500 km रेंज, टॉप क्लास फीचर्स; लॉन्चला एक दिवस बाकी; कशी आहे मारुतीची पहिली EV कार?
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2025 15:31 IST2025-12-01T15:30:16+5:302025-12-01T15:31:42+5:30
मारुती सुझुकीची पहिली इलेक्ट्रिक कार उद्या भारतीय बाजारात लॉन्च होत आहे.

500 km रेंज, टॉप क्लास फीचर्स; लॉन्चला एक दिवस बाकी; कशी आहे मारुतीची पहिली EV कार?
Maruti Suzuki E Vitara: देशातील सर्वात मोठी कार उत्पादक कंपनी मारुती सुझुकी उद्या, म्हणजेच 2 डिसेंबर रोजी आपली पहिली इलेक्ट्रिक कार बाजारात आणत आहे. ग्राहकांमध्ये या इलेक्ट्रिक SUV बद्दल मोठी उत्सुकता असून, लॉन्चपूर्वी कंपनीने या गाडीचे अनेक महत्त्वाचे फीचर्स उघड केले आहेत.
Maruti Suzuki E Vitara
E Vitara 10 रंगांमध्ये उपलब्ध असेल, यात 4 ड्युअल-टोन ऑप्शन्स आणि 6 सिंगल-टोन ऑप्शन्सचा पर्याय देण्यात आला आहे. तसेच, या गाडीत 3 ड्रायव्हिंग मोड्स इको, नॉर्मल आणि स्नो मिळतील.
टॉप फीचर्स
1. पॅनोरामिक सनरूफ
फिक्स्ड ग्लाससह येणारे पॅनोरामिक सनरुफ या SUV ला प्रीमियम आणि लक्झरी लुक देतो.
2. व्हेंटिलेटेड सीट्स
5-सीटर SUV च्या फ्रंटमध्ये व्हेंटिलेटेड सीट्स देण्यात आल्या आहेत, ज्यामुळे ड्रायव्हर आणि पुढे बसणाऱ्या प्रवाशाला अधिक आरामदायी अनुभव मिळेल.
3. दमदार सेफ्टी फीचर्स
6 एअरबॅग + ड्रायव्हर Knee एअरबॅग
Electronic Stability Program
ADAS Level-2 ज्यामध्ये 15 पेक्षा जास्त फीचर्स
लेन डिपार्चर वॉर्निंग
अॅडॅप्टिव क्रूझ कंट्रोल
हाई बीम असिस्ट
अॅडॅप्टिव इमर्जन्सी ब्रेकिंग
याशिवाय, रियरव्यू कॅमेरा आणि पार्किंग सेन्सर्सही दिले गेले आहेत.
4. आरामदायी सीटिंग आणि स्पेस
10-वे पावर अॅडजस्टेबल ड्रायव्हर सीट
स्लाइडिंग व रिक्लाइनिंग रियर सीट्स
फ्लेक्सिबल बूट स्पेस
5. वायरलेस चार्जिंग
स्मार्टफोन चार्जिंगसाठी वायरलेस चार्जिंग पॅडही उपलब्ध असेल.
Maruti Suzuki E Vitara Range
कंपनीने लॉन्चपूर्वी गाडीची रेंज जाहीर केली आहे. यानुसार, 61 kWh बॅटरी एकदा फुल चार्जमध्ये 500 किमी रेंज देते.
Maruti Suzuki E Vitara किंमत (संभाव्य)
कारदेखोच्या माहितीनुसार, E Vitara ची किंमत ₹17 लाख (एक्स-शोरूम) पासून सुरू होऊ शकते. या किंमतीत ही SUV Hyundai Creta Electric, Tata Curvv EV, Mahindra BE 6 आणि MG Windsor EV या गाड्यांना टक्कर देईल. ई विटारा लॉन्चनंतर भारतीय इलेक्ट्रिक SUV सेगमेंटमध्ये मोठी स्पर्धा निर्माण होणार असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.