शहरं
Join us  
Trending Stories
1
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
2
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
3
आजचे राशीभविष्य ३० जुलै २०२५ : बुधवार कमाल करणार, बहुतांश राशींना...
4
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
5
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
6
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
7
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
8
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
9
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
10
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
11
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
12
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
13
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
14
अनिलकुमार पवार हे दादा भुसे यांचे नातेवाईक, शिफारशीने नियुक्ती; संजय राऊत यांचा आरोप
15
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
16
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
17
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
18
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
19
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
20
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर

महागड्या गाड्याही पडतील फिक्या! अ‍ॅडवॉन्स फिचर्ससह बाजारात येतोय महिंद्राचा पिकअप ट्रक, पाहा टीझर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2025 13:25 IST

Mahindra Vision SXT Pickup: महिंद्रा व्हिजन एसएक्सटीचा नवीन टीझर समोर आला आहे.

महिंद्रा लवकरच भारतात त्यांची नवीन पिकअप व्हिजन एसएक्सटी लॉन्च करण्याची तयारी करत आहे. नुकताच कंपनीने पिकअप व्हिजन एसएक्सटीचा टीझर रिलीज केला आहे. हा तोच पिकअप ट्रक आहे,  जो २०२३ मध्ये पहिल्यांदा स्कॉर्पिओ-एन पिकअप म्हणून जागतिक लॉन्च करण्यात आला होता. महिंद्राने आपल्या जुन्या पिकअपच्या तुलनेत नव्या पिकअपमध्ये मोठा बदल केल्याचे टीझरच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे. 

महिंद्रा व्हिजन एसएक्सटी हा स्कॉर्पिओ-एनच्या प्लॅटफॉर्मवर बनवलेला एक नवीन कॉन्सेप्ट पिकअप ट्रक आहे. तो त्याच्या बेस मॉडेलपेक्षा अधिक आधुनिक आहे. शिवाय  त्यात अनेक तांत्रिकदृष्ट्या प्रगत फीचर्स देखील समाविष्ट आहेत. महिंद्रा व्हिजन एसएक्सटी केवळ पेट्रोल किंवा डिझेल आवृत्त्यांमध्येच नाही तर ऑल-इलेक्ट्रिक व्हेरिएंटमध्ये देखील लॉन्च करण्याची योजना आखत आहे, अशी माहिती आहे.

महिंद्राने प्रसिद्ध केलेल्या टीझरमध्ये व्हिजन एसएक्सटी पिकअपचा मागील भाग दिसला, त्यात दोन बूट-माउंटेड स्पेअर व्हील्स दिसत आहेत. यासोबतच, टीझरमध्ये टू-पीस टेलगेट ओपनिंग देखील दाखवण्यात आले, जे या सेगमेंटमध्ये प्रॅक्टिकल आणि युजर फ्रेन्डली फीचर मानले जाते. यावरून असे स्पष्ट होते की, महिंद्राने व्हिजन एसएक्सटी केवळ स्टायलीश गाडी म्हणून डिझाईन केली नाही तर, वापरकर्त्यांच्या गरजा लक्षात घेऊन बनवण्यात आली आहे. 

महिंद्रा व्हिजन एसएक्सटीचे अधिकृत पदार्पण लवकरच अपेक्षित आहे.  मिळालेल्या माहितीनुसार, हा पिकअप ट्रक ऑटो एक्स्पो २०२६ मध्ये लॉन्च केले जाण्याची शक्यता आहे. महिंद्रा व्हिजन एसएक्सटी बाजारात दाखल झाल्यानंतर थेट थार, गुरखा आणि टोयोटा हिलक्ससारख्या वाहनांशी स्पर्धा करेल, असा दावा कंपनीकडून केला जात आहे.

टॅग्स :carकारMahindraमहिंद्राauto expoऑटो एक्स्पो 2023AutomobileवाहनAutomobile Industryवाहन उद्योग