शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
2
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
3
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
4
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
6
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
7
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
8
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
9
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
10
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
11
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
12
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
13
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
14
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
15
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
16
तोल गेला, आईच्या हातातून निसटले बाळ; २१ व्या मजल्यावरून पडून बाळाचा मृत्यू
17
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
18
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
19
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?
20
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस

लवकरच लॉन्च होणार Royal Enfield ची इलेक्ट्रिक बाईक; टीझर पाहा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2024 22:04 IST

Royal Enfield Electric Bike : 4 नोव्हेंबर 2024 रोजी ही बाईक लॉन्च होणार

Royal Enfield Electric Bike : भारतातील बाईक प्रेमींसाठी Royal Enfield च्या बाईक्स जीव की प्राण आहेत. रॉयल एनफिल्डच्या पोर्टफोलिओमध्ये एकापेक्षा एक दमदार बाईक्स आहेत. आता कंपनी जागतिक स्तरावर आपली पहिली इलेक्ट्रिक बाईक लॉन्च करणार आहे. कंपनीने यासाठी खास Royal Enfield EV Instagram हँडलदेखील तयार केले आहे, ज्यावर कंपनीने आपल्या पहिल्या इलेक्ट्रिक बाईकचा टीझर रिलीज केला आहे. ही इलेक्ट्रिक बाईक इटलीमध्ये होणाऱ्या EICMA मोटर शोमध्ये लॉन्च केली जाऊ शकते. मात्र, या इलेक्ट्रिक बाईक बाबत कंपनीकडून कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

कंपनीने रिलीज केला टीझर रॉयल एनफिल्डने आपल्या इलेक्ट्रिक बाइकसाठी एक समर्पित इंस्टाग्राम हँडल तयार केले आहे. कंपनीने royalenfieldev वर टीझर पोस्ट केला आहे. व्हिडिओमध्ये ही इलेक्ट्रिक बाईक पॅराशूटद्वारे पृथ्वीवर उतरताना दिसत आहे. या पोस्टनुसार, ही इलेक्ट्रिक बाईक 4 नोव्हेंबर 2024 रोजी जागतिक स्तरावर लॉन्च केली जाईल. मात्र, ही बाईक भारतात लॉन्च होणार की नाही, याबाबत अद्याप काहीही सांगण्यात आलेले नाही.

कशी असेल रॉयल एनफिल्डची इलेक्ट्रिक बाईक ?सध्या या बाईकबद्दल कंपनीकडून जास्त माहिती देण्यात आलेली नाही. 4 नोव्हेंबर 2024 रोजी ही बाईक लॉन्च केली जाऊ शकते. रिपोर्ट्सनुसार, रॉयल एनफिल्डच्या इलेक्ट्रिक बाईकचे डिझाईन बॉबर शैलितील असू शकते. या बाईकमध्ये मोठी बॅटरी मिळू शकते, जी चांगली रेंज देण्यास सक्षम असेल. विशेष म्हणजे, गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये EICMA मोटर शोमध्ये या बाईकचे कॉन्सेप्ट मॉडेल सादर करण्यात आले होते.

टॅग्स :Royal Enfieldरॉयल एनफिल्डAutomobileवाहनbikeबाईकelectric vehicleइलेक्ट्रिक कार / स्कूटर