2025 Keeway RR300: थेट बीएमडब्लूशी स्पर्धा करणार मोटो वॉल्टची नवी बाईक? दोन लाखांहून कमी किंमतीत लॉन्च!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2025 18:03 IST2025-07-17T18:02:28+5:302025-07-17T18:03:35+5:30

Moto Vault 2025 Keeway RR300 Launched: मोटो व्हॉल्टने  त्यांची नवी मोटारसायकल किवे आरआर ३०० भारतीय बाजारात लॉन्च केली आहे.

2025 Keeway RR300 Launched in India at Rs. 1.99 Lakh | 2025 Keeway RR300: थेट बीएमडब्लूशी स्पर्धा करणार मोटो वॉल्टची नवी बाईक? दोन लाखांहून कमी किंमतीत लॉन्च!

2025 Keeway RR300: थेट बीएमडब्लूशी स्पर्धा करणार मोटो वॉल्टची नवी बाईक? दोन लाखांहून कमी किंमतीत लॉन्च!

मोटो व्हॉल्टने  त्यांची नवी मोटारसायकल किवे आरआर ३०० भारतीय बाजारात लॉन्च केली आहे. कंपनीने या मोटरसायकलची एक्स शोरुम किंमत १ लाख ९९ हजार ठेवली आहे. ही मोटारसायकल किवे के३०० आर सारखीच दिसते, जी काही दिवसांपूर्वी भारतीय बाजारात लॉन्च झाली होती. स्पोर्ट्स बाईक चाहत्यांना लक्षात घेऊन ही मोटारसायकल लॉन्च करण्यात आली, असे दिसते.

किवे आरआर ३०० मध्ये २९२ सीसी सिंगल-सिलेंडर, लिक्विड-कूल्ड इंजिन आहे, जे ८,७५० आरपीएमवर २७.५ पीबीएच पॉवर आणि ७००० आरपीएमवर २५ एनएम पीक टॉर्क जनरेट करते. या मोटरसायकलचा टॉप स्पीड ताशी १३९ किलोमीटर आहे.

या मोटारसायकलमध्ये बेसिनेट ट्रेलिस फ्रेम आहे, जी समोर यूएसडी फोर्क्सवर आणि मागील बाजूस प्रीलोड-अ‍ॅडजस्टेबल मोनोशॉकवर आधारित आहे.या मोटारसायकलमध्ये समोर ११०/७०/आर१७ टायर आणि मागील बाजूस १४०/६० आर१७ टायर बसवले आहेत. या मोटारसायकलच्या ब्रेकिंग सिस्टममध्ये दोन्ही बाजूंना डिस्क ब्रेक आहेत. याशिवाय, या मोटारसायकलमध्ये टीएफटी इन्स्ट्रुमेंट डिस्प्ले, ड्युअल-चॅनेल एबीएस, एलईडी लाइटिंग आणि स्लिपर क्लच मिळत आहे.

किवे आरआर ३०० मोटारसायकल पाढऱ्या, काळ्या आणि लाल अशा तीन रंगामध्ये उपलब्ध असेल. या मोटरसायकलची बुकिंग सुरु झाली असून जुलैच्या अखिरेस डिलिव्हरीला सुरुवात होईल. ही मोटारसायकल बाजारात दाखल झाल्यानंतर टीव्हीएस आपाची आरआर३१०, बीएमडब्लू जी ३१० आरआर आणि केटीएम आरसी ३९० यांच्याशी स्पर्धा करेल.

Web Title: 2025 Keeway RR300 Launched in India at Rs. 1.99 Lakh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.