शहरं
Join us  
Trending Stories
1
Controversial Decision? आयुष बदोनीची विकेट वादात अडकली, KL Rahul संतापला, MI च्या बाजूने झुकवलेला सामना, Video 
2
लखनौ सुपर जायंट्सचा विजय! Mumbai Indians प्ले ऑफसाठी आता दुसऱ्यांवर अवलंबून  
3
आघाडीच्या फलंदाजांनी शस्त्र टाकल्यानंतर...! हार्दिक पांड्याचा रोख रोहित शर्माकडे? म्हणाला... 
4
भाजपच्या पीयूष गोयल यांच्याविरोधात भूषण पाटील; काँग्रेसकडून राज बब्बर यांनाही उमेदवारी...
5
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : आरोपी समीर कुलकर्णी यांना सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा, खटल्याला स्थगिती
6
राशिद खानच्या नेतृत्वाखाली अफगाणिस्तान ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळणार, युवा खेळाडूंना संधी 
7
गडचिरोली सीमेवर चकमक; १० नक्षलवाद्यांचा खात्मा 
8
Video: पाळीव कुत्र्याचा सहा वर्षीय चिमुकलीवर हल्ला; धक्कादायक व्हिडिओ व्हायरल...
9
आनंदाची बातमी...! ₹75000 पार जाणाऱ्या Gold Price मध्ये पुन्हा मोठी घसरण, पटा-पट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट 
10
देशात फक्त मोदी पॅटर्न चालतो, बाकी सगळे भंगारात; एकनाथ शिंदेंचा विरोधकांवर प्रहार
11
BANW vs INDW: भारताचा झंझावात कायम; पावसाची 'बॅटिंग' अन् बांगलादेशचा सलग दुसरा पराभव
12
दुर्दैवी! प्रसूती दरम्यान 'बत्ती गूल'; टॉर्चच्या प्रकाशात सिझर, पण बाळासह आईचा मृत्यू
13
भारतीय संघ दोन तुकड्यांमध्ये अमेरिकेला रवाना होणार, पहिली बॅच २१ मे रोजी तर... 
14
अरविंद केजरीवालांना ठीक निवडणुकीपूर्वी का अटक केले? सुप्रीम कोर्टाचा ED ला थेट सवाल...
15
अरविंद सावंतांविरोधात तिकीट मिळालेल्या यामिनी जाधव यांची अशी आहे राजकीय कारकीर्द
16
कल्याणमध्ये तिरंगी लढत होणार; लोकसभेसाठी वंचितकडून आणखी ३ उमेदवारांची घोषणा
17
Team India for T20WC 2024 : वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारताचा संघ जाहीर, हार्दिक पांड्या उप कर्णधार, KL Rahul चा पत्ता कट
18
मोठी अपडेट्स : Rinku Singh ची होणार १५ मध्ये एन्ट्री? भारतीय संघात केला जाऊ शकतो बदल
19
सोढी बेपत्ता, अय्यर टेन्शनमध्ये; 'तारक मेहता...' अभिनेते तनुज महाशब्देंनी दिली प्रतिक्रिया
20
Rajnath Singh : "डायनासोरप्रमाणे काँग्रेस पृथ्वीवरुन नाहीशी होईल, हे बुडणारं जहाज"; राजनाथ सिंह यांचं टीकास्त्र

पेट्रोल परवडेना! CNG किट लावायचेय? या गोष्टींवर जरूर विचार करा...

By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2021 4:50 PM

CNG kit installation in your car: तुमची कार कंपनी फिटेड सीएनजी कार नसणार आहे. यामुळे बाहेरून तुम्हाला सीएनजी किट लावावे लागणार आहे. पहिली बाब म्हणजे तुमची कार सीएनजी किटला सपोर्ट करते का नाही हे पाहणे गरजेचे आहे.

पेट्रोलच्या दरांनी (Petrol Rate hike) आकाश गाठले आहे. पुढेही वाढत राहण्याची शक्यता आहे. ज्यांनी डिझेल वाहने घेतलीत त्यांना काही पर्याय नाहीय. परंतू पेट्रोलकार घेतलेल्यांना त्यांची कार सीएनजी (CNG) लावून परवडणारा प्रवास करता येणार आहे. हा एक पेट्रोल कारचा फाय़दा आहे. अनेकजण आता तो विचार करत असून त्यासाठी पैशांची जुळवाजुळव करत आहेत. अनेकजण कारमध्ये सीएनजी किट (CNG Kit) लावून घेत आहेत.  जर तुम्हीही विचारात असाल तर सीएनजी किट लावण्याबाबत काही गोष्टी नक्की ध्यानात घेणे गरजेचे आहे. नाहीतर पुढे अडचणीत येण्याची शक्यता आहे. (things to know before installing CNG kit in old car.)

महत्वाचे म्हणजे तुमची कार कंपनी फिटेड सीएनजी कार नसणार आहे. यामुळे बाहेरून तुम्हाला सीएनजी किट लावावे लागणार आहे. पहिली बाब म्हणजे तुमची कार सीएनजी किटला सपोर्ट करते का नाही हे पाहणे गरजेचे आहे. अनेकदा जुन्या कारमध्ये सीएनजी किट लावले की ती कार नंतर समस्या यायला, त्रास द्यायला सुरवात करते. यामुळे आधी तुम्ही सीएनजी कारला योग्य आहे की नाही ते पहावे लागणार आहे. 

देशात मारुतीशिवाय अन्य कोणत्याही कारला चांगल्या सीएनजी कार देणे जमलेले नाही. ह्युंदाईच्या काही कारना सीएनजी आहे. सीएनजी हे एक इंधन आहे. यामुळे याचा थेट संबंध इंजिनाशी येतो. सीएनजीमुळे इंजिनाचा परफॉर्मन्स खालावतो. यामुळे अनेक कंपन्यांची इंजिने सीएनजीसाठी योग्य नसतात. सीएनजीचा खर्च कमी होतो, मात्र, त्यामुळे इंजिनावर पडणारे प्रेशर जे असते ते खूप खर्च करायला भाग पाडू शकते. इंजिनाची ताकदही कमी होते. ही बाब तुमच्या कार चालविताना लक्षात येईल. ज्यांना कारचा परफॉर्मन्स आवडतो त्यांनी सीएनजी किट लावू नये. 

इन्शुरन्स क्लेम रद्द होऊ शकतो....अनेकदा लोक त्यांच्या कारना सीएनजी किट लावून घेतात. मात्र, जेव्हा एखादा अपघात होतो तेव्हा त्यांचा इन्शुरन्स क्लेम नाकारला जातो. कारण तुमच्या कारचे मॉडेलमध्ये सीएनजी नसतो. कंपन्या तुमच्या कारचे मॉडेल पाहून इन्शुरन्स देतात. अशावेळी कंपन्यांची परवानगी घेऊन सीएनजी किट बसवावे. 

RTOआणखी एक महत्वाची बाब म्हणजे आरटीओ. जर तुम्ही तुमच्या कारला सीएनजी किट लावत असाल तर त्याची माहिती तुमच्या आरटीओला द्यावी लागते. सीएनजीचे लायसन द्यावे लागते. तेव्हा जाऊन तुम्ही सीएनजी किट बसवू शकता. यासाठी सीएनजी किटचा अधिकृत डीलर लागतो. ते देखील पहावे लागते. 

टॅग्स :Petrolपेट्रोलFuel Hikeइंधन दरवाढcarकार