Electric Car: एका चार्जवर ३ देश फिरले, 'या' इलेक्ट्रिक कारची गिनीज बूकमध्ये नोंद होणार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2025 12:05 IST2025-07-12T12:00:10+5:302025-07-12T12:05:08+5:30

Lucid Air Grand Touring: जगभरात इलेक्ट्रिक कारची मागणी हळूहळू वाढत चालली आहे.

Lucid Air Grand Touring Sets World Record for Longest EV Journey on a Single Charge | Electric Car: एका चार्जवर ३ देश फिरले, 'या' इलेक्ट्रिक कारची गिनीज बूकमध्ये नोंद होणार!

Electric Car: एका चार्जवर ३ देश फिरले, 'या' इलेक्ट्रिक कारची गिनीज बूकमध्ये नोंद होणार!

जगभरात इलेक्ट्रिक कारची मागणी हळूहळू वाढत चालली आहे. अशा परिस्थितीत, एका चार्जवर सर्वात लांबचा पल्ला गाठणारी इलेक्ट्रिक कार कोणती आहे? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. मात्र, आता अमेरिकेच्या एका इलेक्ट्रिक कारने एका चार्जवर तीन देशांचा प्रवास करून अनेकांना आश्चर्यचकीत केले. 

अमेरिकन कंपनी ल्युसिड एअरने ग्रँड टूरिंग मॉडेलसह एकाच तीन देशांचा प्रवास पूर्ण केला आणि १२०० किमी अंतर कापले. ल्युसिड एअरच्या ग्रँड टूरिंग मॉडेलने स्वित्झर्लंडमधील सेंट मॉरिट्झ ते जर्मनीतील म्युनिकपर्यंत नॉनस्टॉप सुमारे १ हजार २०७ किमी अंतर कापले आहे. या प्रवासादरम्यान कार कुठेही चार्ज करण्यात आली नाही. ३ देशांच्या नॉनस्टॉप प्रवासात अनेक प्रकारचे रस्ते समाविष्ट होते. 

गिनीज बूकमध्ये नोंद होणार!
लंडनचे उद्योगपती उमित सबांसी यांनी युरोपातील तीन देशांमध्ये १२०० किमीपेक्षा जास्त वेळ ही कार चालवून हा रेकॉर्ड प्रस्थापित केला. ही कार इलेक्ट्रिक वाहन क्षेत्रात आघाडीवर आहे. या इलेक्ट्रिक कारची आता गिनीज बूकमध्ये नोंद केली जाणार आहे, अशी माहिती आहे.

किंमत काय?
इलेक्ट्रिक कार १.८९ सेकंदात ०-१०० किमी प्रतितास वेगाने धावते. हेच कारण आहे की, ती जगातील सर्वात वेगवान सेडान कार देखील आहे. त्याच्या टॉप स्पीडबद्दल बोलायचे झाले तर, ती २७० किमी प्रतितास पेक्षा जास्त आहे. या इलेक्ट्रिक कारची किंमत २ कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे.

Web Title: Lucid Air Grand Touring Sets World Record for Longest EV Journey on a Single Charge

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.