Bajaj Chetak Electric Scooter Bookings Open And Close In 48 Hours available pune bengaluru | Bajaj Chetak Electric स्कूटरचं बंपर बुकिंग; केवळ ४८ तासांत बंद करावी लागली प्रोसेस

Bajaj Chetak Electric स्कूटरचं बंपर बुकिंग; केवळ ४८ तासांत बंद करावी लागली प्रोसेस

ठळक मुद्देकेवळ २ हजारांत कंपनीनं सुरू केली होती बुकिंगही स्कूटर स्पोर्ट्स आणि ईको या दोन मोडमध्ये येते.

देशातील आघाडीची दुचाकी वाहन निर्माता Bajaj Auto नं गेल्या वर्षी बाजारात आपली एकमेव इलेक्ट्रीक स्कूटर चेतक सादर केली होती. सुरुवातीला या स्कूटरला बरीच लोकप्रियता मिळाली पण नंतर कंपनीने त्याचं बुकिंग थांबवलं होतं. पण पुन्हा एकदा कंपनीने या स्कूटरचं बुकिंग सुरू केलं होतं. परंतु दोनच दिवसांत झालेल्या बंपर बुकिंग झाल्यामुळे कंपनीनं केवळ 48 तासांत या स्कूटरचं बुकिंग पुन्हा बंद केलं. कंपनीनं केवळ २ हजार रूपये देऊन या स्कूटरचं बुकिंग सुरू केलं होतं. 

सध्या ही स्कूटर पुणे आणि बंगळुरू या दोनच शहरांमध्ये विक्रीसाठी उपलब्ध आहे. लवकरच या स्कूटरची विक्री देशातील अन्य 24 शहरांमध्येही सुरू केली जाईल, अशी कंपनीची योजना आहे. बाजारात ही स्कूटर प्रामुख्याने TVS iQube आणि Ather 450X इलेक्ट्रिक स्कूटरशी स्पर्धा करते.

कशी आहे Bajaj Chetak 

बजाजच्या चेतक स्कूटरने साधारण 20 वर्षांपूर्वी भारतीयांच्या मनात गारुड केले होते. एका बाजुला असलेले इंजिन, खाली करून पेट्रोल त्या इंजिनात उतरले की कीक स्टार्ट मारायाची स्टाईल आणि तिच्यावरून नेण्यात येणारे साहित्य आदीसाठी ही चेतक प्रसिद्ध होती. बजाजने हीच थीम पुन्हा नव्या रुपात आणली आहे. कंपनीनं या स्कूटरमध्ये 3kWh क्षमतेच्या  IP67 रेटेड लिथियम आयन बॅटरी पॅकचा वापर केला आहे. याणध्ये देण्यात आलेली इलेक्ट्रीक मोटर 4kW ची पॉवर आमि 16Nm चा पीक टॉर्क जनरेट करते. ही स्कूटर स्पोर्ट्स आणि ईको या दोन मोडमध्ये येते.

ड्रायव्हिंग रेंज

स्कूटर इको मोडमध्ये 95 किमी पर्यंत जास्तीत जास्त ड्रायव्हिंग रेंज देते, तर स्पोर्ट मोडमध्ये 85 किमी पर्यंत चालविली जाऊ शकते असा दावा कंपनीकडून करण्यात आला आहे. दरम्यान ही रेंज ड्रायव्हिंग करण्याची पद्धत आणि रोड्सच्या कंडिशनवर अवलंबून आहे. या स्कूटरची पूर्ण बॅटरी चार्ज होण्यासाठी जवळपास 5 तासांचा वेळ लागतो आणि क्विक चार्जिंग सिस्टममध्ये 1 तासात स्कूटर 25 टक्के चार्ज होते. 
 

Web Title: Bajaj Chetak Electric Scooter Bookings Open And Close In 48 Hours available pune bengaluru

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.