शहरं
Join us  
Trending Stories
1
कोणताही मूर्ख माणूस असा उघडपणे बॅगा घेऊन पैसे वाटप करू शकतो का? राऊतांच्या दाव्यांवर शिंदे गटाचे प्रत्युत्तर
2
बेपर्वाईचे १४ बळी,७८ जखमी; घाटकोपरला पेट्रोल पंपावर होर्डिंग कोसळले, अवकाळी पावसाचा तडाखा
3
आजचे राशीभविष्य १४ मे २०२४; सूर्य वृषभेत, दलाली, व्याज, कमिशनमधून मोठ्या धनलाभाची शक्यता
4
महामुंबईला अवकाळीचा तडाखा; मुंबई, ठाणे, कल्याण, नवी मुंबई, रायगड, पालघरला पावसाने झोडपले
5
राज्यभरातील होर्डिंगचे स्ट्रक्चरल ऑडिट करा: CM एकनाथ शिंदे, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल
6
“मुझे बचाव, मैं शेड के नीचे फस गया हूँ”; होर्डिंगखाली दबलेल्या जखमीची सुटका
7
...तर पाकला हातात बांगड्या घालायला लावू! अणुशक्तीवरुन इंडिया आघाडीवर PM मोदींचा घणाघात
8
महाराष्ट्रात टक्का वाढेना; देशातील ९६ मतदारसंघात सरासरी ६६ टक्के मतदान
9
खिचडी सरकारकडून १२ लाख कोटींचा घोटाळा; अमित शाह यांचा महाआघाडीवर आरोप
10
प्रश्न: विवाह कधी करणार? राहुल गांधी म्हणाले, आता लवकरच करावा लागेल...
11
चुका नेहरूंच्या, मोदींना दोष कशासाठी? परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर, काँग्रेसकडून जनतेची दिशाभूल
12
सकाळी लोकलने, संध्याकाळी पावसाने मुंबईकरांना झोडपले; मध्य रेल्वेवर लोकल गोंधळामुळे तारांबळ
13
वादळी पावसाने मुंबईची अवस्था वाईट; हवामान खाते म्हणते, “आम्ही अलर्ट दिला होता”
14
जैन समाजाच्या समस्या सोडवण्यास नेहमीच तत्पर राहू; देवेंद्र फडणवीस, प्रमोद सावंत यांची हमी
15
“पीयूष गोयल मुंबईसह राज्याच्या विकासासाठी प्रयत्न करतील”; CM एकनाथ शिंदे यांना विश्वास
16
नरेंद्र मोदींनाही ७५ वर्षांनंतर राजकारणातून निवृत्त करणार का?: रमेश चेन्नीथला यांचा सवाल
17
...तर राष्ट्रवादी आणि शिवसेना पक्ष फुटलेच नसते, अमित शाहांचा दावा 
18
"भाजपा 400 चा आकडा पार करू शकणार नाही...", निवडणूक निकालांबाबत ममता बॅनर्जीं केली मोठी भविष्यवाणी
19
"पंतप्रधान मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी समोरची व्यक्ती त्या बरोबरीची असायला हवी"
20
Ghatkopar Hoarding Collapse Update: ८ जणांचा मृत्यू, ६६ जखमी; मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत जाहीर, मुख्यमंत्री Eknath Shinde यांची घोषणा

Hero MotoCorp च्या बाईक-स्कूटर्सवर मिळतोय शानदार डिस्काउंट! नवीन कलर ऑप्शन सुद्धा उपलब्ध

By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2023 4:49 PM

या सणासुदीच्या हंगामात कंपनी हिरो गिफ्ट 2023 अंतर्गत आपल्या ग्राहकांना स्कूटर रेंजमध्ये नवीन कलर ऑप्शन ऑफर करत आहे. 

नवी दिल्ली : देशातील सर्वात मोठी दुचाकी निर्माता कंपनी हिरो मोटोकॉर्पने (Hero MotoCorp) पल्या ग्राहकांसाठी ग्रँड इंडियन फेस्टिव्हल ऑफ ट्रस्ट (Grand Indian Festival of Trust) म्हणजेच  GIFT ची घोषणा केली आहे. या सणासुदीच्या हंगामात कंपनी हिरो गिफ्ट 2023 अंतर्गत आपल्या ग्राहकांना स्कूटर रेंजमध्ये नवीन कलर ऑप्शन ऑफर करत आहे.

दरम्यान,  Hero MotoCorp आपल्या मॉडेल रेंजवर 5,500 रुपयांपर्यंतचा कॅश बोनस आणि 3,000 रुपयांपर्यंतचा एक्सचेंज बोनस ऑफर करत आहे. याशिवाय, कंपनीने स्पेशल कलर ऑप्शनसह आपले निवडक स्कूटर आणि मोटरसायकल मॉडेल सादर केले आहेत. Hero Xoom LX व्हेरिएंट आता पर्ल व्हाइट सिल्व्हरमध्ये मिळणार आहे. तर Hero Pleasure LX व्हेरिएंटला नवीन टील ब्लू आणि मॅट ब्लॅक शेड देण्यात आले आहे. 

याचबरोबर, Hero Pleasure VX नवीन मॅट ब्लॅक आणि पर्ल सिल्व्हर व्हाइट कलर ऑप्शनमध्ये उपलब्ध असणार आहे. तसेच, Destini Prime स्कूटरला नेक्सस ब्लू, पर्ल सिल्व्हर व्हाइट आणि नोबल रेड शेड्स मिळतील. याशिवाय, Hero Destini XTEC ला नवीन पर्ल सिल्व्हर व्हाईट शेड मिळत आहे.

बाईकही केल्या अपडेटबाईकबद्दल बोलायचे झाल्यास, Hero HF Deluxe ला कॅनव्हास स्ट्राइप पेंट स्कीम मिळते, तर Super Splendor XTEC ला नवीन मॅट नेक्सस ब्लू शेड मिळते. याशिवाय, Splendor+ आणि Splendor+ XTEC ला नवीन ट्रिम देखील मिळतात. याव्यतिरिक्त  Hero Passion+ आणि Passion XTEC नवीन ब्लॅक ग्रे आणि मॅट अॅक्सिस ग्रे कलर ऑप्शनमध्ये उपलब्ध असतील.

एक रोमांचक सीरिज ऑफर करण्याचे उद्दिष्ट!सणासुदीच्या ऑफरबद्दल बोलताना हिरो मोटोकॉर्पच्या इंडियन बिझनेस युनिटचे चीफ बिझनेस ऑफिसर रंजीवजीत सिंग म्हणाले, हीरो GIFT कार्यक्रम हा ग्राहकांद्वारे आमच्यावर दाखवलेला अतूट विश्वास साजरा करण्यासाठी कृतज्ञता व्यक्त करतो. देशातील सर्वात लोकप्रिय घरगुती ब्रँड म्हणून, Hero MotoCorp आपल्या ग्राहकांसाठी सर्वोत्तम गोष्टी आणण्यात अभिमान बाळगतो. GIFT कार्यक्रमाद्वारे आम्ही आकर्षक आर्थिक योजना आणि कमी व्याजदरांसह मोटारसायकल आणि स्कूटर्सची एक रोमांचक सीरिज ऑफर करण्याचे उद्दिष्ट आहे, ज्यामुळे ग्राहकांना लोकप्रिय हीरो उत्पादने घरी आणण्यासाठी सक्षम बनवले जाईल.

टॅग्स :hero moto corporationहिरो मोटो कॉर्पbikeबाईकscooterस्कूटर, मोपेडAutomobileवाहन