Auto Expo 2023: ट्रॅफिक जॅम असिस्टसह नवी एमजी हेक्टर लाँच; सफारी, क्रेटा, ग्रँड विटाराला तोड मिळाला...

By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2023 11:26 AM2023-01-11T11:26:30+5:302023-01-11T11:27:25+5:30

नवीन SUV ला संपूर्ण नवीन यूजर इंटरफेससह भारतातील सर्वात मोठी 35.56 सेमी (14-इंच) HD पोर्ट्रेट इंफोटेनमेंट सिस्टम मिळते.

Auto Expo 2023: New MG Hector Launched with Traffic Jam Assist price range start from 14.73 lakhs to 22 lakhs; Safari, Creta, Grand Vitara broke... | Auto Expo 2023: ट्रॅफिक जॅम असिस्टसह नवी एमजी हेक्टर लाँच; सफारी, क्रेटा, ग्रँड विटाराला तोड मिळाला...

Auto Expo 2023: ट्रॅफिक जॅम असिस्टसह नवी एमजी हेक्टर लाँच; सफारी, क्रेटा, ग्रँड विटाराला तोड मिळाला...

googlenewsNext

ब्रिटीश कार कंपनी एमजी मोटर्सने ऑटो एक्सपो 2023 च्या पहिल्याच दिवशी हेक्टरचे फेसलिफ्ट लाँच केले आहे. भारताच्या या पहिल्या कनेक्टेड कारची किंमतही जाहीर केली आहे. 
नवीन जनरेशन सुरक्षितता आणि ड्रायव्हिंग अधिक सोईचे करण्यात आले आहे. नेक्स्ट-जनरल हेक्टर 5, 6 आणि 7-सीटर कॉन्फिगरेशनमध्ये ऑफर केले जात आहे. यामध्ये प्रशस्त जागा, फिचर्स  देण्यात आले आहेत. एमजीने भारतभर ३०० डीलरशीप उघडली आहेत.

नवीन SUV ला संपूर्ण नवीन यूजर इंटरफेससह भारतातील सर्वात मोठी 35.56 सेमी (14-इंच) HD पोर्ट्रेट इंफोटेनमेंट सिस्टम मिळते. सेगमेंट-फर्स्ट डिजिटल ब्लूटूथ की आणि की-शेअरिंग क्षमतेमध्ये नवे शोध दिसतात. आपत्कालीन परिस्थितीत किंवा किल्ली हरवल्यास वाहन उघडणे, बंद करणे, सुरू करणे आणि चालवणे यासाठी डिजिटल की वापरली जाऊ शकते. रिमोट लॉक/अनलॉक वैशिष्ट्य वापरून कार कुठूनही अनलॉक केली जाऊ शकते.

अडास तर आहेच, पण इंटेलिजेंट ट्रॅफिक जॅम असिस्ट (TJA) लेनच्या मध्यभागी वाहन ठेवून आणि येणाऱ्या वाहनांपासून सुरक्षित अंतर राखून ट्रॅफिक जॅम परिस्थितीत अधिक सुरक्षा देते. हेक्टरमध्ये आता 75 हून अधिक कनेक्टेड फीचर्स उपलब्ध आहेत. यामध्ये 100 व्हॉइस कमांडचा समावेश आहे. 

सनरूफ साठी टच-स्क्रीन कंट्रोल, एंबियंट लाइट साठी व्हॉईस कमांड्स, 5 भारतीय भाषांमध्ये नेविगेशन वॉयस गाइडन्स, 50+ हिंग्लिश कमांड्स व अनेक अशी अॅप्स वापरता येणार आहेत. इन्फिनिटीची प्रिमियम ऑडिओ सिस्टीम वायरलेस अँड्रॉइड ऑटो आणि ऍपल कारप्लेसह सक्षम आहे. ज्यामुळे एक इमर्सिव्ह सराउंड साउंड अनुभव मिळतो. नेक्स्ट-जेन हेक्टरमध्ये 6 एअरबॅग्ज, 360-डिग्री एचडी कॅमेरा, इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी प्रोग्राम (ESP), ट्रॅक्शन कंट्रोल सिस्टम (TCS), हिल असिस्ट कंट्रोल (HAC), सर्व चार-चाकी डिस्क ब्रेक, सर्व सीटसाठी 3-पॉइंट सीट आहेत. 
नव्या हेक्टरची किंमत 14.72 लाख रुपयांपासून सुरु होते. टॉप व्हेरिअंटची किंमत 22.42 लाख रुपयांपर्यंत जाते.

Web Title: Auto Expo 2023: New MG Hector Launched with Traffic Jam Assist price range start from 14.73 lakhs to 22 lakhs; Safari, Creta, Grand Vitara broke...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.