२०२६ मध्ये भारतीय बाजारात 'धमाका' करण्याच्या तयारीत किआ! घेऊन येतेय ३ ढासू मॉडेल, EV चाही समावेश
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2025 11:56 IST2025-12-16T11:54:05+5:302025-12-16T11:56:29+5:30
किआसाच्या इलेक्ट्रिक आणि प्रीमियम सेगमेंटमधील विस्ताराच्या दृष्टीने, २०२६ हे वर्ष भारतीय बाजारात तिचे स्थान अधिक बळकट करण्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे राहणार आहे.

२०२६ मध्ये भारतीय बाजारात 'धमाका' करण्याच्या तयारीत किआ! घेऊन येतेय ३ ढासू मॉडेल, EV चाही समावेश
दिग्गज कार निर्माता कंपनी किआ (Kia) २०२६ मध्ये भारतीय भाजारात मोठा धमाका करण्यच्या तयारीत आहे. खरे तर, पेट्रोल-डिझेल, इलेक्ट्रिक आणि प्रीमियम सेगमेंटमध्ये हे वर्ष कंपनीसाठी अत्यंत महत्वाचे ठरणार आहे. किआ आपली लोकप्रिय एसयूव्ही सेल्टोस (Seltos) २०२६ चे अपडेटेड व्हर्जन २ जानेवारी २०२६ रोजी लान्च करण्याच्या तयारीत आहे.
या दुसऱ्या जनरेशनच्या एसयूव्हीला पूर्णपणे नवे आणि बोल्ड डिझाइन, तसेच वाढलेले केबिन स्पेस मिळणार आहे, किआ सेल्टोस २०२६ ची किंमत सुमारे ₹१२ लाख ते ₹२२ लाखपर्यंत असण्याची शक्यता आहे.
किआ साइरोस EV -
किआ २०२६ च्या रोडमॅपमध्ये इलेक्ट्रिक एसयूव्ही साइरोस EV (Syros EV) आणण्याच्या तयारीत आहे. २०२६ च्या दुसऱ्या तिमाहीत ही कार लॉन्च होणे अपेक्षित आहे. ही इलेक्ट्रिक एसयूव्ही K1 प्लॅटफॉर्मवर आधारित असेल. यात ४२kWh आणि ४९kWh बॅटरी पॅक मिळण्याची शक्यता आहे, यामुळे ३०० ते ३५५ किलोमीटरपर्यंतची रेंज मिळू शकेल. याची अंदाजित किंमत ₹१५ लाख ते ₹१८ लाख दरम्यान असू शकते.
प्रीमियम एसयूव्ही किआ Sorento -
किआ Sorento ही कियाच्या २०२६ च्या लाइनअपमधील सर्वात प्रीमियम एसयूव्ही आणणार आहे. या ७-सीटर एसयूव्हीमध्ये मोठे केबिन, ड्युअल १२.३-इंच कर्व्ह्ड डिस्प्ले आणि लेव्हल-२ ADAS सारखे फीचर्स मिळतील. वर्षाच्या दुसऱ्या सहामाहीत ही एसयूव्ही भारतात येऊ शकते आणि तिची किंमत सुमारे ₹३५ लाखपर्यंत असण्याची शक्यता आहे.
थोड्यात काय तर, किआसाच्या इलेक्ट्रिक आणि प्रीमियम सेगमेंटमधील विस्ताराच्या दृष्टीने, २०२६ हे वर्ष भारतीय बाजारात तिचे स्थान अधिक बळकट करण्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे राहणार आहे.