शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
2
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
3
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
4
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
5
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
6
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
7
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
8
काँग्रेस नेते राजेंद्र भारती यांची आमदारकी रद्द! २७ वर्षांपूर्वीचे प्रकरण काय, ज्यामुळे गमावले विधानसभा सदस्यत्व?
9
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षिक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
10
आई वडिलांना न सांभाळणाऱ्या कर्मचाऱ्यांची खैर नाही; १५% पगार कापणार, तेलंगणा सरकारचा निर्णय
11
पगार झाला की खिशाला 'कात्री'? महिनाअखेरची ओढताण टाळण्यासाठी 'हे' ५ आर्थिक मंत्र नक्की पाळा
12
PSL 2026: भर मैदानात डेव्हिड वॉर्नर- मोईन अली यांच्यात तू-तू मैं-मैं; व्हिडीओ व्हायरल, नेमकं काय घडलं?
13
होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे
14
"मी झोपलेले, तो माझ्या खोलीत आला"; अब्रू वाचवण्यासाठी अभिनेत्रीने इमारतीतून मारली उडी
15
Amit Shah Helicopter: अमित शाहांच्या हेलिकॉप्टरमध्ये उतरत असतानाच तांत्रिक बिघाड, प्रचारसभा रद्द 
16
पार्शियन आखातात अडकलं जग, दक्षिण सुदानमध्ये भारतीयांची जबरदस्त कामगिरी: UN ने केले कौतुक
17
इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची प्रक्रिया कधी सुरू होईल? ITR-1 फॉर्ममध्ये मोठा बदल? तुमच्यासाठी कोणता?
18
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
19
IPL 2026: आयपीएलमध्ये रिंकू सिंहनं इतिहास घडवला, आंद्रे रसेलसह स्टार क्रिकेटपटूंना टाकलं मागं! 
20
अन्नामलाईंना उमेदवारी नाकारली, तामिळनाडूत भाजपाचा धक्कादायक निर्णय, कारण काय? 
Daily Top 2Weekly Top 5

भारतीय रस्त्यांवर दिसली नवीन इलेक्ट्रिक SUV! महिंद्राची थार तर नक्कीच नाही, मग कोण आणतेय...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2026 09:16 IST

JSW-Chery iCar V23 India Launch: नवीन इलेक्ट्रिक SUV iCar V23 भारतात टेस्टिंग दरम्यान दिसली. ५१० किमी रेंज आणि दमदार फीचर्ससह ही कार लवकरच लाँच होणार आहे. वाचा सविस्तर माहिती.

भारतीय इलेक्ट्रिक कार मार्केटमध्ये आता एका नवीन आणि शक्तिशाली स्पर्धकाची एन्ट्री होणार आहे. JSW मोटर्स आणि चीनची प्रसिद्ध कार उत्पादक कंपनी चेरी यांच्या भागीदारीतून तयार झालेली iCar V23 ही इलेक्ट्रिक SUV नुकतीच भारतात टेस्टिंग दरम्यान दिसली आहे. या कारचा रेट्रो-मॉडर्न लूक आणि दमदार रेंज ग्राहकांचे लक्ष वेधून घेत आहे.

iCar V23 चा डिझाइन पूर्णपणे 'बॉक्सी' आणि मस्कुलर आहे. गोलाकार हेडलाईट्स आणि जीप रँग्लरप्रमाणे असणारा फ्रंट बंपर या कारला एक वेगळी ओळख देतात. २१० मिमीचे ग्राउंड क्लीयरन्स आणि २,७३५ मिमीचा मोठा व्हीलबेस यामुळे ही SUV ऑफ-रोडिंगसाठी देखील सक्षम आहे. मर्सिडीज जी-क्लासप्रमाणे याच्या मागील बाजूस एक स्टाइलिश स्टोरेज बॉक्स देण्यात आला आहे.

प्रीमियम इंटीरियर आणि स्मार्ट फीचर्सकारच्या आत १५.४ इंचाची मोठी टचस्क्रीन देण्यात आली आहे, जी ॲपल कारप्ले आणि अँड्रॉइड ऑटोला सपोर्ट करते. स्पोर्टी लुकसाठी ब्लॅक इंटीरियरमध्ये पिवळ्या रंगाचे फिनिश देण्यात आले आहे. तसेच वेंटिलेटेड आणि पॉवर-ॲडजस्टेबल सीट्स, ७-स्पीकर ऑडिओ सिस्टम आणि PM2.5 एअर फिल्टर यांसारखे फीचर्स प्रवाशांचा प्रवास सुखकर करतात.

दमदार परफॉर्मन्स आणि रेंजही इलेक्ट्रिक SUV दोन पर्यायांमध्ये उपलब्ध असू शकते:१. RWD व्हर्जन: १३६hp पॉवर आणि ४०१ किमी रेंज.२. AWD व्हर्जन: २११hp पॉवर आणि २९२Nm टॉर्क. यामध्ये ८१.७६kWh चा बॅटरी पॅक असून तो ५१० किमी पर्यंतची रेंज देऊ शकते.

सुरक्षेला प्राधान्यसुरक्षेसाठी या कारमध्ये ADAS, ५४०-डिग्री कॅमेरा, टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टम (TPMS) आणि चारही चाकांना डिस्क ब्रेक्स देण्यात आले आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : New Electric SUV Spotted on Indian Roads: Not Mahindra Thar!

Web Summary : JSW Motors and Chery's iCar V23 electric SUV, with a retro-modern design, was recently spotted testing in India. It boasts impressive range, a premium interior with a large touchscreen, and robust safety features like ADAS and a 540-degree camera.
टॅग्स :electric vehicleइलेक्ट्रिक कार / स्कूटरElectric Carइलेक्ट्रिक कार