नव्या Hero Electric Scooter चे फोटो लीक; ओला, बजाज चेतकला देणार टक्कर

By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2021 01:15 PM2021-08-10T13:15:35+5:302021-08-10T13:18:09+5:30

Hero MotoCorp New Electric Scooter: Hero Motocorp चे R&D सेंटर जयपूरला आहे. त्याच्या बाहेरच या स्कूटरची झलक दिसली आहे. यानुसार ही स्कूटर ड्युअल टोनमध्ये आहे.

Hero MotoCorp New Electric Scooter Launch Soon; showcased by Pawan Munjal | नव्या Hero Electric Scooter चे फोटो लीक; ओला, बजाज चेतकला देणार टक्कर

नव्या Hero Electric Scooter चे फोटो लीक; ओला, बजाज चेतकला देणार टक्कर

googlenewsNext

भारतात इलेक्ट्रीक स्कूटरचा (Electric Scooter) बाजार वेगाने वाढू लागला आहे. कोरोनाची लाट आणि त्यात पेट्रोल, डिझेलमुळे वाढलेली महागाई लोकांचा खिसा रिकामा करत आहे. अशावेळी लोकांची पाऊले आपोआपच पैसे वाचविणाऱ्या वस्तूंकडे वळत आहेत. यामुळे इलेक्ट्रीक स्कूटरला मोठी मागणी होत आहे. याचा प्रत्यय ओलामुळे आल्याने आधी टाळाटाळ करणाऱ्या दुचाकी कंपन्या आता आपली उत्पादने बाजारात आणत आहेत. (HERO upcoming electric scooter that appears to be near production-ready was teased during the company’s 10th anniversary celebration livestream. )

Video: आनंद महिंद्रांचा मोठा निर्णय! कंपनीची वर्षानुवर्षाची ओळख 'पुसणार'; लोगो बदलणार

बजाज, टीव्हीएसकडे इलेक्ट्रीक स्कूटर आहेत. परंतू त्यांचे तंत्रज्ञान अगदीच प्राथमिक टप्प्यात आहे. या स्कूटरना मोठी रेंज नाहीय आणि किमतही जास्त आहे. अशावेळी ओला आणि सिंपलच्या हाय रेंजच्या स्कूटरना मोठी मागणी होणार आहे. आता यामध्ये हिरो मोटोकॉर्पची भर पडणार आहे. देशातील सर्वात मोठी टू व्हीलर कंपनी हिरो आपली नवी Electric Scooter लवकरच लाँच करणार आहे. याच वर्ष ही स्कूटर लाँच होण्याची शक्यता असून य़ा अपकमिंग स्कूटरबरोबर हीरो मोटोकॉर्पचे अध्यक्ष पवन मुंजाल यांचा फोटो लीक झाला आहे. 

Ola Electric Scooter वर मिळेल 50,000 रुपयांपेक्षा जास्त सबसिडी; जाणून घ्या कसा होईल फायदा...

Hero Motocorp चे R&D सेंटर जयपूरला आहे. त्याच्या बाहेरच या स्कूटरची झलक दिसली आहे. यानुसार ही स्कूटर ड्युअल टोनमध्ये आहे. याशिवाय ही स्कूटर अन्य स्कूटरपेक्षा मोठी वाटत आहे. हिरो मोटोकॉर्पने नुकतीचे तैवानच्या Gogoro सोबत हातमिळवणी केली आहे. 

OMG! मारुती सुझुकी तगडी कार CNG मध्ये आणणार; Brezza चे डिटेल्स लीक

Gogoro ही कंपनी बॅटरी स्वॅपिंग तंत्रज्ञानात मास्टर आहे. यामुळे मोठ्या रेंजसाठी हिरो या पद्धतीच्या स्कूटर लाँच करेल. यामुळे बॅटरी स्टेशनवर बॅटरी बदलून मिळेल आणि ग्राहकांचा चार्जिंगचा वेळ वाचेल. या स्कूटरची टक्कर बजाज, टीव्हीएसच्या कंपन्यांबरोबरच ओला, सिंपल, एथर सारख्या नव्या कंपन्यांबरोबर होणार आहे. केंद्र आणि राज्य सरकारची सबसिडी गेमचेंजर ठरणार आहे. 

Web Title: Hero MotoCorp New Electric Scooter Launch Soon; showcased by Pawan Munjal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.