Best Mileage Bike : 'या' 4 बाईक्स शानदार मायलेज देतात, डोळे मिटून खरेदी करू शकता, किंमतही जास्त नाही
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2023 13:46 IST2023-04-28T13:45:36+5:302023-04-28T13:46:20+5:30
Best Mileage Bike : आज आम्ही तुम्हाला अशा 4 बाईक्सची माहिती देणार आहोत, ज्या उत्तम मायलेज देतात आणि त्यांची किंमतही जास्त नाही.

Best Mileage Bike : 'या' 4 बाईक्स शानदार मायलेज देतात, डोळे मिटून खरेदी करू शकता, किंमतही जास्त नाही
नवी दिल्ली : भारतीय बाजारपेठेतील तरुण ग्राहकांना कार आणि बाईक्सचे वेड आहे. देशातील बहुतेक लोक लहान प्रवासासाठी आणि डे-टु-डे लाइफसाठी दुचाकी वापरण्यास प्राधान्य देतात. याच कारणामुळे अधिक मायलेज देणाऱ्या कॉम्प्युटर बाईकची मागणी जास्त आहे. दरम्यान, आज आम्ही तुम्हाला अशा 4 बाईक्सची माहिती देणार आहोत, ज्या उत्तम मायलेज देतात आणि त्यांची किंमतही जास्त नाही.
टीव्हीएस स्पोर्ट
टीव्हीएस (TVS) स्पोर्टला बाजारात सर्वाधिक पसंती दिली जाते. या बाईकमध्ये 109.7 सीसी BS6 इंजिन मिळत आहे, जे 8.18 bhp पॉवर आणि 8.7 NM टॉर्क जनरेट करू शकते. यात दोन ड्रम ब्रेक आहेत. बाजारात तुम्हाला ही बाईक तीन व्हेरिएंट आणि सात कलरमध्ये सहज मिळेल. त्यात 10 लिटरची फ्यूल टँकची ही उपलब्ध आहे. या बाईकची एक्स-शोरूम किंमत 61,025 रुपयांपासून सुरू होते आणि 67,530 रुपयांपर्यंत जाते. हे 70kmpl मायलेज देते.
हिरो एचएफ डिलक्स
हिरो एचएफ डिलक्समध्ये 97.2 सीसी BS6 इंजिन मिळेल, जे 7.91bhp पॉवर आणि 8.05Nm टॉर्क निर्माण करेल. बाईकच्या पुढच्या आणि मागील बाजूस ड्रम ब्रेक्स देण्यात आले आहेत. ही बाईक तुम्हाला 5 व्हेरिएंट आणि 10 कलरमध्ये बाजारात मिळेल. यात 9.1 लीटरची फ्यूल टँक मिळेल आणि या बाईकची एक्स-शोरूम किंमत 55,022 रुपये ते 67178 रुपयांपर्यंत आहे. बाईकचे मायलेज 65kmpl मिळेल.
होंडा एसपी 125
होंडा एसपी 125 बाईकला 124 सीसी BS6 इंजिन मिळेल, जे 10.72bhp पॉवर आणि 10.9NM टॉर्क निर्माण करते. बाईकला समोर आणि मागील बाजूस ड्रम ब्रेकसह एकत्रित ब्रेकिंग सिस्टम देखील मिळते. ही बाईक दोन व्हेरिएंट आणि 5 कलरमध्ये बाजारात उपलब्ध असेल. यात 11 लीटरची फ्यूल टँक आहे. या बाईकची एक्स-शोरूम किंमत 83,088 रुपये ते 69702 रुपयांपर्यंत आहे. ही 65kmpl मायलेज देते.
होंडा लिवो
होंडा लिवो तुम्हाला दोन व्हेरिएंटमध्ये आणि 4 कलरमध्ये बाजारात सहज मिळेल. यात 109.51 सीसी BS6 इंजिन आहे, जे 8.67bhp पॉवर आणि 9.30Nm टॉर्क जनरेट करते. बाईकला एकत्रित ब्रेकिंग सिस्टमसह पुढील आणि मागील बाजूस ड्रम ब्रेक्स मिळतात. या बाईकमध्ये 9 लीटरची फ्यूल टँक उपलब्ध आहे. त्याची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत 75,659 रुपये आहे. याचे मायलेज 60kmpl मिळेल.