Honda ची EV सेगमेंटमध्ये एन्ट्री, या दिवशी लॉन्च होणार पहिली EV बाईक; पाहा फिचर्स...
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2025 12:42 IST2025-08-03T12:42:04+5:302025-08-03T12:42:49+5:30
Honda First Electric Bike: या बाईकचा एक टीझरही लॉन्च झाला आहे.

Honda ची EV सेगमेंटमध्ये एन्ट्री, या दिवशी लॉन्च होणार पहिली EV बाईक; पाहा फिचर्स...
Honda First Electric Bike: प्रसिद्ध टू-व्हिलर कंपनी Honda लवकरच आपली पहिली इलेक्ट्रिक बाईक लॉन्च करणार आहे. ही EV बाईक येत्या २ सप्टेंबर २०२५ रोजी जागतिक बाजारपेठेत लॉन्च केली जाईल. या नवीन बाईकचा पहिला टीझर नुकताच सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे, ज्यामुळे बाईक प्रेमींमध्ये उत्साह आणखी वाढला आहे.
टीझरमध्ये दाखवलेल्या बाईकचा लूक गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये होंडाने सादर केलेल्या EV फन कॉन्सेप्टसारखा दिसतो. या कॉन्सेप्टच्या आधारे असे म्हणता येईल की, ही इलेक्ट्रिक बाईक ५०० सीसी पेट्रोल इंजिन असलेल्या बाईकइतकीच परफॉर्मन्स देईल. होंडाच्या या नवीन इलेक्ट्रिक बाईकचे पॉवर आउटपुट सुमारे ५० बीएचपी असू शकते, जे कामगिरीच्या बाबतीत मध्यम आकाराच्या पेट्रोल इंजिन बाईकइतकेच असेल. ही बाईक विशेषतः अशा रायडर्ससाठी असेल, ज्यांना इलेक्ट्रिक सेगमेंटमध्ये वेग आणि पॉवर हवी आहे.
या नवीन होंडा इलेक्ट्रिक बाईकची रचना खूपच स्टायलिश आणि फ्युचरिस्टीक दिसते. टीझरमध्ये समोर आलेल्या झलकवरून असे दिसून येते की, ही बाईक डिझाइन आणि तंत्रज्ञानाच्या दृष्टीने खूप खास असेल. यात एक मोठा TFT डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर असेल. बाईकच्या पुढच्या बाजूला आकर्षक DRL लाईट्स आणि क्लिप-ऑन हँडलबार बसवण्यात आले आहेत.
याशिवाय, यात बार-एंड मिरर आणि स्पोर्टी रायडिंग पोझिशन आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे यात आजच्या इलेक्ट्रिक कारप्रमाणेच CCS2 चार्जिंग सिस्टम आहे. ही बाईक भारतात कधी लॉन्च होणार, याबद्दल अद्याप माहिती मिळाली नाही. ही बाईक भारतीय बाजारात येण्यास थोडा वेळ लागू शकतो.