'या' EV कारवर भारतीय ग्राहक तुटून पडले; कंपनीने दर 10 मिनिटाला विकली एक इलेक्ट्रिक SUV
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2025 14:03 IST2025-11-27T14:02:10+5:302025-11-27T14:03:02+5:30
Mahindra EV : फक्त 7 महिन्यांत 30 हजार इलेक्ट्रिक SUV ची विक्री!

'या' EV कारवर भारतीय ग्राहक तुटून पडले; कंपनीने दर 10 मिनिटाला विकली एक इलेक्ट्रिक SUV
Mahindra EV : भारतीय बाजारपेठेत इलेक्ट्रिक कारची मागणी झपाट्याने वाढत आहे. या EV सेगमेंटमध्ये महिंद्राने सर्वात मोठी झेप घेतली आहे. कंपनीने अवघ्या 7 महिन्यांत तब्बल 30,000 इलेक्ट्रिक SUV विकल्या. कंपनीचे म्हणणे आहे की, दर 10 मिनिटाला त्यांची एक EV विकली जात आहे. ही कामगिरी कंपनीच्या इलेक्ट्रिक धोरणाला एक नवीन दिशा देते आणि हे दर्शवते की, ग्राहक आता EV तंत्रज्ञानावर पूर्वीपेक्षा जास्त विश्वास ठेवत आहेत.
XEV 9e आणि BE 6 ला सर्वाधिक मागणी
गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये लॉन्च झालेल्या XEV 9e आणि BE 6 हे मॉडेल्स महिंद्रासाठी ‘गेम चेंजर’ ठरले. या दोन्ही मॉडेल्सच्या लोकप्रियतेमुळे ब्रँडची नवीन ग्राहकांपर्यंत पोहोच वाढली. महिंद्राचा दावा आहे की, या EV's खरेदी करणाऱ्या 80% लोकांनी पहिल्यांदाच महिंद्राची कार विकत घेतली आहे. यामुळे कंपनीला संपूर्ण नवीन ग्राहकवर्ग मिळाला असून, ब्रँडच्या मार्केट शेअरमध्ये मोठी वाढ झाली आहे.
रस्त्यावर दिसतात 65% महिंद्रा EV
कंपनीने सांगितले की, त्यांच्या इलेक्ट्रिक SUV लाइनअपमधील सुमारे 65% गाड्या दररोज रस्त्यावर धावताना दिसतात. याचा अर्थ असा की, ग्राहक ईव्हीला फक्त सेकेंडरी किंवा शौकिया वाहन म्हणून वापरत नाहीत, तर दैनंदिन प्रवासासाठी EVs हा विश्वासार्ह पर्याय बनत आहे. यावरुनच भारतात ईव्ही तंत्रज्ञानावरील विश्वास वेगाने वाढत असल्याचे सिद्ध होते.
महिंद्राचे EV व्हिजन
महिंद्रा भारतीय EV बाजारातील एक मोठा खेळाडू आहेच, पण आता कंपनी जागतिक इलेक्ट्रिक वाहन स्पर्धेतही आपली उपस्थिती मजबूत करत आहे. बंगळुरूमध्ये झालेल्या Scream Electric कार्यक्रमात कंपनीने आपली भविष्यातील योजना सांगितले. कंपनी Formula E मध्ये आपले अस्तित्व आणखी बळकट करण्याची तयारी करत आहे. या पार्श्वभूमीवर कंपनीने XEV 9S First Anniversary Edition लॉन्च केले. याशिवाय, अनेक नवीन EV केंद्रित कॉन्सेप्ट्स आणि भविष्यकाळातील थीम्सचे अनावरणदेखील केले.