स्वस्त BMW बाईक हवीये? फक्त इतक्या रुपयांत घरी घेऊन या; जाणून घ्या फीचर्स...

By ऑनलाइन लोकमत | Published: February 7, 2024 05:28 PM2024-02-07T17:28:44+5:302024-02-07T17:29:48+5:30

Cheapest BMW Bike: तुम्ही बाईक लव्हर असाल, तर कधी ना कधी तुमच्याही मनात BMW बाईक घेण्याचा विचार आला असेल.

Cheapest BMW Bike: Want a cheap BMW bike? Take it home for just Rs. Know Features... | स्वस्त BMW बाईक हवीये? फक्त इतक्या रुपयांत घरी घेऊन या; जाणून घ्या फीचर्स...

स्वस्त BMW बाईक हवीये? फक्त इतक्या रुपयांत घरी घेऊन या; जाणून घ्या फीचर्स...

Cheapest BMW Bike- BMW G 310 R: तुम्ही बाईक लव्हर असाल, तर कधी ना कधी BMW बाईक घेण्याचा विचार तुमच्या मनात नक्कीच आला असेल. परंतु, BMW बाईक्सची किंमत खुप जास्त असल्यामुळे अनेकांना त्या परवडत नाहीत. मात्र, सर्वच BMW बाईक महाग नाहीत. तुमच्याकडे जवळपास 3 लाख रुपयांचे बजेट असेल, तर तुम्ही एक चांगली BMW बाईक घेऊ शकता. भारतातील BMW ची सर्वात स्वस्त बाईक G 310 R आहे. BMW G 310 R ची किंमत 2.90 लाख रुपये (एक्स-शोरूम, दिल्ली) आहे.

बाजारात या बाईकची KTM 390 Duke, Royal Enfield Interceptor 650 आणि Honda CB300R सारख्या बाइक्सशी स्पर्धा आहे. BMW ची ही बाईक फक्त एकच व्हेरिएंटमध्ये मिळते, ज्यात 313cc, लिक्विड कूल्ड, सिंगल सिलेंडर इंजिन आहे. हे इंजिन 6-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्ससह 34PS आणि 28NM जनरेट करते. ही फक्त 8.01 सेकंदात 0 ते 100 किलोमीटर प्रति तास वेग गाठू शकते. यात पुढील बाजूस 41mm अपसाइड डाउन (USD) टेलिस्कोपिक फोर्क्स आहेत तर मागील बाजूस प्रीलोड ॲडजस्टेबल मोनोशॉक आहे. 

बाइकमध्ये ड्युअल चॅनल एबीएस आहे. तसेच, बाईकच्या पेट्रोल टँकमध्ये 11 लिटर पेट्रोल बसू शकते. या बाईकचे वजन 158.5Kg आहे. याच्या पुढील आणि मागील बाजूस 300mm आणि 240mm सिंगल डिस्क ब्रेक मिळतात. या बाईकमध्ये एलईडी डीआरएल आणि टर्न इंडिकेटरसह सर्व-एलईडी लाइटिंग मिळते. याशिवाय बाइकमध्ये राइड-बाय वायर थ्रॉटल, स्लिपर क्लच, ॲडजस्टेबल ब्रेक्स, डिजिटल इन्स्ट्रुमेंट कन्सोल, डिजिटल स्पीडोमीटर, डिजिटल ट्रिपमीटर, पास स्विच आणि इंजिन किल स्विच यांसारखे फीचर्स मिळतात. 

Web Title: Cheapest BMW Bike: Want a cheap BMW bike? Take it home for just Rs. Know Features...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.