शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यभरात इंधन टंचाई! बऱ्याच पेट्रोल पंपांवर पेट्रोल, डिझेल संपलेले; ट्रॅक्टर थांबले, डिझेलसाठी शेतकरी रांगेत  
2
नीट पेपरफुटीचा भंडाफोड कसा झाला? या शिक्षकाच्या लक्षात आले नसते तर...
3
मृत्यू कलिंगडामुळे नाही तर...; ४ जणांच्या मृत्यू प्रकरणात पोलिसांच्या हाती लागला खळबळजनक माहिती
4
Deepika Nagar :"रात्री साडेबाराला मोठा आवाज झाला अन्..." शेजाऱ्याने उघड केली 'त्या' रात्रीची संपूर्ण कहाणी!
5
PM Modi Donald Trump: भारताचे पंतप्रधान आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष पुढच्या महिन्यात भेटणार; कोणत्या देशामध्ये होणार भेट?
6
"शुक्रवार, शनिवार किंवा रविवार..." इराणवर पुन्हा होणार मोठा हल्ला; डोनाल्ड ट्रम्प यांनी केले जाहीर
7
BRICS Summit 2026: तब्बल ७ वर्षांनंतर शी जिनपिंग भारतात येणार! दिल्लीतील ब्रिक्स परिषदेला पुतिन यांचीही उपस्थिती असणार
8
धोकादायक कुत्र्यांना मृत्यूचे इंजेक्शन द्या : सुप्रीम काेर्ट; दयामरण देण्यास प्रथमच परवानगी
9
मोटेगावकर पेपरफुटीविरोधात लढत होता, आता स्वतःच आरोपी बनला...
10
"असे १०० जाळून टाकेन...", हॉस्पिटलबाहेर फोटो काढणाऱ्या पापाराझींवर भडकला सलमान खान, दिला थेट इशारा
11
संपादकीय: बांधावर घोंगावणारे वादळ, वेळीच नाही ओळखले तर...
12
नाश्ता महागला; पाव, ब्रेडच्या किमतीत १०% वाढ
13
आजचे राशीभविष्य, २० मे २०२६: आजचा दिवस आर्थिक दृष्टया लाभदायी, पण अवैध कामासून राहावे लागेल दूर; कोणत्या राशींच्या लोकांनी घ्यावी काळजी?
14
१९ जिल्हे ४५ अंश सेल्सिअस पार, जलसाठे घटताहेत; मंत्रिमंडळ बैठकीत चिंता
15
आयएएस तुकाराम मुंढे आता ‘अन्न व औषधी प्रशासन’च्या आयुक्तपदी, २१ वर्षांत २५ वी बदली; आणखी तीन बदल्या
16
मोटेगावकरच्या मुलाचीही सीबीआय चौकशी; विदर्भातील ३ उमेदवारांच्या घराची झाडाझडती
17
महाराष्ट्राचे अणुऊर्जा निर्मिती क्षेत्रात मोठे पाऊल, साडेसहा लाख कोटींची गुंतवणूक
18
भोंदू खरातला ‘ईडी’कडून अटक; कोट्यवधींचे मायाजाल उलगडणार
19
‘ईपीएफ’चे पैसे ‘यूपीआय’द्वारे काढता येणार; तांत्रिक चाचणी यशस्वी
20
शिंदेसेनेच्या नगरसेवकांना १५४ कोटी; भाजपच्या वाट्याला केवळ ३ कोटी
Daily Top 2Weekly Top 5

रस्त्यावर उतरणार इलेक्ट्रिक 'ऑटोप्लेन'! एकदा चार्ज केल्यास २०० किमी धावणार, किंमत... 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2026 13:31 IST

महिंद्रा उडोचे डिझाइन विमानातून प्रेरित असून कंपनीने या ऑटोला ‘ऑटोप्लेन’ या संकल्पनेतून साकारले आहे

मुंबई - देशातील अग्रगण्य व्यावसायिक वाहन उत्पादक कंपनी महिंद्रा गुपची सब्सिडियरी कंपनी महिंद्रा लास्ट मोबिलिटी कंपनीने मार्केटमध्ये नवीन इलेक्ट्रिक थ्री व्हिलर लॉन्च केली आहे. कंपनीने या इलेक्ट्रिक ऑटोमध्ये अनेक खास फिचर्स दिले आहेत जे याला इतर ई ऑटोपेक्षा वेगळे बनवतात. कंपनीने Mahindra UDO या नावाने ही इलेक्ट्रिक ऑटो बाजारात आणली आहे. 

