देशात सुरू झालं 'या' पॉवरफुल Electric Bike चं बुकिंग; देते 140Km ची Driving Range

By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2021 10:39 AM2021-10-26T10:39:04+5:302021-10-26T10:39:26+5:30

Electric Vehicle Demand Increased : देशात Electric वाहनांची मागणी सध्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. 

Enigma starts bookings for Cafe Racer EV bike Know its features detailslaunch date diwali | देशात सुरू झालं 'या' पॉवरफुल Electric Bike चं बुकिंग; देते 140Km ची Driving Range

देशात सुरू झालं 'या' पॉवरफुल Electric Bike चं बुकिंग; देते 140Km ची Driving Range

googlenewsNext
ठळक मुद्देदेशात Electric वाहनांची मागणी सध्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. 

देशात सध्या इलेक्ट्रीक वाहनांची (Electric Vehicles) मागणी मोठ्या प्रमाणात वाढत आहे. सध्या पेट्रोल-डिझेलचे दर (Petrol Diesel Price) गगनाला भिडत असल्यामुळे लोक अन्य पर्यायांकडे वळत आहेत. याच दरम्यान इलेक्ट्रीक 'कॅफे रेसर' मोटरसायकलची प्री-बुकिंग सोमवारपासून डीलरशीप आणि कंपनीच्या वेबसाईटवरून सुरू करण्यात आली आहे. तसंच ही बाईक दिवाळीपूर्वी लाँच केली जाण्याची शक्यता आहे.

Enigma Automobiles Pvt Ltd, भारतातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या इलेक्ट्रीक टू-व्हीलर स्टार्टअपपैकी एक आहे. कंपनीनं अलीकडेच भारतात आपली पहिली इलेक्ट्रीक मोटरसायकल - 'कॅफे रेसर' लॉन्च करण्याची घोषणा केली. इलेक्ट्रीक मोटरसायकल एकूण पाच रंगांमध्ये लाँच केली जाणार आहे. ज्यात अर्ल ग्रे, मिलिट्री ग्रीन, थंडर व्हाईट, आरएमएस रेड आणि लॉग ऑरेंज यांचा समावेश आहे.

विशेष बाब म्हणजे ही बाईक पूर्णपणे भारतात डिझाईन आणि विकसित केली आहे. कंपनीनं कॅफे रेसर रेंजमध्ये 72V 50 Ah LifePo4 (लिथियम फेरो फॉस्फेट) बॅटरीचा वापर केला आहे. रिपोर्ट्सनुसार ही बाईक सिटी मोडमध्ये सिंगल चार्जमध्ये 140 किमीपर्यंतची रेंज देते.

काय आहेत फीचर्स
या इलेक्ट्रीक बाईकचा टॉप स्पीड पेट्रोलवर चालणाऱ्या गाड्यांप्रमाणेच 136 kmph इतका आहे. या कॅफे रेसर बाईकमध्ये दिलेली इलेक्ट्रीक मोटर 5.6 KW ची पॉवर जनरेट करते. याशिवाय, त्याची बॅटरी केवळ 3 तासांत 80% पर्यंत चार्ज होते. ही बॅटरी पूर्ण चार्ज होण्यासाठी सुमारे 4 तास लागतात.

कंपनी या बाईकच्या बॅटरीसाठी 5 वर्षांची व स्पोक व्हीलसाठी 3 वर्षांची वॉरंटी देत ​​आहे. कंपनीच्या भोपाळ, मंडीदीप आणि उप्पल हैदराबाद येथे Enigma बाइक्सचे उत्पादन केले जाते. या सर्व बाईक्स पॅन इंडिया स्तरावर लाँच केल्या जाणार आहेत. सध्या कंपनी देशांतर्गत लिथियम आयन बॅटरी प्रकल्पावरही काम करत आहे.

Web Title: Enigma starts bookings for Cafe Racer EV bike Know its features detailslaunch date diwali

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.