भारताने रचण्यास सुरुवात केली 'इंद्रजाल'; पाकिस्तानने मग तुर्कीचा ड्रोन पाठवूदे नाहीतर चीनचा...
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2025 16:15 IST2025-11-28T16:15:35+5:302025-11-28T16:15:45+5:30
हैदराबादस्थित इंद्रजाल ड्रोन डिफेन्स या कंपनीने देशातील पहिले 'मोबाईल एआय अँटी-ड्रोन गस्ती वाहन' - 'इंद्रजाल रेंजर' चे अनावरण केले आहे.

भारताने रचण्यास सुरुवात केली 'इंद्रजाल'; पाकिस्तानने मग तुर्कीचा ड्रोन पाठवूदे नाहीतर चीनचा...
सीमेवर आणि शहरांमध्ये वाढत्या ड्रोन हल्ल्यांच्या धोक्याला तोंड देण्यासाठी भारताने संरक्षण तंत्रज्ञानात मोठी झेप घेतली आहे. हैदराबादस्थित इंद्रजाल ड्रोन डिफेन्स या कंपनीने देशातील पहिले 'मोबाईल एआय अँटी-ड्रोन गस्ती वाहन' - 'इंद्रजाल रेंजर' चे अनावरण केले आहे. हे वाहन पारंपरिक स्थिर अँटी-ड्रोन सिस्टीमपेक्षा पूर्णपणे वेगळे असून, चालत्या वाहनातूनही शत्रूच्या ड्रोनला शोधून त्यांना निष्क्रिय करण्याची क्षमता यात आहे.
'इंद्रजाल रेंजर' हे संपूर्णपणे कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित प्रणालीवर चालते. या प्रणालीचे मुख्य ब्रेन SkyOS™ नावाच्या विशेष AI-पॉवर्ड कमांड सेंटरमध्ये आहे. हे वाहन ऑल-टेरेन 4x4 प्लॅटफॉर्मवर तयार केले आहे, ज्यामुळे ते सीमा रस्ते, कालवे, शेतीचे पट्टे किंवा दाट शहरी भाग अशा कोणत्याही जटिल भूप्रदेशात गस्त घालू शकते.
AI-चालित SkyOS™ प्रणालीमुळे ड्रोनचा शोध लागल्यापासून ते निष्क्रिय करण्यापर्यंतची संपूर्ण प्रक्रिया केवळ काही सेकंदांमध्ये पूर्ण होते.
कंपनीचे संस्थापक आणि सीईओ किरण राजू यांनी म्हटले आहे की, "तस्कर आता पायी सीमा ओलांडत नाहीत, ते मिनिटांत हवेतून प्रवेश करतात. 'इंद्रजाल रेंजर' हे याच नवीन युद्धभूमीला भारताचे उत्तर आहे."
माजी लेफ्टनंट जनरल देवेंद्र प्रताप पांडे (निवृत्त) यांनी या नवकल्पनेचे कौतुक करताना म्हटले की, "एआय-चालित गस्ती वाहने हे आपल्या देशातील तरुण, शेतकरी आणि सीमावर्ती समुदायाचे संरक्षण कवच आहेत." हे वाहन सीमा सुरक्षा दलांना (BSF) आणि पोलीस युनिट्सना शस्त्रास्त्रे, स्फोटके आणि ड्रग्जची होणारी तस्करी रोखण्यासाठी निर्णायक सिद्ध होणार आहे.