शहरं
Join us  
Trending Stories
1
‘शटडाऊन’च्या पहिल्याच दिवशी अमेरिकेत संकट; देशातील अनेक महत्त्वाची पर्यटनस्थळे तात्पुरती बंद
2
'युरोपने चिथावणी दिली तर योग्य उत्तर मिळेल,तेल खरेदीबाबत भारत अमेरिकेच्या दबावाला झुकणार नाही';पुतिन यांचा स्पष्ट इशारा
3
आजचे राशीभविष्य- ०३ ऑक्टोबर २०२५, धनलाभ होईल, प्रतिस्पर्ध्यांवर मात करू शकाल
4
‘बाबा’कडे तसले टॉय, पॉर्न सीडी, अश्लील चॅट अन्... चैतन्यानंदच्या चौकशीतून धक्कादायक माहिती बाहेर
5
श्वासात, ध्यासात गांधी विचार जगलेला स्वातंत्र्य संग्रामातील तारा निखळला; ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी डॉ. जी. जी. पारीख कालवश
6
सर्व राज्यांत मतदार यादीतून हटवणार मृत व्यक्तींची नावे; जन्म-मृत्यू नोंदणी कार्यालयाचा डेटा निवडणूक यंत्रणेशी जोडणार
7
तेजीचे दिवस; अर्थव्यवस्थेची मरगळ झटकली, नोकऱ्या आणि गिग कामगारांसाठी 'अच्छे दिन' का?
8
हिंसा हे प्रश्नांचे उत्तर नाही, लोकशाहीतूनच आमूलाग्र बदल शक्य आहे : सरसंघचालक डॉ. मोहन भागवत
9
संकटात जो घरी बसतो तो कसला आला शिवसैनिक? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उद्धव ठाकरेंवर टीका
10
संघ मेहनतीला लागलेले भाजप हे विषारी फळच! उद्धव ठाकरे यांचा दसरा मेळाव्यात घणाघात
11
मुंबई महापालिकेवर युतीचा भगवा फडकणार; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नेस्काेच्या सभेत घाेषणा
12
डॉ. जी. जी. पारीख गोवा महामार्गाच्या आंदोलनात खुर्ची टाकून बसले तेव्हा!
13
केवळ लठ्ठपणाच नव्हे, तर मुलांच्या यकृतातील चरबी ठरतेय गंभीर आजारांसाठी आमंत्रण!
14
आता पाहा, मित्र-मित्रच एकमेकांना कापताना दिसतील!
15
महापालिका अदानींच्या पायावर ठेवणार का? उद्धव ठाकरेंचा सवाल, श्वेतपत्रिकेची केली घोषणा
16
जेईई, नीट यांसारख्या परीक्षा अन् बारावीचा अभ्यासक्रम यापैकी नेमके कठीण काय? केंद्र करणार मूल्यमापन 
17
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
18
दिवाळीपूर्वी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होणार : अजित पवार
19
Sana Mir Controversial Comment : सनाची Live मॅच वेळी वादग्रस्त कमेंट; ICC तिला नोकरीवरून काढणार?
20
आंतरराष्ट्रीय कुख्यात गँगशी संबंधित १० जणांना अमरावती येथील परतवाड्यातून घेतले ताब्यात

स्कूटरच्या सुरक्षेसाठी लोखंडी गार्ड लावून घेणे महत्वाचेच

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2017 13:58 IST

रस्त्यावरचे खड्डे, गति अवरोधक तीव्र वळणे तसेच वाहतुकीत परस्परांच्या जवळून जाणारी वाहने या सर्वांचा विचार करता स्कूटरसारखे वाहन म्हणजे तसे खूप नाजूकच. त्यामुळे स्कूटरच्या सुरक्षेसाठी लोखंडी गार्ड लावून घेणे महत्वाचेच.

ठळक मुद्देलोखंडी पाइपासारख्या आकाराने तयार केलेले हे मडगार्ड उपयुक्त व जड वजनही सहन करण्यासारखे आरेखित केलेले असते.दुसऱ्या वाहनाचा हलकासा धक्का लागला तरी टेल लँम्प फुटण्याची शक्यता असते, ते या गार्डमुळे काही प्रमाणात रोखले जाते.

