टाटा मोटर्सने लॉन्च केले देशातील पहिले EV शोरुम; या सुविधा मिळणार...

By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2023 09:00 PM2023-12-21T21:00:53+5:302023-12-21T21:01:46+5:30

लवकरच इतर शहरांमध्येही अशी EV दुकाने सुरू होणार आहेत.

Tata EV Showroom: Tata Motors Launches Indias First EV Showroom; These facilities will be available | टाटा मोटर्सने लॉन्च केले देशातील पहिले EV शोरुम; या सुविधा मिळणार...

टाटा मोटर्सने लॉन्च केले देशातील पहिले EV शोरुम; या सुविधा मिळणार...

Tata Motors: इलेक्ट्रिक वाहनांची वाढती मागणी पाहता, कंपन्या या सेगमेंटवर फोकस करत आहेत. या सेगमेंटमध्ये वाढ करण्यासाटी Tata Motorsने गुरुग्राममध्ये पहिले इलेक्ट्रिक कार शोरुम लॉन्च केले आहे. हळूहळू इतर शहरांमध्येही अशी दुकाने सुरू होतील. यामुळे Tata.ev एक वेगळे युनिट आणि ब्रँड म्हणून विकसित होईल. 

इतर टाटा शोरुमच्या तुलनेत या स्टोअरला प्रीमियम लूक दिला आहे. या स्टोअरमध्ये टाटा EV विकल्या जातील आणि या सेगमेंटसाठी समर्पित सर्व्हिस सेंटर म्हणूनही काम करेल. EV सेगमेंटमध्ये आपले वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी TATA ने हे पाऊल उचलले आहे. याद्वारे कंपनी एक वेगळी ओळख निर्माण करू इच्छित आहे.

कंपनीने ही दुकाने इको-फ्रेंडली आणि टिकाऊ साहित्यापासून बनवलेली आहेत. यात कार कस्टमाइझ करण्यासाठी स्क्रीन देखील आहेत. ईव्हीसाठी भारतातील हे पहिलेच समर्पित शोरुम आहे. इतर शोरुममध्येही EV कारची विक्री सुरुच राहिल. या गुरुग्राममधील दुकानात नुकत्याच लाँच झालेल्या Nexon EV, Tiago आणि Tigor EV सादर करण्यात आल्या आहेत. कंपनी लवकरच Harrier EV, Curve EV आणि फ्लॅगशिप Sierra EV लॉन्च करणार आहे.

Web Title: Tata EV Showroom: Tata Motors Launches Indias First EV Showroom; These facilities will be available

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.