शहरं
Join us  
Trending Stories
1
उमेदवारी अर्ज मागे घेऊन काँग्रेस उमेदवार भाजपत; तिसऱ्या जागी विजय निश्चित
2
एआयद्वारे फेक व्हिडीओ; अघटित घडविण्याचा डाव; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विराेधकांवर हल्लाबाेल
3
सेक्स स्कँडल : प्रज्वलची पक्षातून हकालपट्टी; माजी पंतप्रधान देवेगौडांचे कुटुंब आरोपांनी घेरले
4
भाजप व रा. स्व. संघाची संविधान बदलण्याची योजना : राहुल गांधी
5
तीन विधानसभा निवडणुकीत मतांची टक्केवारी घसरली, तरीही राज ठाकरे महायुतीला का हवे आहेत?
6
पारा वाढता वाढे, देशभरात उकाडा; वाढत्या तापमानाने नागरिक हैराण, राज्यातही उष्णता वाढणार
7
राहुल शेवाळे यांच्या स्थावर मालमत्तेत सात कोटींची वाढ; २०१९'ला स्थावर मालमत्ता नसल्याचे नमूद होते
8
अरविंद सावंत यांच्याकडे एकच कार; संपत्ती पाच वर्षांत दुप्पट
9
अनिल देसाई यांच्या मालमत्तेत पावणेतीन कोटींची वाढ; स्थावर मालमत्तेत वाढ नाही
10
कांद्याची फसवी फाेडणी; सरकारचे शेतमाल निर्यातीचे धाेरण नेहमीच ग्राहकहिताचे
11
मुख्यमंत्री खूप दिवस गैरहजर राहू शकत नाहीत; विद्यार्थ्यांचे हक्क पायदळी तुडवता येणार नाहीत; दिल्ली हायकोर्ट
12
राजन विचारे यांच्या मालमत्तेत ११ कोटींची वाढ; रत्नागिरी जिल्ह्यात शेतजमीन
13
नागपूर विमानतळ उडविण्याची धमकी; ई-मेलनंतर प्रशासन अलर्ट मोडवर; सुरक्षा व्यवस्थेत वाढ
14
‘ठाण्या’चे नाक दाबून तीन मतदारसंघ भाजपने घेतले सोडवून
15
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
16
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
17
भाजप नेते दुष्यंत गौतम यांच्या कारला अपघात, मणक्याला दुखापत
18
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
19
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
20
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे

भारतातील कारच्या रचना, सुविधा, सौंदर्य यासाठी हवा भारतीय वातावरणाला साजेसा दृष्टिकोन

By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2017 12:00 PM

गेल्या काही वर्षांमध्ये कारच्या सौंदर्याबाबत, अंतर्गत सुविधा व आरेखन याबाबत विशेष दक्षता घेतली जात आहे. वास्तविक कारमधील कारचे मूळ गुण मात्र कमी करण्याचा प्रयत्न करताना, कारच्या ताकदीमध्ये, सुरक्षिततेबाबत काहीशी नव्हे तर चांगलीच तडजोड होऊ लागली आहे.

ठळक मुद्दे ग्राहकांच्या मतांची पाहाणी, तपासणी केली जाऊन कारच्या रचनेत, सुविधांमध्ये बदल होऊ लागले. आपल्या देशात नेमकी कोणती सुविधा व अंतर्गत रचना, सौंदर्य हे योग्य आहे, याचा अंदाज ग्राहकाला येत नाही

