FASTag बाबत "ही" गोष्ट नक्की लक्षात ठेवा; अन्यथा वापर नसतानाही कापले जातील पैसे

By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2021 04:01 PM2021-02-20T16:01:56+5:302021-02-20T16:05:50+5:30

FASTag News : पेटीएमपासून ते विविध बँकांनी फास्टॅगची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे.

important thing about fastag how to deactivate fastag if you sold or exchange your old car | FASTag बाबत "ही" गोष्ट नक्की लक्षात ठेवा; अन्यथा वापर नसतानाही कापले जातील पैसे

FASTag बाबत "ही" गोष्ट नक्की लक्षात ठेवा; अन्यथा वापर नसतानाही कापले जातील पैसे

Next

नवी दिल्ली - नववर्षाच्या सुरुवातीलाच केंद्र सरकारने वाहनधारकांसाठी फास्टॅग (FASTag )  अनिर्वाय केला आहे. देशभरामध्ये फास्टॅग लागू करण्यात आला आहे. या फास्टॅगचा वापर न करणाऱ्यांकडून सरकार दुप्पट दंड वसूल करत आहे. पेटीएमपासून (Paytm) ते विविध बँकांनी फास्टॅगची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. याचदरम्यान एक गोष्ट जाणून घेणं अत्यंत गरजेचं आहे. आताच लक्ष दिले नाही तर पुढे जाऊन तुम्हाला आर्थिक नुकसान होऊ शकतं. ही महत्वाची गोष्ट म्हणजे कार बदलताना किंवा विकताना तुमच्या कारला लावलेला फास्टॅगला कसा डिअ‍ॅक्टिव्ह (Deactivate) म्हणजे निष्क्रिय करायचा या बाबत जाणून घेऊया. 

फास्टॅग घेताना त्याला आपण आपल्या वॉलेट किंवा बँक अकाउंटला लिंक करतो. ज्यामुळे टोल भरताना लागणारे पैसे आपोआप तुमच्या अकाउंटमधून कापले जातात. अशामध्ये जर तुम्ही तुमची कार विकत असाल किंवा नवीन कार विकत घेत असाल त्यावेळी जुना फास्टॅग तुम्ही डिअ‍ॅक्टीव्ह केला पाहिजे. नाही तर त्या गाडीचा वापर कुणीही केला तर त्याचे पैसे तुमच्या अकाउंटमधूनच कट होत राहतील. नोएडाचा रहिवासी अंकितने देखील अशीच चूक केली असून त्याला ती महागात पडली आहे. त्याने आपली कार विकली आणि कारवर लावलेला फास्टॅग काढून टाकायला तो विसरला. 

टोल दोनदा कापला तर काय? FASTag बाबत अद्याप न पडलेले प्रश्न...

अंकितने ज्याला कार विकली होती त्याचा नंबर देखील त्याच्याकडून हरवला. अंकितने विकलेल्या कारचा वापर समोरची व्यक्ती करत होती आणि पैसे अंकितच्या अकाउंटमधून कट होत होते. अंकितने जेव्हा फास्टॅग डिअ‍ॅक्टिव्ह करण्यासाठी प्रक्रिया सुरू केली तेव्हा त्याला कळलं की त्याच्याकडे फास्टॅगमध्ये नोंद केलेला सीरियल नंबर नव्हता. सीरियल नंबर असणे आवश्यक आहे. नाहीतर तुम्ही फास्टॅग डिअ‍ॅक्टिव्ह करू शकत नाही. त्यामुळे तुमच्याकडे जेवढ्या कार आहेत त्यावर लावलेला फास्टॅगचा सीरियल नंबर तुमच्याकडे नोंद करुन ठेवणे खूप गरजेचं आहे.

‘फास्टॅग’ आहे ना?, वाचा नव्या तंत्रज्ञानाची इत्थंभूत माहिती

जर तुम्ही तुमची कार विकत असाल किंवा एक्सचेंजमध्ये देत असाल तर तुम्ही तुमच्या गाडीवरचा फास्टॅग काढून टाकणे योग्य असेल. काही कारणास्तव फास्टॅग राहिला तर त्यासाठी तुम्हाला आपल्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरवरुन फास्टॅगच्या टोल फ्री नंबर 1800-120-4210 वर कॉल करावा लागेल. ज्या माध्यमातून तुम्ही तुमचा फास्टॅग डिअ‍ॅक्टिव्ह करू शकता. तुम्हाला तुमच्या मोबाइल नंबरवर लिंक येईल जिथे तुम्ही गाडीचा रजिस्ट्रेशन नंबर, फास्टॅगचा सीरियल नंबर टाकणे अनिर्वाय आहे. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तुमचा फास्टॅग डिअ‍ॅक्टिव्हेट होईल. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

काय असतो फास्टॅग?

फास्टॅग हा एक टॅग किंवा स्टिकर आहे. ते रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन (आरएफआयडी) तंत्रज्ञानावर काम करते.
टोलनाक्यावरील कॅमेरा स्टिकरवरचा बारकोड स्कॅन करतो आणि टोल आपोआप फास्टॅगच्या वॉलेटमधून कापला जातो.
वाहनधारकांना टोलनाक्यावर खोळंबावे लागत नाही. त्यामुळे वेळ आणि इंधन यांची बचत होते. प्रवासही झटपट होतो.

कुठे मिळतो फास्टॅग?

- फास्टॅग ऑनलाइन आणि ऑफलाइन खरेदी करता येऊ शकतो.
- ॲथॉराइज्ड बँकेतून अथवा ई-कॉमर्स व्यासपीठांवरूनही ऑनलाइन मिळू शकतो.
- देशातील 23 ॲथॉराइज्ड बँका, भूपृष्ठ वाहतूक विभागाचे हजारो विक्री केंद्रे येथेही फास्टॅग तुम्हाला उपलब्ध होऊ शकतो. 

फास्टॅगची किंमत 

- नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (एनपीसीआय) यांनी फास्टॅगची किंमत 100रुपये एवढी निश्चित केली आहे. याशिवाय 200रुपये अनामत रक्कम भरावी लागते.
- अनेक बँका आपल्याकडे ग्राहक आकर्षित व्हावे यासाठी किरकोळ किमतीचे फास्टॅगही देऊ करतात.

 

Web Title: important thing about fastag how to deactivate fastag if you sold or exchange your old car

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.