शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यभरात इंधन टंचाई! बऱ्याच पेट्रोल पंपांवर पेट्रोल, डिझेल संपलेले; ट्रॅक्टर थांबले, डिझेलसाठी शेतकरी रांगेत  
2
नीट पेपरफुटीचा भंडाफोड कसा झाला? या शिक्षकाच्या लक्षात आले नसते तर...
3
मृत्यू कलिंगडामुळे नाही तर...; ४ जणांच्या मृत्यू प्रकरणात पोलिसांच्या हाती लागला खळबळजनक माहिती
4
Deepika Nagar :"रात्री साडेबाराला मोठा आवाज झाला अन्..." शेजाऱ्याने उघड केली 'त्या' रात्रीची संपूर्ण कहाणी!
5
PM Modi Donald Trump: भारताचे पंतप्रधान आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष पुढच्या महिन्यात भेटणार; कोणत्या देशामध्ये होणार भेट?
6
"शुक्रवार, शनिवार किंवा रविवार..." इराणवर पुन्हा होणार मोठा हल्ला; डोनाल्ड ट्रम्प यांनी केले जाहीर
7
BRICS Summit 2026: तब्बल ७ वर्षांनंतर शी जिनपिंग भारतात येणार! दिल्लीतील ब्रिक्स परिषदेला पुतिन यांचीही उपस्थिती असणार
8
धोकादायक कुत्र्यांना मृत्यूचे इंजेक्शन द्या : सुप्रीम काेर्ट; दयामरण देण्यास प्रथमच परवानगी
9
मोटेगावकर पेपरफुटीविरोधात लढत होता, आता स्वतःच आरोपी बनला...
10
"असे १०० जाळून टाकेन...", हॉस्पिटलबाहेर फोटो काढणाऱ्या पापाराझींवर भडकला सलमान खान, दिला थेट इशारा
11
संपादकीय: बांधावर घोंगावणारे वादळ, वेळीच नाही ओळखले तर...
12
नाश्ता महागला; पाव, ब्रेडच्या किमतीत १०% वाढ
13
आजचे राशीभविष्य, २० मे २०२६: आजचा दिवस आर्थिक दृष्टया लाभदायी, पण अवैध कामासून राहावे लागेल दूर; कोणत्या राशींच्या लोकांनी घ्यावी काळजी?
14
१९ जिल्हे ४५ अंश सेल्सिअस पार, जलसाठे घटताहेत; मंत्रिमंडळ बैठकीत चिंता
15
आयएएस तुकाराम मुंढे आता ‘अन्न व औषधी प्रशासन’च्या आयुक्तपदी, २१ वर्षांत २५ वी बदली; आणखी तीन बदल्या
16
मोटेगावकरच्या मुलाचीही सीबीआय चौकशी; विदर्भातील ३ उमेदवारांच्या घराची झाडाझडती
17
महाराष्ट्राचे अणुऊर्जा निर्मिती क्षेत्रात मोठे पाऊल, साडेसहा लाख कोटींची गुंतवणूक
18
भोंदू खरातला ‘ईडी’कडून अटक; कोट्यवधींचे मायाजाल उलगडणार
19
‘ईपीएफ’चे पैसे ‘यूपीआय’द्वारे काढता येणार; तांत्रिक चाचणी यशस्वी
20
शिंदेसेनेच्या नगरसेवकांना १५४ कोटी; भाजपच्या वाट्याला केवळ ३ कोटी
Daily Top 2Weekly Top 5

Auto Expo 2018: होंडाची नेक्स्ट जनरेशन Amaze लवकरच भारतीय बाजारपेठेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2018 11:14 IST

यंदाच्या ऑटो एक्सपोमध्ये 24 नव्या गाडया लाँच होतील.

नवी दिल्ली: दिल्लीत सुरु असलेल्या Auto Expo 2018 मध्ये होंडा कार्स इंडियाने नेक्स्ट जनरेशन कार अशी ओळख असलेल्या Amaze चे अनावरण केले. ही कार यंदा भारतीय बाजारपेठेत दाखल होईल, असे यावेळी होंडाकडून सांगण्यात आले. बोल्ड एक्सटीरियर स्टाइल, प्रिमियम इंटीरियर आणि ड्रायव्हिंग परफॉर्मन्स ही Amaze कारची खास वैशिष्ट्ये आहेत. या गाडीची किंमत 5.48 ते 8.41 लाख इतकी असेल.

याशिवाय, होंडाकडून Auto Expo 2018 मध्ये  5th जनरेशनच्या CR-V आणि 10th जनरेशनच्या Civic या दोन गाड्याही ग्राहकांसमोर सादर करण्यात आल्या. यापैकी CR-V ही डिझेलवर चालणारी कार आहे. तर Honda Civic ही स्पोर्टस डिझाईन डोळ्यासमोर ठेवून तयार करण्यात आली आहे. त्यामुळे या गाडीत वैशिष्ट्यपूर्ण एलईडी हेडलॅम्प, बोल्ड कॅरेक्टर लाइन्स, स्पोर्टी अलॉय वील्स आणि एलईडी टेललॅम्प अशा सुविधा पाहायला मिळतील. यापूर्वी Honda Civic चे मॉडेल भारतात प्रचंड लोकप्रिय ठरले होते. 2006 मध्ये ही गाडी भारतीय बाजारपेठेत पहिल्यांदा लाँच करण्यात आली. त्यानंतर 2013 पर्यंत या गाडीचे भारतीय बाजारपेठेसाठी उत्पादन सुरू होते. 

यंदाच्या ऑटो एक्सपोमध्ये 24 नव्या गाडया लाँच होतील. या एक्सपोमध्ये 100 कंपन्या सहभागी होणार आहेत. मागच्यावेळी 88 कंपन्या होत्या अशी माहिती सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाइल मॅन्युफॅक्चर्सचे अध्यक्ष अभय फिरोदिया यांनी दिली. विशेष म्हणजे मागच्यावर्षी एक्सपोमध्ये 11 स्टार्ट-अप कंपन्या सहभागी झाल्या होत्या. यावेळी फक्त दोन कंपन्या सहभागी होणार आहेत. एसीएमएम, सीआयआय आणि सियाम या तिघांनी मिळून संयुक्तपणे ऑटो एक्सपो : द मोटर शो 2018 चे आयोजन केले आहे. या शो ला इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन ऑफ मोटर व्हेइकल मॅन्युफॅक्चर्स संघटनेची मान्यता आहे. 

आठ लाखापेक्षा जास्त लोक या ऑटो एक्सपोमध्ये सहभागी होतील अशी शक्यता आहे. सर्वसामान्य 9 ते 14 जानेवारी दरम्यान सहभागी होऊ शकतात. या शो मध्ये 36 पेक्षा जास्त ऑटोमेकर्स आपल्या गाडया, एसयूव्ही, टू व्हीलर आणि कमर्शिअल वाहने प्रदर्शनासाठी मांडणार आहेत. इलेक्ट्रीक वाहने या ऑटो एक्सपोचे खास वैशिष्टय असेल. या ऑटो एक्सपोत बिझनेस हवर्समध्ये तिकीटाचे दर 750 रुपये आहेत. पब्लिक हवर्समध्ये तिकिटाची किंमत 350 रुपये आहे. बिझनेस हवर्स सकाळी 10 ते 1 पर्यंत असेल तर पब्लिक हवर दुपारी 1 ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत असेल. वीकएण्डला तिकिटाची किंमत 475 रुपये आहे. 

टॅग्स :Auto Expo 2018ऑटो एक्स्पो २०१८Honda Amazeहोंडा अमेझ