रस्त्यावरचे खड्डे, गति अवरोधक तीव्र वळणे तसेच वाहतुकीत परस्परांच्या जवळून जाणारी वाहने या सर्वांचा विचार करता स्कूटरसारखे वाहन म्हणजे तसे खूप नाजूकच. त्यात पूर्वीसारख्या लोखंडी पत्र्याच्या सहाय्याने बॉडी तयार केलेल्या स्कूटर्सची संख्या कमी, त्यात स्कूटर्सची रचना ही ट्युब्युलर चासी पद्धतीची असल्याने एकंदर स्कूटरचा समतोल साधणे अतिशय वर्दळीच्या वा खड्डेमय रस्त्यामध्ये तसा सोपा नसतो. त्यामुळे होते काय, तोल गेला तर स्कूटरला सावरण्याचे काम करणे कठीण होऊन बसते. नुकसान व्हायचे ते काही वेळा होतेच पण ते नुकसान स्कूटरच्या बॉडीला होऊ नये, यासाठी स्कूटर्सना गार्ड लावण्याची शक्कल निघाली असावी. लोखंडी पाइपासारख्या आकाराने तयार केलेले हे मडगार्ड उपयुक्त व जड वजनही सहन करण्यासारखे आरेखित केलेले असते. तसेच मागे बसणाऱ्याला पाय ठेवून नीट बसता यावे यासाठीही स्कूटरचे गार्ड खूप महत्त्वाचे आहे. यामुळे मागे बसलेल्या व्यक्तीला स्वतःला सांभाळणे व स्वतःचा तोल राखणे तसे सोपे जाते. आजच्या काळातील नव्या काही स्कूटर्सना ते दिलेले नाही, त्याला जागाही दिलेली नाही. शोबाजीच्या जमान्यातील हा एक मोठा त्रुटीचा भाग आहे असे म्हणावे लागते.स्कूटरला तळात मागील बाजूने फुटबोर्डपर्यंत असलेले गार्ड व पुढील चाकाच्या मडगाडर्वर असलेले गार्ड ही दोन प्रामुख्याने असणारी गार्डस् आहेत. पार्किंग केलेल्या स्कूटरला पायाने स्टँडवरून खेचून ती सुरू करण्यासाठी बाजूला उभे राहावे लागण्याची जुन्या प्रकारच्या जड स्कूटर्सची परिस्थिती आज नसली तरी स्कूटर सुरू करण्याआधी स्टँडवरून उतरावावी लागते. अशावेळी तेथे खड्डा असेल किंवा उतार असेल तर स्कूटर सांभळण्यासाठीचा तोल जाण्याची शक्यता असते. स्कूटर पडली तर तिच्या बॉडीचे नुकसान होऊ नये यासाठी हा स्टँड खूप महत्त्वाची कामगिरी बजावतो. त्याचप्रमाणे स्कूटर थेट पायावर येऊ नये यासाठीही स्टँडची मदत होत असते. पंक्चर झाल्यास स्कूटर आडवी करावी लागते, व स्कूटरचे चाक काढावे लागते, परत लावावे लागते, अशावेळी स्कूटरच्या स्टँडमुळे स्कूटरच्या बॉडीला व हँडलला धक्का लागत नाही. वाहतुकीमध्ये मागून दुसऱ्या वाहनाचा हलकासा धक्का लागला तरी टेल लँम्प फुटण्याची शक्यता असते, ते या गार्डमुळे काही प्रमाणात रोखले जाते. अर्थात गार्डची रचना ही केवळ शोबाजीसाठी नसावी, त्यासाठी ते नीट आरेखित केलेले असावे. पुढील चाकाच्या मडगार्डवर असलेल्या लोखंडी गार्डमुळेही पुढील वाहनावर जाऊन आदळणल्यास तुमच्या स्कूटरच्या चाकावर असलेल्या पत्रा वा बॉडीचे नुकसान काही क्षमतेच्या धक्क्यापर्यंत तरी थोपवले जाते. महिलांना व पुरुषांना मागील आसनावर बसलेले असताना हे आधार असणारे गार्ड, तुम्हाला स्कूटर चालवताना तोल गेल्य़ास काही प्रमाणात सावरणारे गार्ड हे म्हमूनच अतिशय महत्त्वाचे अतिरिक्त साधन आहे. त्यामुळे ते खराब झाले असेल तर वेळीच बदलून घेणे किंवा नीट बसलेले नसल्याचे वाटत असेल तर ते तपासून नटी बळकट करून घेणे हे प्रत्येक स्कूटर चालकाने न विसरता करायला हवे.

टॅग्स :AutomobileवाहनAccidentअपघात