शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
5
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
6
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
7
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
8
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
9
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
10
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
11
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
12
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
13
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
14
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
15
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
16
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
17
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
18
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
19
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
20
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
Daily Top 2Weekly Top 5

मारुती सुझुकीलाही मंदीचा विळखा; 1000 कर्मचाऱ्यांची कपात

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2019 16:08 IST

मारुती सुझुकीने कंत्राटी कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केले आहे. तसेच नवीन भरतीवरही बंदी आणली आहे.

नवी दिल्ली/मुंबई : गेल्याच आठवड्यात भारतीय अर्थव्यवस्था घसरल्याचे वृत्त आल्यानंतर ऑटोमोबाईल क्षेत्रातील आर्थिक मंदीही उघड व्हायला सुरुवात झाली आहे. वाहन क्षेत्रात आलेल्या मंदीमुळे गेल्या आठवड्यात टाटा मोटर्सने उत्पादन थांबविल्याने खळबळ माजलेली असताना आता भारताची सर्वात मोठी कंपनी मारुतीनेही 1000 कर्मचाऱ्यांची कपात केली आहे. यामुळे या मंदीचा विळखा वाढू लागल्याचे संकेत मिळत आहेत. 

मारुती सुझुकीने कंत्राटी कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केले आहे. तसेच नवीन भरतीवरही बंदी आणली आहे. तसेच मंदीपासून वाचण्यासाठी कंपनी विविध उपाययोजना करत आहे. गेल्या काही महिन्यांपासून मारुतीसह अन्य वाहन कंपन्यांच्या विक्रीने ऐतिहासिक घसरण नोंदविली आहे. 

जेव्हा मंदी येते तेव्हा कंत्राटी कामगार यांना पहिला फटका बसतो. मात्र, कंपनीने या प्रकरणावर कोणतेही भाष्य केलेले नाही. केवळ मारुतीलाच नाही तर अन्य ऑटो कंपन्यांनाही उत्पादन कमी करावे लागले आहे. यामुळे अतिरिक्त कर्मचाऱ्यांना कमी केले जात आहे. 

30 स्टील कंपन्यांना लागले टाळे; टाटा मोटर्सने उत्पादन थांबविले

दर महिन्याला विक्रीमध्ये वाढ पाहणाऱ्या मारुतीला यंदा वर्षाच्या सुरुवातीपासूनच उतरता आलेख पहायला मिळाला आहे. जुलै महिन्यात मारुतीने गेल्या वर्षीच्या तुलनेत 35.1 टक्के घट नोंदविली आहे. गेल्या वर्षी जुलैमध्ये कंपनीने 154,150 कार विकल्या होत्या. तर यंदा कंपनीने 100,006 कार विकल्या आहेत. एप्रिल ते जुलै दरम्यान कंपनीच्या 474,487 कार विकल्या गेल्या आहेत. याच कालावधीत मारुतीने गेल्या वर्षी  617,990 एवढ्या कार विकल्या होत्या. 

कर्मचाऱ्यांचे पगार उशिराने, शोरुमही बंद होऊ लागलेमारुती सुझुकीने नेक्सा आणि अरिना या ब्रँडखाली कार विक्री दालने उघडली होती. मध्यम वर्गाला आकर्षित करण्याचा हा प्रयत्न होता. बलेनो, इग्निस, सियाझ, एस क्रॉस अशा कार या दालनांमधून कंपनी विकत होती. मात्र, विक्री घटल्याने डीलरना ही दालने बंद करावी लागली आहेत. तुर्भेतील नेक्साचा शोरूम याच कारणामुळे बंद करण्यात आला आहे. तर मारुतीने सेकंड हँड कारच्या क्षेत्रातही पाऊल ठेवले होते. ट्रू व्हॅल्यू या नावे त्यांनी वापरलेल्या कारची विक्री सुरु केली होती. मात्र, नवीन कारसोबत जुन्या कारची विक्रीही मंदावल्याने कर्मचाऱ्यांचे पगार काढणेही कंपनीला अवघड बनले होते. या कर्मचाऱ्यांचे पगार 20 दिवस उशिराने केले जात आहेत.  

टॅग्स :Maruti Suzukiमारुती सुझुकीTataटाटाMONEYपैसा