वीही करून दाखवला.

टॅग्स :Ratan Tataरतन टाटाJaguarजॅग्वारFordफोर्डGujaratगुजरात