Electric Vehicle Naation 50 charging station in pune | मस्तच! केंद्र सरकारचं 'इलेक्ट्रिक व्हेइकल नेशन', पुण्यात होणार 50 चार्जिंग स्टेशन, सीएनजी पंपांचीही उभारणी  

मस्तच! केंद्र सरकारचं 'इलेक्ट्रिक व्हेइकल नेशन', पुण्यात होणार 50 चार्जिंग स्टेशन, सीएनजी पंपांचीही उभारणी  

पुणे - भारत सरकारने 2030 पर्यंत ‘इलेक्ट्रिक व्हेइकल नेशन’ घडविण्याची योजना आखली आहे. या योजनेचा भाग म्हणून पुणे महानगरपालिकेच्या 50 वाहनतळांवर इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशन उभे करण्याचे नियोजन आहे. त्यासाठी ‘एनर्जी एफिशिएन्सी सर्व्हिसेस लिमिटेड’ यांच्याबरोबर करार करण्यात येणार आहे. महापालिकेच्या अर्थसंकल्पात 50 लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. इलेक्ट्रिक व्हेइकल तंत्रज्ञान हे यापुढील कालावधीत जागतिक स्तरावर दळणवळणाच्या क्षेत्रातील आमूलाग्र बदल घडवून आणणारी बाब ठरणार आहे. या वाहनांमुळे देशांतर्गत पेट्रोलियम पदार्थांवरील अवलंबित्व कमी होईल. पर्यायाने कार्बन डाय ऑक्साइडचे उत्सर्जन कमी झाल्याने प्रदूषण कमी होण्यास मदत होणार आहे. 

पर्यावरणपूरक स्वस्त इंधन खर्च, वाहनांची देखभाल कमी होणे इत्यादी बाबत मदत होणार आहे. ही वाहने सुरक्षित, किफायतशीर, पर्यावरणपूरक आहेत.  पुण्यात दरवर्षी सरासरी अडीच ते पावणेतीन लाख नवीन वाहने रस्त्यावर येतात. त्यामध्ये सीएनजीवर चालणार्‍या वाहनांची संख्या 25 ते 26 हजार एवढी असते. कच्च्या तेलाचे उत्पादन घटत असून, पेट्रोल-डिझेलचे दर वाढत आहेत. त्यामुळे येत्या काळात सीएनजीवरील वाहनांना पसंती वाढण्याची शक्यता आहे. ही बाब लक्षात घेऊन पुणे महापालिकेच्या विविध भागांतील मिळकतींवर सीएनजी पंपांची उभारणी करण्यास प्राधान्य देण्यात येणार आहे. 

कोरोनामुळे आर्थिक अडचणींचा सामना करणाऱ्या पुणे महापालिकेचे अंदाजपत्रक गेल्या वर्षीच्या तुलनेत एक हजार कोटींनी फुगविण्यात आले असून उत्पन्नाचा सर्वाधिक भार मिळकत कर विभागावर टाकण्यात आला आहे. यावर्षी आरोग्य विषयक सुधारणांवर अधिक लक्ष केंद्रित करण्यात आले असून पीपीपी मॉडेलद्वारे रस्ते विकसीत करणे, डीपी रस्त्यांचे विकसन करण्यावर अधिक भर देण्यात येणार आहे. कोरोनामुळे उत्पन्न घटलेले असतानाही स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने यांनी सन 2021-22 चे तब्बल 8 हजार 370 कोटी रुपयांचे अंदाजपत्रक सादर केले.

FASTag बाबत "ही" गोष्ट नक्की लक्षात ठेवा; अन्यथा वापर नसतानाही कापले जातील पैसे

देशभरामध्ये फास्टॅग लागू करण्यात आला आहे. या फास्टॅगचा वापर न करणाऱ्यांकडून सरकार दुप्पट दंड वसूल करत आहे. पेटीएमपासून (Paytm) ते विविध बँकांनी फास्टॅगची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. याचदरम्यान एक गोष्ट जाणून घेणं अत्यंत गरजेचं आहे. आताच लक्ष दिले नाही तर पुढे जाऊन तुम्हाला आर्थिक नुकसान होऊ शकतं. ही महत्वाची गोष्ट म्हणजे कार बदलताना किंवा विकताना तुमच्या कारला लावलेला फास्टॅगला कसा डिअ‍ॅक्टिव्ह (Deactivate) म्हणजे निष्क्रिय करायचा या बाबत जाणून घेऊया. 

फास्टॅग घेताना त्याला आपण आपल्या वॉलेट किंवा बँक अकाउंटला लिंक करतो. ज्यामुळे टोल भरताना लागणारे पैसे आपोआप तुमच्या अकाउंटमधून कापले जातात. अशामध्ये जर तुम्ही तुमची कार विकत असाल किंवा नवीन कार विकत घेत असाल त्यावेळी जुना फास्टॅग तुम्ही डिअ‍ॅक्टीव्ह केला पाहिजे. नाही तर त्या गाडीचा वापर कुणीही केला तर त्याचे पैसे तुमच्या अकाउंटमधूनच कट होत राहतील. जर तुम्ही तुमची कार विकत असाल किंवा एक्सचेंजमध्ये देत असाल तर तुम्ही तुमच्या गाडीवरचा फास्टॅग काढून टाकणे योग्य असेल. काही कारणास्तव फास्टॅग राहिला तर त्यासाठी तुम्हाला आपल्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरवरुन फास्टॅगच्या टोल फ्री नंबर 1800-120-4210 वर कॉल करावा लागेल. ज्या माध्यमातून तुम्ही तुमचा फास्टॅग डिअ‍ॅक्टिव्ह करू शकता. 

Web Title: Electric Vehicle Naation 50 charging station in pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.