उद्योगांना एलपीजी बंदीचा ऑटो इंडस्ट्रीला फटका बसू लागला; बजाजसारख्या कंपन्यांचे उत्पादन थांबण्याची शक्यता
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2026 10:31 IST2026-03-11T10:29:51+5:302026-03-11T10:31:07+5:30
LPG Shortage impact on Auto Industry: औरंगाबाद एमआयडीसीतील बजाज ऑटोच्या व्हेंडर्सना गॅस पुरवठा बंद. कमर्शिअल गॅस सिलिंडरच्या टंचाईमुळे असेम्ब्ली लाईन ठप्प. वाचा सविस्तर अपडेट.

उद्योगांना एलपीजी बंदीचा ऑटो इंडस्ट्रीला फटका बसू लागला; बजाजसारख्या कंपन्यांचे उत्पादन थांबण्याची शक्यता
इराणयुद्धामुळे उद्योगांना, हॉटेल व्यावसायिकांना कमर्शिअल गॅस सिंलिंडर पुरवठा रोखण्यात आला आहे. याचा फटका ऑटो इंडस्ट्रीला देखील बसण्यास सुरुवात झाली असून औरंगाबाद एमआयडीसीतील बजाज ऑटोला सुटे भाग पुरविणाऱ्या कंपनीमधील काही असेम्ब्ली लाईन बंद ठेवण्यात आल्या आहेत. यामुळे बजाज ऑटोच्या उत्पादनाला या टंचाईचा फटका बसणार आहे.
इंडस्ट्रीला पुरविण्यात येणारे गॅस सिलिंडर हे वेगळे असतात. पांढऱ्या-चंदेरी रंगाचे हे मोठे सिलिंडर असतात. त्यांचा पुरवठा करणारे व्हेंडर असतात. या पुरवठादारांना यापुढे एलपीजी सिलिंडर न देण्याचे आदेश केंद्र सरकारकडूनच आले आहेत. यामुळे त्यांनीही पुढील पुरवठा थांबविला आहे. यामुळे या कंपन्यांना त्यांच्याकडे असलेल्या स्टॉक सिलिंडरचे नियोजन करावे लागत आहे.
बजाज ऑटोच्या ऑटो रिक्षासाठी पार्ट पुरविणाऱ्या कंपनीचे प्लांट मॅनेजर महेश बावकर यांनी ही माहिती दिली आहे. बजाज ऑटो पावडर कोटिंग आणि अन्य प्रोसेससाठी एलपीजी गॅस लागतो. सध्या आमच्याकडे उपलब्ध असलेल्या गॅसवर उत्पादन सुरु आहे. पुरवठादार असलेल्या हिंदुस्तान पेट्रोलिअम सोबत चर्चा सुरु आहे. परंतू, कधीपर्यंत गॅस मिळेल याबाबत त्यांच्याकडून काहीच माहिती मिळालेली नाही, असे त्यांनी सांगितले.