महिंद्रा उडोचे डिझाइन विमानातून प्रेरित असून कंपनीने या ऑटोला ‘ऑटोप्लेन’ या संकल्पनेतून साकारले आहे. याचे डिझाइन, परफॉर्मन्स आणि आराम या तिन्ही गोष्टींची विशेष काळजी घेतली आहे. या इलेक्ट्रिक ऑटोची सुरुवातीची किंमत ३ लाख ८४ हजार २९९ इतकी निश्चित करण्यात आली आहे. मात्र मर्यादित कालावधीसाठी याची किंमत ३ लाख ५८ हजार ९९९  या विशेष किमतीत उपलब्ध असणार आहे. ऑटोमध्ये ड्रायव्हर आणि पॅसेंजरच्या कन्फर्टकडे लक्ष देण्यात आले आहे. भारतात थ्री व्हिलर सेगमेंट हे सर्वात मोठे मार्केट आहे. १९४८ पासून पारंपारिक ऑटो डिझाइनमध्ये चालक आणि प्रवाशांच्या आरामाकडे फारसे लक्ष देण्यात आले नव्हते. मात्र  उडोचे आकर्षक, एरोडायनॅमिक डिझाइन, दमदार हेडलॅम्प्स, स्टायलिश मिरर्स आणि मोठे विंडशील्ड यामुळे रस्त्यावर त्याची झलक अधिक प्रभावी आणि वेगळी ठरते.

ऑटोप्लेनच्या आतील रचना देखील तितकीच विचारपूर्वक करण्यात आली आहे. चालक आणि प्रवाशांच्या आरामाला केंद्रस्थानी ठेवून एर्गोनॉमिक डिझाइनची आसनव्यवस्था देण्यात आली आहे. चालकासाठी विशेष ‘पायलट सीट’ देण्यात आली असून ती या सेगमेंटमधील इतर वाहनांच्या तुलनेत सुमारे २० टक्के अधिक जाड आणि अधिक आरामदायी आहे. प्रवाशांसाठी ‘फर्स्ट-क्लास’ आसनव्यवस्था देण्यात आली आहे. अधिक लेगरूम आणि हेडरूममुळे लांब प्रवासातही लाउंजसारखा आरामदायी अनुभव मिळतो. खडबडीत रस्त्यांवरही अधिक स्थिरता आणि स्मूथ राइड मिळावी यासाठी स्वतंत्र रिअर सस्पेन्शन आणि ड्युअल-फोर्क फ्रंट सस्पेन्शनची सुविधा देण्यात आली आहे.

काय आहेत फिचर्स?

महेंद्रा उडो सिंगल चार्जमध्ये २०० किमीपर्यंत रेंज देते. यामध्ये IP67-रेटेड 11.7 kWh लेझर-वेल्डेड लिथियम-आयन बॅटरी पॅक देण्यात आला आहे. PMS मोटरमुळे १० kW पीक पॉवर आणि ५२ Nm टॉर्क मिळतो, ज्यामुळे वाहनाला दमदार गती आणि ताकद मिळते. उडोमध्ये रिजनरेटिव्ह ब्रेकिंगची सुविधा असून सेगमेंटमध्ये पहिल्यांदाच देण्यात आलेल्या रिव्हर्स थ्रॉटलसोबत मिळून ब्रेक न दाबताही सहज गती नियंत्रण शक्य होते. रिव्हर्स थ्रॉटलमुळे रेंज वाढण्यास मदत होते तसेच अधिक स्मूथ राइड अनुभव मिळतो.

हिल होल्ड असिस्ट आणि क्रीप फंक्शनमुळे चढावावर स्थिरता राखणे आणि बंपर-टू-बंपर ट्रॅफिकमध्ये सहज ड्रायव्हिंग करणे शक्य होते. ‘रेंज’, ‘राइड’ आणि ‘रेस’ या थ्रीमोड ड्रायव्हिंग सिस्टीममुळे चालकांना ट्रॅफिक परिस्थितीनुसार कार्यक्षमतेत आणि परफॉर्मन्समध्ये संतुलन साधता येते.‘रेस’ मोडमध्ये ५५ किमी/तास इतका टॉप स्पीड मिळत असल्याने फेऱ्या जलद पूर्ण करून अधिक उत्पन्न कमावण्याची संधी चालकांना मिळेल. १ लाखापर्यंत फ्री सर्व्हिस कंपनीकडून देण्यात येणार आहे. महिंद्रा उडोचे उत्पादन जहिराबाद येथील महिंद्राच्या अत्याधुनिक उत्पादन प्रकल्पात केले जात आहे. या प्रकल्पात कंपनीने मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली असून पूर्णपणे स्वयंचलित बॅटरी असेंब्ली आणि रोबोटायझ्ड उत्पादन लाईन्सची उभारणी करण्यात आली आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Mahindra's Electric 'Autoplane' Launched: 200km Range, Price Revealed!

Web Summary : Mahindra Last Mile Mobility launched the UDO, an electric three-wheeler inspired by airplanes. Priced from ₹3.59 lakh, it offers a 200km range, driver comfort, regenerative braking and a three-mode driving system.
टॅग्स :auto rickshawऑटो रिक्षाMahindraमहिंद्रा