महिंद्राने लाँच केली जगातील पहिली फॉर्म्युला ई-थीम एसयूव्ही, फ्यूचरिस्टिक डिझाइन अन् वर्ल्ड क्लास फीचर्स; जाणून घ्या किंमत
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2025 01:28 IST2025-11-27T01:27:38+5:302025-11-27T01:28:50+5:30
या खास एसयूव्हीची बुकिंग १४ जानेवारी २०२६ पासून सुरू होईल, तर डिलिव्हरी १४ फेब्रुवारी २०२६ पासून सुरू होईल.

महिंद्राने लाँच केली जगातील पहिली फॉर्म्युला ई-थीम एसयूव्ही, फ्यूचरिस्टिक डिझाइन अन् वर्ल्ड क्लास फीचर्स; जाणून घ्या किंमत
महिंद्राने भारतीय मोटरस्पोर्ट इतिहासात आता एक नवे पान जोडले आहे. महिंद्राने जगातील पहिली फॉर्म्युला ई-थीमवर आधारित एसयूव्ही, महिंद्रा BE 6 फॉर्म्युला ई-एडिशन (Mahindra BE 6 Formula E Edition) लाँच केली आहे. या कारची एक्स शोरूम किंमत ₹२३.६९ लाख (FE2) आणि ₹२४.४९ लाख (FE3) एवढी असेल. जागतिक फॉर्म्युला ई-सीझन ११ मध्ये चौथा क्रमांक मिळवलेल्या महिंद्रा रेसिंग (Mahindra Racing) टीमपासून प्रेरित असलेली ही पहिली रोड कार आहे.
या एसयूव्हीला फॉर्म्युला ई-प्रेरित आकर्षक फ्रंट बंपर, ग्लॉस-ब्लॅक फिनिशसह सर्क्युलर प्रोजेक्टर हेडलॅम्प्स आणि फायरस्टॉर्म ऑरेंज मोटरस्पोर्ट्सचे खास एक्सेंट्स मिळतात. ही एसयूव्ही एव्हरेस्ट व्हाईट, फायरस्टॉर्म ऑरेंज, स्टील्थ ब्लॅक आणि टँगो रेड या विशेष रंगांमध्ये उपलब्ध आहे. यात डार्क-टिंटेड R20 अलॉय व्हील्स, ऑरेंज ब्रेक कॅलिपर्स आणि फॉर्म्युला ई बॅजिंग व डिकल्स (रूफ, फेंडर, बंपरवर) देण्यात आले आहेत, ज्यामुळे ती 'रोड-रेडी इलेक्ट्रिक रेस मशीन' वाटते.
कारच्या आत Firestorm Orange थीम असून, फॉर्म्युला ई लोगो एम्बॉस्ड डॅशबोर्ड, सीट्स आणि सेंटर कन्सो मिळते. FIA ब्रँडेड सीट बेल्ट्स, ऑरेंज एक्सेंटेड स्टीअरिंग, रेस-स्टाईल फ्लॅपसह स्टार्ट/स्टॉप बटण आणि एक्सक्लुझिव्ह फॉर्म्युला ई डिजिटल स्टार्टअप ॲनिमेशनमुळे आत बसल्यावर 'इलेक्ट्रिक रेस कार'मध्ये बसल्याचा अनुभव येतो.
यासंदर्भात बोलताना, महिंद्राचे अध्यक्ष आर. वेलुसामी म्हणाले, "BE 6 केवळ फ्यूचरिस्टिकच दिसत नाही, तर आत बसल्यावर रेस कारचा अनुभव देते. फॉर्म्युला ई एडिशन रेसिंगच्या याच उत्कटतेला सेलिब्रेट करते."
या खास एसयूव्हीची बुकिंग १४ जानेवारी २०२६ पासून सुरू होईल, तर डिलिव्हरी १४ फेब्रुवारी २०२६ पासून सुरू होईल.