Car Modification: मारुती Baleno ला दिला BMW चा लूक; या सूपर मॉडिफिकेशनचा व्हिडिओ एकदा पाहाच...

By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2023 04:50 PM2023-04-19T16:50:47+5:302023-04-19T16:51:27+5:30

Car Modification: कार मॉडिफिकेशन केल्यावरही पोलिस दंड लावणार नाहीत. यासाठी तुम्हाला एक छोटे काम करावे लागेल.

Car Modification: Maruti Suzuki Baleno lokk like BMW ; Just watch the video of this super modification Maruti baleno Green color: काहीजण कार फक्त आपला प्रवास सुखकर करण्यासाठी वापरतात, तर काहीजणांसाठी कार वापरणे स्टाईल स्टेटमेंट आहे. त्यामुळे अनेकजण आपली क | Car Modification: मारुती Baleno ला दिला BMW चा लूक; या सूपर मॉडिफिकेशनचा व्हिडिओ एकदा पाहाच...

Car Modification: मारुती Baleno ला दिला BMW चा लूक; या सूपर मॉडिफिकेशनचा व्हिडिओ एकदा पाहाच...

googlenewsNext

Maruti baleno Green color: काहीजण कार फक्त आपला प्रवास सुखकर करण्यासाठी वापरतात, तर काहीजणांसाठी कार वापरणे स्टाईल स्टेटमेंट आहे. त्यामुळे अनेकजण आपली कार इतरांपेक्षा वेगळी दाखवण्यासाठी त्यावर विविध मॉडिफिकेशन करत असतात. कार मॉडिफिकेशन फक्त टायर्स किंवा इंटिरियर्सपुरते मर्यादित नाही, तर बरेच लोक कारचा रंग आणि लूकदेखील बदलतात. एका व्यक्तीने आपल्या बलेनो कारला बीएमडब्लू कारप्रमाणे मॉडिफाय केले आहे.

अनेकदा कारमध्ये नियमापेक्षा जास्त मॉडिफिकेशन केल्यामुळे दंड भरावा लागू शकतो. पण, एका मर्यादेत मॉडिफिकेशन केल्यावर कुठलाही दंड लागत नाही. अलीकडेच एका व्यक्तीने त्याच्या मारुती बलेनोचा रंग पूर्णपणे बदलला आहे. त्याने एक अशी गोष्ट केली, ज्यामुळे त्याला कुठला दंडही भरावा लागणार नाही. ब्रोमोटिव्ह नावाची पुण्यातील कंपनी अशा प्रकारचे मॉडिफिकेशन करुन देते. कंपनीने आपल्या यूट्यूब चॅनलवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. लाल रंगाच्या बलेनोचा लूक पूर्णपणे बदलण्यात आला आहे. विशेष बाब म्हणजे ग्राहकाने मागणी केलेला स्पेशल हिरवा रंग बीएमडब्ल्यू कारमध्ये वापरला जातो.

पाहा Video- 

व्हिडिओमध्ये दिसत आहे की, कारागीर आधी कारचे सर्व भाग काढतात. यामध्ये मिरर, दरवाजे, पुढचे-मागचे बंपर, हेड लाइट आणि टेल लाइट्सही काढल्याचे यात दिसत आहे. यानंतर ने गाडीची डागडुजी करतात आणि रंग द्यायला सुरुवात करात. सुरुवातीला ते कारवर ब्लॅक प्रायमर पेंट करतात आणि पेंटिंगची प्रक्रिया सुरू होते. पुन्हा सँडिंग करतात आणि त्यावर मेन रंग दिला जातो. गाडीचे छत काळ्या रंगात रंगवले गेले आहे. पेंटिंग प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर कार असेंबल केली जाते. 

चलन कापले जाणार नाही
तुम्हाला हवे असल्यास तुम्हीदेखील तुमच्या कारचा रंगही बदलू शकता. मात्र यासाठी तुम्हाला आरटीओमध्ये अर्ज करावा लागतो, अन्यथा चलन कापले जाऊ शकते. यासाठी तुम्ही स्थानिक आरटीओ कार्यालयात जाऊन तुमच्या वाहनाचा रंग बदलण्यासाठी एक फॉर्म भरू शकता. आरटीओ कागदपत्रांना मान्यता देईल आणि तुमच्या पत्त्यावर नवीन नोंदणी प्रमाणपत्र पाठवेल.
 

Web Title: Car Modification: Maruti Suzuki Baleno lokk like BMW ; Just watch the video of this super modification Maruti baleno Green color: काहीजण कार फक्त आपला प्रवास सुखकर करण्यासाठी वापरतात, तर काहीजणांसाठी कार वापरणे स्टाईल स्टेटमेंट आहे. त्यामुळे अनेकजण आपली क

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.