Solar Electric Car : विजेची झंझट नाही; सूर्यप्रकाशाने चार्ज होणारी पहिली इलेक्ट्रिक कार, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2022 14:06 IST2022-09-07T14:05:40+5:302022-09-07T14:06:51+5:30

Solar Electric Car : लवकरच जर्मन कंपनी सोनो मोटर्सची सूर्यप्रकाशाने चार्ज केलेली कार लोकांमध्ये येणार आहे.

first solar electric car in the world with best price features are amazing | Solar Electric Car : विजेची झंझट नाही; सूर्यप्रकाशाने चार्ज होणारी पहिली इलेक्ट्रिक कार, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स...

Solar Electric Car : विजेची झंझट नाही; सूर्यप्रकाशाने चार्ज होणारी पहिली इलेक्ट्रिक कार, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स...

नवी दिल्ली : पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतींसह वाढत्या प्रदूषणामुळे लोकांचा इलेक्ट्रिक कारकडे कल वाढत आहे, त्यामुळे कार निर्मात्यांमध्ये एकापेक्षा एक चांगला पर्याय देण्याची स्पर्धा लागली आहे. लवकरच जर्मन कंपनी सोनो मोटर्सची सूर्यप्रकाशाने चार्ज केलेली कार लोकांमध्ये येणार आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार, कंपनीला या कारसाठी 20,000 हून अधिक बुकिंग मिळाले आहेत.

सोनो सायन ही जगातील पहिली सौरउर्जेवर चार्ज केलेली इलेक्ट्रिक कार आहे, जी 2017 मध्ये मार्केटमध्ये आणली होती. आता या कारचे उत्पादन लवकरच सुरू होणार असल्याचे कंपनीचे म्हणणे आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार, 20,000 हून अधिक लोकांनी 2,000 युरो (जवळपास 1.5 लाख भारतीय रुपये) भरून आधीच ही कार बुक केली आहे. या कारची निर्माता सोनो मोटर्सने या कारची किंमत 25,126 युरो (सुमारे 20 लाख भारतीय रुपये) ठेवली आहे. परवडणाऱ्या किमतीत कार उपलब्ध करून देण्यासोबतच कंपनीला पहिल्या सोलर इलेक्ट्रिक कारचा किताबही मिळेल, असे कंपनीचे म्हणणे आहे.

सोनो मोटर्स जुलै 2023 नंतर या कारचे उत्पादन सुरू करू शकते. कंपनी या कारचे उत्पादन फिनलंडच्या वाल्मेट ऑटोमोटिव्ह प्लांटमध्ये करेल. सोनो मोटर्सचे सात वर्षांत 2.5 लाख कारचे उत्पादन करण्याचे उद्दिष्ट आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार, सोनो सायन कारमध्ये 456 सोलर सेल वापरण्यात आले आहेत, ज्यामुळे कार एका चार्जवर 112 किमी अंतर कापू शकते आणि ज्या भागात सूर्य जास्त आहे, अशा भागात या कारची रेंज दुप्पटीपेक्षा खूप दिसू शकते. याचबरोबर, सोनो सायनमध्ये कंपनीने 54kwh चा पॉवरफुल बॅटरी सेटअप दिला आहे, जो कारच्या एका चार्जवर 305 किमी अंतर कापू शकेल, तर या बॅटरीची चार्जिंग क्षमता 75kwh पर्यंत वाढवण्यात आली आहे.

Web Title: first solar electric car in the world with best price features are amazing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.