शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
2
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! खुद्द स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
3
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
4
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
5
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
6
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
7
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
8
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
9
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
10
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
11
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
12
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
13
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
14
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
15
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
16
दमदार इंजिनसह BMW ने भारतात लॉन्च केली सर्वात स्वस्त बाईक, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
इन्स्टाग्राम युजर्सना मोठा धक्का! रंगीत फोटो झाले काळे-पांढरे; मिनिटांत करा दुरुस्त, फॉलो करा या सोप्या स्टेप्स
18
"मी त्याच्याशीच लग्न करणार...", बिग बॉस विजेती तन्वी कोलतेने केला खुलासा; प्रेमाबद्दल म्हणाली...
19
राजकारणात येण्यापूर्वी काय करायचे राघव चड्ढा; आपने ग्लॅमरस मोहरा गमावला... 
20
सावधान! फळ आणि भाज्या खाल्ल्याने वाढतोय कॅन्सरचा धोका? नव्या रिसर्चने सर्वच हादरले
Daily Top 2Weekly Top 5

7 सीटर इलेक्ट्रिक SUV साठी तयार राहा; सिंगल चार्जवर 400KM रेंज, जाणून घ्या फीचर्स...

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2022 11:35 IST

Mercedes Benz EQB : ही सात सीटर इलेक्ट्रिक एसयूव्ही असून वर्षाच्या अखेरीस देशात लाँच केली जाणार आहे. 

नवी दिल्ली  : जर्मनीतील लक्झरी कार निर्माता कंपनी मर्सिडीज-बेंझ भारतात तिसरे इलेक्ट्रिक वाहन लाँच करण्याच्या तयारीत आहे. पुढील इलेक्ट्रिक कारचे नाव मर्सिडीज बेंझ ईक्यूबी (Mercedes Benz EQB) असणार आहे असे कंपनीने सांगितले. तसेच, ही सात सीटर इलेक्ट्रिक एसयूव्ही असून वर्षाच्या अखेरीस देशात लाँच केली जाणार आहे. 

सध्या लाँच करण्याची नेमकी तारीख अधिकृतपणे जाहीर करण्यात आलेली नाही, परंतु लाँच यावर्षी डिसेंबरमध्ये होईल,असे सूत्रांचे म्हणणे आहे. याआधी, अलीकडेच कंपनीने देशातील सर्वात जास्त रेंज देणारी इलेक्ट्रिक कार EQS लाँच केली होती. दरम्यान, Mercedes-Benz EQB ही देशातील पहिली 7 सीटर लक्झरी इलेक्ट्रिक एसयूव्हीअसणार आहे. ही कार जागतिक बाजारात आधीच लाँच करण्यात आली आहे.

Mercedes-Benz EQB इलेक्ट्रिक एसयूव्हीमध्ये  66.5 kWh लिथियम-आयन बॅटरी पॅक देण्यात येईल. मर्सिडीजचे म्हणणे आहे की,  EQB एकदा चार्ज केल्यानंतरन 400 किमी पेक्षा जास्त रेंज देईल. Mercedes-Benz EQB जागतिक बाजारपेठेत दोन ट्रिममध्ये येते. पहिला ऑल-व्हील ड्राइव्ह EQB 300 ट्रिम आहे, जो 225hp पॉवर आउटपुट आणि 390 Nm च्या पीक टॉर्कसह येतो. 

दुसरे म्हणजे ट्रिम EQB 350 आहे, जी 288hp पॉवर आणि 521 Nm पीक टॉर्क देते. मर्सिडीजने चीनमध्ये EQB ची AMG व्हर्जनही लाँच केली आहे. तिन्ही ट्रिम भारतात येणार की नाही हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. EQB इलेक्ट्रिक एसयूव्हीची डिझाईन एका मर्सिडीज एसयूव्ही सारखीच आहे. या कारला खास डिझाईन देण्यासाठी समोर आणि मागे एक लांब लाईट स्ट्रिप दिली जाईल. 

कंपनीच्या बाकीच्या इलेक्ट्रिक कार प्रमाणे कारला देखील काळ्या रंगाची ग्रिल मिळेल, ज्याच्या मध्यभागी मर्सिडीजचा लोगो असेल. कॉम्पॅक्ट एसयूव्हीमध्ये 20-इंचाचे अलॉय व्हील दिले जातील. इंटिरिअर फीचर्समध्ये 10.3-इंच डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आणि ऑगमेंटेड रिअॅलिटी नेव्हिगेशनसह इन्फोटेनमेंट डिस्प्लेचा समावेश आहे. Mercedes-Benz EQB ही भारतातील सर्वात सुरक्षित इलेक्ट्रिक कारपैकी एक असणार आहे. कारला अलीकडेच युरो NCAP कडून 5-स्टार रेटिंग मिळाले आहे.

टॅग्स :AutomobileवाहनMercedes Benzमर्सिडीज बेन्झ