Maruti ची ऐतिहासिक कामगिरी; फोर्ड आणि फॉक्सवॅगनरख्या दिग्गज कंपन्यांना मागे टाकले...
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2025 16:30 IST2025-09-29T16:30:30+5:302025-09-29T16:30:54+5:30
Maruti Suzuki जगातील टॉप 10 सर्वाधिक मूल्यवान ऑटोमोबाईल कंपन्यांमध्ये सामील झाली आहे.

Maruti ची ऐतिहासिक कामगिरी; फोर्ड आणि फॉक्सवॅगनरख्या दिग्गज कंपन्यांना मागे टाकले...
Maruti Suzuki Global Ranking: भारतातील सर्वात मोठी कार निर्माता कंपनी मारुती सुझुकीने आंतरराष्ट्रीय ऑटोमोबाईल बाजारात मोठी झेप मारली आहे. ताज्या रिपोर्टनुसार, मारुती सुझुकी आता जगातील टॉप 10 सर्वाधिक मूल्यवान ऑटोमोबाईल कंपन्यांमध्ये सामील झाली असून, तिने फोर्ड, जनरल मोटर्स आणि फॉक्सवॅगन यांसारख्या दिग्गज कंपन्यांना मागे टाकले आहे.
$57.6 अब्ज मार्केट कॅपसह ८व्या क्रमांकावर झेप
जी मारुती आपल्याला आपल्या गल्ली-बोळात अल्टो, वॅगनआर आणि स्विफ्टच्या रूपात दिसते, तीने आज ग्लोबल मार्केटमध्ये ८वा क्रमांक मिळवला आहे. कंपनीचे एकूण मार्केट कॅपिटलायझेशन आता $57.6 अब्ज अमेरिकन डॉलर झाले आहे. ही कामगिरी भारतीय ऑटो उद्योगासाठी एक मैलाचा दगड मानली जात आहे.
इतकी प्रगती कशी झाली?
मारुती सुझुकीच्या या यशामागे काही महत्त्वाचे घटक आहेत:
संशोधित GST स्ट्रक्चर - सरकारने लहान आणि बजेट कार्स (उदा. अल्टो, S-Presso, वॅगनआर) वर कर कमी केला, ज्यामुळे या कार्स अजून स्वस्त झाल्या.
वाढलेली मागणी - कर कपातीनंतर या गाड्यांच्या बुकिंगमध्ये मोठी वाढ झाली.
विदेशी गुंतवणूकदारांचा वाढता विश्वास - मारुती सुझुकी आता विश्वसनीय ब्रँड म्हणून ओळखली जात आहे.
ग्लोबल टॉप 10 ऑटोमोबाईल कंपन्या (मार्केट कॅपच्या आधारावर)
रँक | कंपनी | मार्केट कॅप (अब्ज $) |
---|---|---|
1 | टेस्ला | 1.4 ट्रिलियन |
2 | टोयोटा | 314 |
3 | BYD (चीन) | 133 |
4 | फेरारी | 92.7 |
5 | बीएमडब्ल्यू | 61.3 |
6 | मर्सिडीज-बेंझ | 59.8 |
7 | होंडा मोटर | 59 |
8 | मारुती सुझुकी | 57.6 |
9 | जनरल मोटर्स | 57.1 |
10 | फॉक्सवॅगन | 55.7 |
11 | फोर्ड | 46.3 |
सुज़ुकी मोटर्सलाही मागे टाकले!
मारुती सुझुकीने आता आपली पॅरेंट कंपनी सुज़ुकी मोटर कॉर्पोरेशन (जपान) लाही मागे टाकले आहे. सुज़ुकीचा सध्याचा मार्केट कॅप फक्त $29 अब्ज इतका आहे. याचा अर्थ, भारतीय उपकंपनीने आता ग्लोबल पातळीवरही वरचे स्थान मिळवले आहे.
पुढचे लक्ष्य
मारुती सध्या होंडा मोटर (59 अब्ज डॉलर)च्या अगदी जवळ आहे. सध्याचा वेग पाहता, येत्या काही काळात मारुती सुझुकी होंडालाही मागे टाकू शकते. भारतीय ग्राहकांचा विश्वास आणि सरकारच्या धोरणात्मक निर्णयांच्या जोरावर मारुती सुझुकीने एक ऐतिहासिक झेप घेतली आहे. आज ती केवळ भारतातच नव्हे, तर जागतिक स्तरावरही ऑटोमोबाईल इंडस्ट्रीची एक मोठी ताकद म्हणून उदयास येत आहे.