भारतातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार; 250 KM रेंज, किंमत फक्त 3.25 लाख...
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2025 16:11 IST2025-11-26T16:10:16+5:302025-11-26T16:11:15+5:30
Cheapest Electric Car In India: भारतात इलेक्ट्रिक वाहनांची मागणी झपाट्याने वाढत आहे.

भारतातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार; 250 KM रेंज, किंमत फक्त 3.25 लाख...
India Cheapest Electric Car Price: भारतीय बाजारपेठेत इलेक्ट्रिक वाहनांची मागणी झपाट्याने वाढत आहे. टू-व्हिलर, थ्री-व्हिलर आणि फोअर व्हिलर अशा सर्व सेगमेंटमध्ये ई-व्हेइकल्सची लोकप्रियता वाढत आहे. यामुळेच ऑटोमेकर नवनवीन ई-कार्स लॉन्च करत आहेत. वाढत्या मागणीसोबत ईव्ही चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चरच्या उभारणीवरही सरकारकडून भर दिला जात आहे. अशात भारतातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कारबद्दल जाणून घ्या...
भारताची सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार Eva आहे. Eva ही सध्या देशात उपलब्ध असलेली सर्वात परवडणारी इलेक्ट्रिक कार आहे. या कॉम्पॅक्ट ईव्हीमध्ये दोन प्रौढ आणि एक मूल आरामात प्रवास करू शकतात.
Eva भारतीय बाजारात तीन व्हेरिएंटमध्ये उपलब्ध आहे :
Nova (नोव्हा)
Stella (स्टेला)
Vega (वेगा)
या कारचे सर्वात मोठे आकर्षण म्हणजे, फक्त 2 रुपये प्रति किलोमीटरचा रनिंग कॉस्ट. कारची किंमत फक्त 3.25 लाखांपासून सुरू होते.
Nova व्हेरिएंट : ₹3.25 लाख (एक्स-शोरूम)
Stella व्हेरिएंट : ₹3.99 लाख (एक्स-शोरूम)
Vega व्हेरिएंट : ₹4.49 लाख (एक्स-शोरूम)
भारतामध्ये यापेक्षा स्वस्त इलेक्ट्रिक कार सध्या बाजारात उपलब्ध नाही.
रेंज आणि बॅटरी पर्याय
Eva विविध बॅटरी क्षमतेसह चांगली रेंज ऑफर करते.
1. Nova - 9 kWh बॅटरी
रेंज : 125 किमी (सिंगल चार्ज)
2. Stella - 12.6 kWh बॅटरी
रेंज : 175 किमी (सिंगल चार्ज)
3. Vega - 18 kWh बॅटरी
रेंज : 250 किमी (सिंगल चार्ज) हा टॉप व्हेरिएंट सर्वाधिक रेंज देतो.
फीचर्स
ड्रायव्हर एअरबॅग
CCS2 फास्ट चार्जिंग सपोर्ट
कारमध्ये लॅपटॉप चार्ज करण्याची सुविधा