शहरं
Join us  
Trending Stories
1
उमेदवारी अर्ज मागे घेऊन काँग्रेस उमेदवार भाजपत; तिसऱ्या जागी विजय निश्चित
2
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
3
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
भाजप नेते दुष्यंत गौतम यांच्या कारला अपघात, मणक्याला दुखापत
5
जय शाह T20 WC साठीचा भारतीय संघ फायनल करणार, अजित आगरकर लिस्ट घेऊन अहमदाबादला 
6
मुंबई उत्तर पूर्वमध्ये वादाची ठिणगी; मिहीर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक केल्याचा आरोप, पोलिसांत तक्रार
7
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
8
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
9
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
10
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
11
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
12
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
13
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
14
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
15
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
16
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
17
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
18
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
19
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
20
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर

आता वाहतूक पोलिसांना गाडीची कागदपत्रे दाखवण्याची गरज नाही....कसे ते जाणून घ्या!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2018 9:02 AM

परिवाहन मंत्रालयाने यासंबंधीचा अध्यादेश काढला असून यामध्ये डिजिलॉकर किंवा एम- परिवाहन या अॅपवर कागदपत्रे अपलोड केल्यास ती अधिकृत समजण्यात येणार आहेत.

नवी दिल्ली : माहिती तंत्रज्ञान कायद्यामध्ये बदल केल्याने आता यापुढे वाहतूक पोलिसांना तुमचे लायसन्स आणि गाडीची कागदपत्रे पडताळणीसाठी मागता येणार नाहीत. परिवाहन मंत्रालयाने यासंबंधीचा अध्यादेश काढला असून यामध्ये डिजिलॉकर किंवा एम- परिवाहन या अॅपवर कागदपत्रे अपलोड केल्यास ती अधिकृत समजण्यात येणार आहेत.  बऱ्याचदा बाहेर जाताना वाहनाची कागदपत्रे, लायसन्स, पीयुसी, इंन्शुरन्स सोबत ठेवणे शक्य होत नव्हते. यामुळे वाहतूक पोलिसांनी अडविल्यास नाहक भुर्दंड भरावा लागत होता. आता या कटकटीपासून मुक्तता होणार आहे. वाहनाच्या नंबरवरून पोलीस त्यांच्या मोबाईलवरील अॅपवर सर्व माहिती पाहू शकणार आहेत. तसेच वाहनचालकही आपल्या अॅपवरून ही कागदपत्रे त्यांना दाखवू शकणार आहेत. याचा फायदा पोलीस आणि वाहन चालक या दोघांनाही होणार आहे.  आधी वाहनाची कागदपत्रे गहाळ झाल्यास त्याची तक्रार आरटीओकडे करूनही ही कागदपत्रे पुन्हा मिळत नव्हती. सारथी या अॅपमुळे ती पुन्हा मिळण्याची शक्यता वाढली आहे. सध्या डिजिलॉकर हे अॅपच अँड्रॉइड व आयओएसवर उपलब्ध आहे. मात्र, एम- परिवाहन हे अॅप सध्या अँड्रॉइडवर उपलब्ध असून येत्या 10 दिवसांत ते आयओएसवरही उपलब्ध करण्यात येणार असल्याचे परिवाहन मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.   माहिती तंत्रज्ञान कायदा 2000 आणि मोटार वाहन कायदा 1988 मध्ये हे बदल करण्यात आले आहेत. डिजिटल डॉक्युमेंट वाहतूक विभागाच्या कर्मचाऱ्यांकडून स्वीकारली जात नसल्याच्या बऱ्याच तक्रारी परिवाहन मंत्रालयाकडे माहिती अधिकारामार्फत करण्यात आल्या होत्या. 

टॅग्स :traffic policeवाहतूक पोलीसroad transportरस्ते वाहतूकcarकारMumbai policeमुंबई पोलीसMaharashtraमहाराष्ट्र