Kawasaki: कावासाकीनं लॉन्च केली खतरनाक बाइक; किंमत महिंद्रा थारपेक्षाही जास्त!
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2025 20:01 IST2025-10-20T19:59:19+5:302025-10-20T20:01:29+5:30
Kawasaki Versys 1100: भारतातील साहसी बाईकप्रेमींसाठी कावासाकीने नवीन आणि अधिक शक्तिशाली बाईक बाजारात आणली आहे.

Kawasaki: कावासाकीनं लॉन्च केली खतरनाक बाइक; किंमत महिंद्रा थारपेक्षाही जास्त!
भारतातील साहसी बाईकप्रेमींसाठी कावासाकीने नवीन आणि अधिक शक्तिशाली बाईक बाजारात आणली आहे. कंपनीने २०२६ कावासाकी व्हर्सिस ११०० ही बाईक भारतात लाँच केली आहे, ज्याची एक्स-शोरूम किंमत ₹१३ लाख ८९ हजार निश्चित करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, ही किंमत लोकप्रिय एसयूव्ही महिंद्रा थारच्या सुरुवातीच्या किमतीपेक्षा (₹१२ लाख २५ हजार एक्स-शोरूम) जास्त आहे.
नवीन व्हर्सिस ११०० मध्ये अनेक महत्त्वपूर्ण बदल करण्यात आले आहेत, ज्यामुळे बाईकचा राइडिंग अनुभव अधिक चांगला आणि स्मूथ झाला. यात १,०९९ सीसी इनलाइन ४-सिलेंडर, लिक्विड-कूल्ड इंजिन देण्यात आले. हे इंजिन ६-स्पीड गिअरबॉक्स आणि रिव्हर्स-शिफ्ट ट्रान्समिशन फीचरसह जोडलेले आहे, जे प्रवासाची गुणवत्ता वाढवते.
कंपनीने इंधन कार्यक्षमता सुधारण्यासाठी इंजिन कंट्रोल युनिट ऑप्टिमाइझ केले आहे. व्हर्सिस ११०० विशेषतः लांब पल्ल्याच्या राईड्ससाठी डिझाइन करण्यात आली आहे. यामध्ये २१-लिटरची मोठी इंधन टाकी देण्यात आली आहे, ज्यामुळे राईडरला जास्त पॉवरसह उत्तम मायलेजचा अनुभव मिळतो.
या बाईकमध्ये अत्याधुनिक सुरक्षा फीचर्स देण्यात आली आहेत, कावासाकी ट्रॅक्शन कंट्रोल हे फीचर निसरड्या रस्त्यांवर उत्तम नियंत्रण राखण्यासाठी मदत करते. कावासाकी कॉर्नरिंग मॅनेजमेंट फंक्शन या फीचर्समुळे वळणावर स्थिरता राखण्यास मदत मिळते. शिवाय, या बाईकमध्ये कावासाकी इंटेलिजेंट अँटी-लॉक ब्रेक सिस्टम देण्यात आले आहे, जे सुरक्षित ब्रेकिंगसाठी महत्त्वाची कामगिरी बजावते.