125cc Bikes: होंडा शाईन vs बजाज पल्सर; किंमत आणि फीचर्सबाबतीत कोणती चांगली?
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2025 17:58 IST2025-10-17T17:57:21+5:302025-10-17T17:58:57+5:30
Honda Shine 125 vs Bajaj Pulsar 125: केंद्र सरकारने नुकत्याच केलेल्या जीएसटी २.० सुधारणांमुळे दुचाकी बाजारात मोठी खळबळ उडाली.

125cc Bikes: होंडा शाईन vs बजाज पल्सर; किंमत आणि फीचर्सबाबतीत कोणती चांगली?
केंद्र सरकारने नुकत्याच केलेल्या जीएसटी २.० सुधारणांमुळे दुचाकी बाजारात मोठी खळबळ उडाली आहे. ३५० सीसीपर्यंतच्या मोटारसायकलींवरील कर दर २८ टक्क्यांवरून थेट १८ टक्क्यांपर्यंत कमी करण्यात आला आहे. या मोठ्या बदलामुळे दैनंदिन प्रवासासाठी वापरल्या जाणाऱ्या कम्युटर बाईक सेगमेंटमधील लोकप्रिय मॉडेल्सच्या किमतीत लक्षणीय घट झाली आहे.
जीएसटी दर घटल्यामुळे होंडा शाइन १२५ च्या दोन्ही व्हेरिएंटच्या किमतीत ७ हजार ४४३ रुपयां ची मोठी घट झाली. स्प्लिट-सीट व्हेरिएंटमध्ये ८ हजार ११ इतकी मोठी घट झाली आहे. तर, सिंगल-सीट व्हेरिएंटची नवी किंमत ८५ हजार ६३३ रुपयांपासून सुरू होते. किंमतीतील या कपातीमुळे, दैनंदिन प्रवाशांसाठी विश्वासार्ह आणि कार्यक्षम १२५ सीसी बाईक अगदी परवडणाऱ्या दरात मिळत आहेत. दोन्ही बाईक्स आता अधिक परवडणाऱ्या किंमतीत उपलब्ध झाल्या आहेत.
होंडा शाईन vs बजाज पल्सर: फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स
फीचर्स | होंडा शाईन १२५ | बजाज पल्सर 125 |
प्रकार (Category) | कम्युटर (Commuter), आरामदायी | स्पोर्ट कम्युटर (Sport Commuter), स्टायलिश |
किंमत (GST कपातीनंतर) | ₹७८,५३९ पासून सुरू (ड्रम व्हेरिएंट) | ₹८५,६३३ पासून सुरू (सिंगल-सीट व्हेरिएंट) |
इंजिन क्षमता (Displacement) | १२३.९४ cc | १२४.४ cc |
जास्तीत जास्त पॉवर (Max Power) | १०.७४ bhp @ ७५०० rpm | ११.६४ bhp @ ८५०० rpm |
जास्तीत जास्त टॉर्क (Max Torque) | ११ Nm @ ६००० rpm | १०.८ Nm @ ६५०० rpm |
गिअरबॉक्स (Gearbox) | ५-स्पीड मॅन्युअल | ५-स्पीड मॅन्युअल |
मायलेज (Mileage - अंदाजित) | ५५ kmpl (चांगले मायलेज) | ५०-५१ kmpl (चांगले मायलेज) |
इंजिन तंत्रज्ञान | ४ स्ट्रोक, SI, BS-VI इंजिन | ४ स्ट्रोक, २-वॉल्व्ह, ट्विन स्पार्क DTS-i इंजिन |
इंधन प्रणाली | फ्यूल इंजेक्शन (FI) | फ्यूल इंजेक्शन (FI) |
कन्सोल (Instrument Console) | अॅनालॉग (Analogue) / बेसिक | सेमी-डिजिटल / डिजिटल (Digital Speedometer, Tripmeter) |
चाकांचा आकार (Wheel Size) | १८ इंच (मोठी चाके, चांगली स्थिरता) | १७ इंच (स्पोर्टी लूक) |
वजन (Kerb Weight) | ११३ Kg (हलकी, हाताळण्यास सोपी) | १४०-१४२ Kg (थोडी जड, स्पोर्टी फील) |
ग्राउंड क्लीअरन्स | १६२ mm | १६५ mm |
ब्रेकिंग सिस्टीम | CBS (Combined Braking System) | CBS (Combined Braking System) |
खास फीचर्स | ACG सायलेन्ट स्टार्ट (Silent Start with ACG), कमी देखभाल खर्च | ट्विन स्पार्क तंत्रज्ञान, पिलियन बॅकरेस्ट (काही व्हेरिएंटमध्ये), अधिक पॉवर |
होंडा शाईन १२५: कोणासाठी चांगली?
जी लोक दैनंदिन प्रवासासाठी बाईक वापरतात, ज्यांना उत्तम मायलेज, अत्यंत सुरळीत इंजिन आणि कमी देखभाल खर्च हवा आहे. होंडा शाईन १२५ ही बाईक बजाज पल्सर १२५ पेक्षा ७ हजार रुपयांनी स्वस्त आहे आणि उत्तम मायलेज देते.
बजाज पल्सर १२५: कोणासाठी चांगली?
स्पोर्टी लूक, जास्त पॉवर आणि थोडे आकर्षक फीचर्स असलेले बाईक हवी आहे, अशा तरुणांसाठी हे उत्तम पर्यात आहे. यात ट्विन स्पार्क DTS-i इंजिन टेक्नोलॉजी आहे, जे चांगली कामगिरी देते. तसेच, या बाईकचा डिजिटल मीटर शाइनपेक्षा अधिक आधुनिक आहे. ही बाईक वजनात शाईन पेक्षा जड आहे. त्यामुळे रायडरला हायवेवर चांगली स्टेबिलीटी मिळते.