Royal Enfield: आता घरबसल्या बूक करा रॉयल एनफील्ड, 'हे' मॉडेल्स ऑनलाइन खरेदीसाठी उपलब्ध!
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2025 21:02 IST2025-10-10T21:01:24+5:302025-10-10T21:02:29+5:30
Royal Enfield Bikes: बाईकप्रेमींसाठी एक मोठी आणि आनंदाची बातमी आहे.

Royal Enfield: आता घरबसल्या बूक करा रॉयल एनफील्ड, 'हे' मॉडेल्स ऑनलाइन खरेदीसाठी उपलब्ध!
बाईकप्रेमींसाठी एक मोठी आणि आनंदाची बातमी आहे. आता तुम्ही रॉयल एनफील्डची आवडती बाईक खरेदी करण्यासाठी शोरूममध्ये जाण्याची गरज नाही. फ्लिपकार्टनंतर आता रॉयल एनफील्डने ई-कॉमर्स क्षेत्रातील मोठी कंपनी अमेझॉन इंडियासोबत भागिदारी केली आहे.
या भागीदारीमुळे, ग्राहक आता रॉयल एनफील्डच्या ३५० सीसी श्रेणीतील लोकप्रिय बाइक्स थेट अमेझॉनच्या वेबसाइटवरून बुक करू शकणार आहेत. क्लासिक ३५०, हंटर ३५०, बुलेट ३५०, मेटीओर ३५० आणि गोवन क्लासिक ३५० या बाईक्स ऑनलाईन खरेदीसाठी उपलब्ध असतील.
खरेदी कशी करायची?
कंपनीने सांगितले की, अमेझॉनसोबत भागीदारी करण्यामागचा उद्देश ग्राहकांची खरेदी प्रक्रिया सोपी करणे आहे. ग्राहक अमेझॉनवर ही बाईक बुक करू शकतात. ग्राहकांना थेट पेमेंट किंवा फायनान्स पर्यायांचा वापर करून पेमेंट करता येईल. ऑनलाइन बुकिंगनंतर, बाईकची डिलिव्हरी आणि विक्रीनंतरची सेवा तुमच्या पसंतीच्या डीलरशिपकडून दिली जाईल.
सध्या ५ शहरांमध्ये सुविधा सुरू
ही सेवा नवी दिल्ली, चेन्नई, हैदराबाद, अहमदाबाद आणि पुण्यात सुरू करण्यात आली. कंपनी लवकरच ही सेवा इतर शहरांमध्येही सुरू करणार आहे. विशेष म्हणजे, या ऑनलाइन स्टोअरवर तुम्हाला बाइक्ससोबतच रॉयल एनफील्डच्या अॅक्सेसरीज, रायडिंग गियर आणि इतर ब्रँडेड वस्तू देखील खरेदी करता येतील. रॉयल एनफील्डने आपल्या ग्राहकांना आधुनिक आणि सोयीस्कर खरेदी अनुभव देण्यासाठी डिजिटल विक्री क्षेत्रात वेगाने विस्तार सुरू केला आहे.