शहरं
Join us  
Trending Stories
1
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदान पाहून नेत्यांचं वाढलं टेन्शन; सभांना होते गर्दी, मात्र मत देताना लोकांचा हात आखडता
2
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा
3
"ते म्हणतात की, मी अपवित्र आहे, कारण...", कंगनाचा विक्रमादित्य यांच्यावर जोरदार हल्लाबोल
4
सांगलीच्या ‘करेक्ट’ कार्यक्रमामुळे राष्ट्रवादी काॅंग्रेसची घसरगुंडी !
5
प्रचाराच्या रणधुमाळीदरम्यान मुंबईतील भांडुपमधून तीन कोटींची रोकड जप्त, तपास सुरू
6
सहा देशांमध्ये ९९ हजार टन लाल कांद्याच्या निर्यातीस परवानगी; निर्णय नवा की जुनाच?, याची चर्चा
7
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
8
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
9
आमिरला पहिल्या पत्नीने लगावली होती कानशिलात, नेमकं काय घडलं होतं? अभिनेत्याने केला खुलासा
10
ऐन निवडणुकीत बाजारातील पैसा गायब; अंगडियाचे दर भडकले !
11
ईश्वराप्पा यांच्या बंडाने शिवमोग्गात लढत रंगतदार; पक्षातून सहा वर्षासाठी हकालपट्टी
12
पूनम महाजन यांना डावलून निकमांना संधी; मुंबई उत्तर-मध्य मतदारसंघात चुरस वाढली
13
लढाई हट्टाची आणि अस्तित्वाची, नेत्यांची कसोटी; 'एकास एक' लढतीचे प्रयत्न फसले
14
काँग्रेसची सत्ता आली तर ओबींसीचे आरक्षण धर्माच्या नावावर वाटणार : पंतप्रधान मोदी
15
राज्यात पारा चाळिशी पार; मुंबई ३६, तर ठाणे ४१, उष्माघाताच्या रुग्णांची संख्या १८४ वर
16
या झोपडीत राहतो लोकसभेचा उमेदवार, रावेरमधून लढणार; लोकांनी वर्गणी काढून भरले डिपॉझिट
17
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
18
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
19
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
20
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया

Auto Expo 2018: Maruti Suzuki कडून Future S संकल्पनेचे अनावरण; जाणून घ्या खास गोष्टी

By ऑनलाइन लोकमत | Published: February 07, 2018 9:27 AM

भारतातील ग्राहक वाहन खरेदी करताना त्यामधील सुविधांना विशेष प्राधान्य देतात.

नवी दिल्ली: देशातील सर्वात मोठी कार उत्पादक कंपनी असलेल्या Maruti Suzuki ने दिल्लीत सुरु झालेल्या Auto Expo 2018 मध्ये बुधवारी आपल्या इलेक्ट्रिक कारच्या Future S संकल्पनेचे अनावरण केले. Maruti Suzuki e-Survivor ही एक ओपन टॉप, दोन आसनी स्पोर्टस युटिलिटी व्हेईकल प्रकारात मोडणारी गाडी आहे. Future S संकल्पनेचा वापर करून या अद्यायावत गाडीचे डिझाईन करण्यात आले आहे. Maruti Suzuki e-Survivor गाडीच्या अनावरणप्रसंगी Maruti Suzuki चे व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ केनेची अयुकवा यांनी म्हटले की, भारतातील ग्राहक वाहन खरेदी करताना त्यामधील सुविधांना विशेष प्राधान्य देतात. ग्राहकांना वाहनांमध्ये जास्तीत जास्त सुविधा हव्या असतात. त्यासाठी Maruti Suzuki सातत्याने काम करत असल्याचे त्यांनी म्हटले. केंद्र सरकार 2030 पर्यंत देशात इलेक्ट्रिक वाहनांसाठी अनुकूल वातावरण निर्माण करण्यासाठी प्रयत्नशील आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सर्व भारतीय कंपन्यांना यासंबंधी निर्देश दिले आहेत. Maruti Suzuki ने 2020 पर्यंत भारतात पहिली इलेक्ट्रिक कार लाँच करण्याचे ध्येय समोर ठेवले आहे. Maruti  आणि Toyota या दोन्ही कंपन्या त्यासाठी संयुक्तपणे काम करत आहेत. दरम्यान, दिल्लीतील Auto Expo 2018 मध्ये Maruti Suzuki e-Survivor शिवाय 2018 Maruti Suzuki Swift आणि कंपनीने नव्याने डिझाईन केलेली Future S संकल्पना लोकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरण्याची शक्यता आहे. 

यंदाच्या ऑटो एक्सपोमध्ये 24 नव्या गाडया लाँच होतील. या एक्सपोमध्ये 100 कंपन्या सहभागी होणार आहेत. मागच्यावेळी 88 कंपन्या होत्या अशी माहिती सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाइल मॅन्युफॅक्चर्सचे अध्यक्ष अभय फिरोदिया यांनी दिली. विशेष म्हणजे मागच्यावर्षी एक्सपोमध्ये 11 स्टार्ट-अप कंपन्या सहभागी झाल्या होत्या. यावेळी फक्त दोन कंपन्या सहभागी होणार आहेत. एसीएमएम, सीआयआय आणि सियाम या तिघांनी मिळून संयुक्तपणे ऑटो एक्सपो : द मोटर शो 2018 चे आयोजन केले आहे. या शो ला इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन ऑफ मोटर व्हेइकल मॅन्युफॅक्चर्स संघटनेची मान्यता आहे. 

आठ लाखापेक्षा जास्त लोक या ऑटो एक्सपोमध्ये सहभागी होतील अशी शक्यता आहे. सर्वसामान्य 9 ते 14 जानेवारी दरम्यान सहभागी होऊ शकतात. या शो मध्ये 36 पेक्षा जास्त ऑटोमेकर्स आपल्या गाडया, एसयूव्ही, टू व्हीलर आणि कमर्शिअल वाहने प्रदर्शनासाठी मांडणार आहेत. इलेक्ट्रीक वाहने या ऑटो एक्सपोचे खास वैशिष्टय असेल. या ऑटो एक्सपोत बिझनेस हवर्समध्ये तिकीटाचे दर 750 रुपये आहेत. पब्लिक हवर्समध्ये तिकिटाची किंमत 350 रुपये आहे. बिझनेस हवर्स सकाळी 10 ते 1 पर्यंत असेल तर पब्लिक हवर दुपारी 1 ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत असेल. वीकएण्डला तिकिटाची किंमत 475 रुपये आहे.  

टॅग्स :Auto Expo 2018ऑटो एक्स्पो २०१८Maruti Suzukiमारुती सुझुकीMaruti Suzuki e-Survivorमारुती सुझुकी फ्यूचर एस कन्सेप्टElectric Carइलेक्ट्रिक कार