शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
2
"हिंदू वेळीच एकवटला नाही तर भारतात गल्लोगल्ली बांगलादेशसारखा..."; धीरेंद्र शास्त्रींचा इशारा
3
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
4
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
5
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! नवीन वर्षात शेअर बाजाराला १५ दिवस सुट्टी; एनएसईकडून कॅलेंडर प्रसिद्ध
6
नाताळाला गालबोट; महाराष्ट्र, केरळसह काही राज्यांत तोडफोड अन् झटापटीच्या घटना...
7
“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर
8
टीव्ही अभिनेत्याला झालेली खुलेआम मारहाण; म्हणाला, "तो अजूनही मोकाट...", मुंबई आता असुरक्षित?
9
कर्क राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? स्वप्नपूर्ती आणि मानसन्मानाचे वर्ष; पण आरोग्याबाबत राहा सतर्क!
10
शेख हसीना यांना परत बांग्लादेशात न पाठवून भारताने..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य
11
गृहकर्ज घेण्याचा विचार करताय? कोणती बँक देतेय सर्वात स्वस्त होम लोन? पाहा संपूर्ण यादी
12
वैभव सूर्यवंशी पहिल्या सामन्यात बनला 'नंबर १'; रोहित शर्मा, विराट कोहलीला टाकलं मागे
13
एसबीआयमध्ये मॅनेजर असल्याचं सांगून तरुणीला जाळ्यात ओढलं; भेटायला बोलावलं अन् लुटून झाला पसार!
14
Pune Crime: शेजारी राहणाऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध, तिच्यासह नांदेडमधून पळाला; पण पुण्यात झाली हत्या
15
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
16
मिथुन राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? आधी संघर्ष, नंतर मोठे यश; 'जबाबदारी' ठरेल प्रगतीचा मूलमंत्र!
17
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
18
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
19
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
Daily Top 2Weekly Top 5

इलेक्ट्रिक कार विक्रीमध्ये Tesla नव्हे तर BYD चा आहे दबदबा! 2023 मध्ये सर्वात जास्त गाड्या विकल्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2024 13:52 IST

BYD Sales In 2023 : BYD ने 2023 मध्ये आपल्या वाहनांची विक्रमी विक्री केली आहे.

BYD Sales In 2023: (Marathi News) नवी दिल्ली : जगात सर्वाधिक इलेक्ट्रिक कार कोणती कंपनी विकते? हा प्रश्न ऐकल्यावर काही लोकांच्या मनात टेस्ला कंपनीचे नाव येऊ शकते. टेस्ला ही एक अमेरिकन कंपनी आहे, जी इलेक्ट्रिक कार बनवते आणि जगभरात लोकप्रिय आहे. मात्र, जगात सर्वाधिक इलेक्ट्रिक कार विकणारी कंपनी टेस्ला नसून बीवायडी (BYD) आहे, जी भारतात आधीच आपल्या वाहनांची विक्री करत आहे. 

टेस्लाचा अनेक दिवसांपासून भारतात आपल्या प्लॅन्ट उभारण्याचा प्रयत्न आहे. त्यामुळे लवकरच टेस्ला भारतात आपली इलेक्ट्रिक कार लाँच करू शकते. दरम्यान, BYD ने 2023 मध्ये आपल्या वाहनांची विक्रमी विक्री केली आहे. BYD च्या मते, गेल्या वर्षी कंपनीने 30 लाख वाहनांच्या विक्रीचे लक्ष्य फक्त पार केले नाही तर सलग दुसऱ्या वर्षी न्यू एनर्जी व्हेईकल (NEV) ची जगातील सर्वात मोठी विक्री करणारी कंपनी ठरली आहे.

BYD ची भारतात काय आहे परिस्थिती?एकीकडे, टेस्ला अजूनही भारतात प्रवेश करण्याचा प्रयत्न करत आहे. तर दुसरीकडे, BYD आधीच भारतीय बाजारपेठेत व्यवसाय करत आहे. पण, भारतात BYD च्या वाहनांची विक्री नगण्य आहे, ही वेगळी बाब आहे. कारण, या कंपनीच्या गाड्या रस्त्यावर क्वचितच दिसतात. BYD च्या सध्याच्या भारतीय पोर्टफोलिओमध्ये e6 एमपीव्ही आणि Atto-3 इलेक्ट्रिक एसयूव्हीचा समावेश आहे. आता कंपनी आपला पोर्टफोलिओ वाढवत आहे. BYD येत्या 5 मार्चला नवीन इलेक्ट्रिक सेडान लाँच करणार आहे. या कारचे नाव सील (Seal)आहे.

टॅग्स :AutomobileवाहनElectric Carइलेक्ट्रिक कारelectric vehicleइलेक्ट्रिक कार / स्कूटरAutomobile Industryवाहन उद्योग