गेल्या काही वर्षांमध्ये कारच्या सौंदर्याबाबत, अंतर्गत सुविधा व आरेखन याबाबत विशेष दक्षता घेतली जात आहे. वास्तविक कारमधील कारचे मूळ गुण मात्र कमी करण्याचा प्रयत्न करताना, कारच्या ताकदीमध्ये, सुरक्षिततेबाबत काहीशी नव्हे तर चांगलीच तडजोड होऊ लागली आहे. याला कारण उत्पादक कंपनीचे कॉस्ट कटिंग जसे कारणीभूत आहे तसेच कारच्या ग्राहकांची मागणीही तितकीच कारणीभूत आहे. साधारणपणे भारतातील मोटारींमध्ये २००० सालापासून विविध बदलांना, स्पर्धेला सुरुवात झाली. ग्राहकांची संख्याही वाढू लागली व त्यामुळे ग्राहकांच्या मतांची पाहाणी, तपासणी केली जाऊन कारच्या रचनेत, सुविधांमध्ये बदल होऊ लागले. परदेशातील कार्स, त्यांचा वेग, त्यामधील सुविधा याबाबत लोकांना वाढत्या इंटरनेट सुविधांमधून माहितीही मिळत गेली. साहजिकच कारमध्ये काय काय सुविधा असतात, ते समजत गेले व ग्राहक विशेष करून नव्या पिढीतील तरुण मोटारींबाबत विशेष चोखंदळपणे पाहू लागले. परदेशी कार, त्यांच्यामधील सुविधा, त्या कंपन्या यासाठी भर देणारा नव्या पिढीतील भारतीय ग्राहक आकर्षित झाला. आयटी कंपन्यांच्या चलतीमुळे खिशात चांगले पैसेही खुळखुळत होते. यामुळे कारमध्ये नवनव्या परदेशी सुविधांचा समावेश केला गेला. पुढे पुढे त्या सुविधा कारच्या श्रेणीनिहाय दिल्या जाऊन त्यातून चांगलेच अतिरिक्त उत्पन्न कार उत्पादक कंपन्यांनी कमावले.परदेशातील कारप्रमाणेच आपल्यालाही तशीच सुविधा मिळावी, त्याप्रमाणेच सोयी कारमध्ये असाव्यात असा सर्वसाधारण ग्राहकांचा ओढा असतो. कार उत्पादक कंपन्यांनाही तसे पाहिजे असते, त्याद्वारे त्यांना अतिरिक्त सुविधा देत ग्राहकांची संख्या वाढवता येते व तशी किंमतही. परंतु भारतीय परिस्थितीचा, येथील ग्राहकाच्या असलेल्या वापर पद्धतीचा विचार झाला नाही. ग्राहकांना दिल्या गेलेल्या अनेक सुविधांचा वापर करायला आवडतो पण त्या सुविधांचा दर्जा, त्यांचा टिकावूपणा, त्या सुविधांना आवश्यक असलेल्या भारतीय रस्ते, वाहतूक यातील पायाभूत रचना, सुविधा यांचा अभाव असल्याने अशा प्रकारच्या कारमध्ये दिलेल्या उच्च सुविधा काही काळातच खऱाब होऊ लागतात. त्या जपण्यासाठी मात्र अधिक पैसे खर्च करावे लागतात. कसे आहे की परदेशात असलेल्या खाद्यपदार्थांची निर्मिती ही तेथील वातावरणाला अनुसरून असते. परंतु, ते खाद्य भारतातील वातावरणाला अनुकूल असेलच असे नाही. तसेच कारच्या बाबतीतही म्हणता येते. कारसाठी ग्राहकांची मागणी आहे असे दिसल्यानंतर ग्राहकांसाठी परदेशातील कारप्रमाणे विविध सुविधा दिल्या जातात. पण त्या सुविधा येथील खराब रस्ते, ग्राहकांच्या वापरण्याच्या पद्धती, येथील हवामान, येथील वाहतूक रचना यामुळे फार काळ नीटपणे टिकत नाही, काहीवेळा त्यांचा वापर कुचकामी असल्याचेही ग्राहकाला वाटू लागते. खरे म्हणजे कंपन्यांच्या कडून काहीही सादर केले गेले तरी ग्राहकांनीच सजगपणे व डोळसपणे आपल्या कारसाठी नेमके काय हवे आहे, ते लक्षात घेतले पाहिजे. कार हे अद्यापही प्रेस्टिजचे वा अन्य काही उद्दिष्टाचे साधन समजले जात आहे. हे जोपर्यंत चालू राहील, तोपर्यंत आपल्या देशात नेमकी कोणती सुविधा व अंतर्गत रचना, सौंदर्य हे योग्य आहे, याचा अंदाज ग्राहकाला येत नाही, तोपर्यंत कारच्या बाबत असणारे सौंदर्य, सुविधांचे निकष हे कार उत्पादकालाही ठरवता येणार नाहीत. मात्र ग्राहकांच्या या मानसिकतेचा फायदा मात्र कार उत्पादक, अॅक्सेसरीज उत्पादक घेत राहातील. त्यासाठीच कार ही एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्याचे साधन आहे, हे मूलभूत तत्त्व ग्राहकाला समजेल, तेव्हा भारतीय ग्राहकाच्या कल्पनाही पार बदललेल्या असतील, कदाचित भारतीय वातावरणाप्रमाणे सुविधा व सौंदर्य याबद्दलचा, दर्जा, सुरक्षितता, रस्ते, विविध भागांमध्ये असणारे हवामान यानुसार अवलंबून असलेले आवश्यकतेनुसार कार उत्पादकांनाही आपला दृष्टिकोन बदलावा लागेल. नजीकच्या भिवष्यात विद्युत ऊर्जेवर चालणारी वाहने भारतात कशी असावीत, याचाही दृष्टीकोन परदेशातील त्या प्रकारच्या वाहनांच्या तुलनेत बदललेला असेल.

टॅग्स :carकारAutomobileवाहन