मारुतीचा नवा रेकॉर्ड! वाहनांच्या विक्रीत 19 टक्क्यांनी वाढ; Brezza, Grand Vitara चा समावेश

By ऑनलाइन लोकमत | Published: November 1, 2023 06:30 PM2023-11-01T18:30:02+5:302023-11-01T18:30:56+5:30

देशातील सर्वात मोठी कार कंपनी मारुती सुझुकी इंडियाची विक्री ऑक्टोबरमध्ये वार्षिक आधारावर 19 टक्क्यांनी वाढून 1,99,217 युनिट्स झाली आहे. 

maruti sales increase by 19 percent in october | मारुतीचा नवा रेकॉर्ड! वाहनांच्या विक्रीत 19 टक्क्यांनी वाढ; Brezza, Grand Vitara चा समावेश

मारुतीचा नवा रेकॉर्ड! वाहनांच्या विक्रीत 19 टक्क्यांनी वाढ; Brezza, Grand Vitara चा समावेश

नवी दिल्ली : ऑटोमोबाईल क्षेत्रातील कंपनी मारुती सुझुकीच्या वाहनांना बाजारात मोठी मागणी आहे. ग्राहकांकडून मारुतीच्या गाड्यांची खरेदी मोठ्या प्रमाणात होत असल्याचे दिसून येत आहे. यासदंर्भात आकडेवारी समोर आली आहे. सणासुदीचा हंगाम सुरू होताच मारुतीने विक्रीच्या बाबतीत नवा विक्रम केला आहे. देशातील सर्वात मोठी कार कंपनी मारुती सुझुकी इंडियाची विक्री ऑक्टोबरमध्ये वार्षिक आधारावर 19 टक्क्यांनी वाढून 1,99,217 युनिट्स झाली आहे. 

कंपनीचा हा सर्वाधिक मासिक विक्रीचा आकडा आहे. या विक्रीसह मारुतीने नवा विक्रम केला आहे. कंपनीने बुधवारी सांगितले की, ऑक्टोबरमध्ये देशांतर्गत बाजारात कारची विक्री 1,77,266 युनिट्स इतकी झाली, जी आजपर्यंतची कंपनीची सर्वोत्तम कामगिरी आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत कंपनीची देशांतर्गत विक्री 1,47,072 युनिट्स होती. अशा प्रकारे देशांतर्गत बाजारात कंपनीची विक्री 21 टक्क्यांनी वाढली आहे.

प्रवासी वाहनांबद्दल बोलायचे झाले तर, या सेगमेंटमध्येही कंपनीने वेगाने वाढ नोंदवली आहे. देशांतर्गत बाजारपेठेत कंपनीची प्रवासी वाहन विक्री ऑक्टोबर 2023 मध्ये 1,68,047 युनिट्सपर्यंत वाढली, जी एका वर्षापूर्वी याच महिन्यात 1,40,337 युनिट्स होती. मात्र, या काळात कंपनीच्या मिनी कार आणि एस-प्रेसोची विक्री 14,568 युनिट्सवर घसरली. वर्षभरापूर्वी मिनी कारची विक्री 24,936 युनिट्स होती. तर कॉम्पॅक्ट युनिट्समध्ये, कंपनीची बलेनो, सेलेरियो, डिझायर, इग्निस, स्विफ्ट, टूर एस आणि वॅगनआरची विक्री 73,685 युनिट्सवरून 80,662 युनिट्सपर्यंत वाढली आहे.

याचबरोबर, युटिलिटी सेगमेंटने मारुतीच्या विक्रीत जोरदार उडी घेतली आहे. कंपनीने या सेगमेंटमधील विक्रीत 91 टक्क्यांची मजबूत वाढ दिसून आली आहे. कंपनीने या सेगमेंटमध्ये 91 टक्के वाढीसह 59,147 वाहनांची विक्री केली. यापूर्वी या सेगमेंटची विक्री 30,971 युनिट्स होती. या सेगमेंटमध्ये कंपनीच्या Brezza, Grand Vitara, Ertiga आणि XL6 मॉडेलचा समावेश होतो. कंपनीने निर्यातीमध्ये चांगली वाढ नोंदवली आहे. ऑक्टोबर 2023 मध्ये कंपनीची निर्यात 21,951 युनिट्सपर्यंत वाढली, जी मागील वर्षी याच महिन्यात 20,448 युनिट्स होती.

Web Title: maruti sales increase by 19 percent in october

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.