सि्ट्रोनची आणखी एक इलेक्ट्रिक कार आली; आजपासून विक्री सुरू

By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2023 04:54 PM2023-03-13T16:54:40+5:302023-03-13T16:59:17+5:30

बी२बी  आणि बी२सी सेगमेंटमधील न्यु सिट्रोन ई-सी ३ ऑल-इलेक्ट्रिकची डिलिव्हरी मार्चच्या दुसऱ्या आठवड्यापासून देशभरातील ला मेसन सिट्रोन फिजिटल शोरूमद्वारे सुरू होईल.

Another electric car from Citroen arrives; Sale starts today | सि्ट्रोनची आणखी एक इलेक्ट्रिक कार आली; आजपासून विक्री सुरू

सि्ट्रोनची आणखी एक इलेक्ट्रिक कार आली; आजपासून विक्री सुरू

googlenewsNext

 सिट्रोन इंडियाने आपली बहुप्रतिक्षित नवीन सिट्रोन ई -सी ३  (Ë-C3) ऑल-इलेक्ट्रिक लॉन्च केली आहे.  बीईव्ही बी-हॅच ही एक सी-क्यूब्ड  फॅमिलीतील व्हेईकल आहे, जी तिरुवल्लूर, तमिळनाडू येथील मॅन्युफॅक्चरींग फॅसिलीटीमध्ये बनवली जाते. बी२बी  आणि बी२सी सेगमेंटमधील न्यु सिट्रोन ई-सी ३ ऑल-इलेक्ट्रिकची डिलिव्हरी मार्चच्या दुसऱ्या आठवड्यापासून देशभरातील ला मेसन सिट्रोन फिजिटल शोरूमद्वारे सुरू होईल. तसेच, सिट्रोनचे पुणे शोरूम जियो -बीपीद्वारे प्रदान केलेल्या डीसी फास्ट चार्जिंग सुविधेने सुसज्ज असणार आहे. दरम्यान, हे शोरूम सर्व इलेक्ट्रिक वाहनांना आपली सेवा प्रदान करणार आहे.

सिट्रोन इंडियाचे ब्रँड हेड सौरभ वत्स यांनी सांगितले की, "आम्ही नवीन सिट्रोन ई-सी३ ऑल-इलेक्ट्रिक लाँच करण्यास उत्सुक आहोत. क्लेव्हर , कम्फर्ट आणि कुल असलेल्या  या व्हेईकलचा अनुभव घेऊ इच्छिणाऱ्या सर्व युवा आणि आधुनिक ग्राहकांसाठी आणि भारतीय ग्राहकांच्या अनोख्या गरजा लक्षात घेऊन ही कार विकसित करण्यात आली आहे. सर्टीफाईड ड्रायव्हिंग रेंज 320 किमी प्रति चार्ज (एमआयडीसी सायकल), 100 टक्के डीसी फास्ट चार्जिंग क्षमता, अनेक फीचर्सचा समावेश आहे. तसेच, सिट्रोन अॅडव्हान्स्ड कम्फर्ट ऑन बोर्ड कम्बाईन्ड सह कार्यक्षम ई-पॉवरट्रेनसह सुसज्ज अशी ही नवीन सिट्रोन ई- सी ३ ऑल इलेक्ट्रिक कार ग्राहक आणि फ्लीट ऑपरेटर दोघांच्याही अपेक्षा पूर्ण करेल अशी आम्हाला खात्री आहे."

दरम्यान, सि्ट्रोन नवीन ई-सी 3 ऑल-इलेक्ट्रिकवर माय सिट्रोन कनेक्ट आणि सी-बडी सारखी कनेक्टिव्हिटी अॅप्स देखील लॉन्च करेल. जी आयओएस आणि अँड्रॉइड दोन्हीवर उपलब्ध असतील, माय सिट्रोन कनेक्ट मध्ये 5 स्मार्ट फिचर्स असणार आहेत. त्यात ड्रायव्हिंग बिहेवियर अॅनॅलिसिस, व्हेईकल ट्रॅकिंग, इमर्जन्सी सर्व्हिस कॉल्स, ऑटो क्रॅश नोटिफिकेशन्स, ओव्हर द एअर सॉफ्टवेअर अपडेट्स, युज बेस इशुरन्स पॅरामीटर्स आणि 7 वर्षांचे सबक्रिप्शन अशी वैशिष्ट्ये पाहायला मिळतील.

याचबरोबर,  L’Atelier Citroën नावाच्या आफ्टरसेल्स नेटवर्कद्वारे आणि ग्राहकांना पुर्णपणे हामी देण्यासाठी कंपनी नवीन सि्ट्रोन सी- 3  ऑल-इलेक्ट्रिकच्या  रिमोट डायग्नोस्टिक्स, 100 टक्के पार्ट्सची उपलब्धता यासारख्या इतर सेवा ऑफर करेल. सिट्रोनची ऑन व्हील्स  सेवा ग्राहकांच्या सामान्य दुरुस्तींसाठी देखील  घरपोच सेवा देईल. याशिवाय, ग्राहक आता नवीनला मेसन न्यु सिट्रोन ई-सी3 ऑल-इलेक्ट्रिकची टेस्ट ड्राईव्ह घेऊ शकतात. यासाठी आपल्या जवळील ला मेसन सिट्रोन फिजिटल शोरूमला भेट देऊ शकतात. तसेच, www.citroen.in वर कार ऑनलाइन बुक करू शकतात.

Web Title: Another electric car from Citroen arrives; Sale starts today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.